Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजित पवारांचा जनसेवेचा वारसा पुढे चालवणार; जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव कार्यरत राहणार, सुनेत्रा पवार यांची ग्वाही

अजित पवार हे जनतेच्या कामासाठी कायम तत्पर असायचे. त्यांचाच जनसेवेचा वारसा पुढे चालवत जनतेच्या प्रश्नांसाठी मी सदैव कार्यरत राहणार आहे. आजपर्यंत अजित पवार यांनी मंजूर केलेल्या विविध विकासकामांचे उद्घाटन आणि लोकार्पण करण्याची जबाबदारी पार पाडत असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 05, 2026 | 03:39 PM
अजित पवारांचा जनसेवेचा वारसा पुढे चालवणार; जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव कार्यरत राहणार, सुनेत्रा पवार यांची ग्वाही

अजित पवारांचा जनसेवेचा वारसा पुढे चालवणार; जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव कार्यरत राहणार, सुनेत्रा पवार यांची ग्वाही

Follow Us
Follow Us:
  • अजित पवारांचा जनसेवेचा वारसा पुढे चालवणार
  •  जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव कार्यरत राहणार
  • सुनेत्रा पवार यांची ग्वाही
चाकण : अजित पवार हे जनतेच्या कामासाठी कायम तत्पर असायचे. त्यांचाच जनसेवेचा वारसा पुढे चालवत जनतेच्या प्रश्नांसाठी मी सदैव कार्यरत राहणार आहे. आजपर्यंत अजित पवार यांनी मंजूर केलेल्या विविध विकासकामांचे उद्घाटन आणि लोकार्पण करण्याची जबाबदारी पार पाडत असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितले. चाकण येथील श्री चक्रेश्वर देवस्थान परिसरात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या निधीतून करण्यात आलेल्या विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पार पडला. या परिसराच्या विकासासाठी सुमारे ५ कोटी ८० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता.

 

यावेळी माजी आमदार दिलीप मोहिते, चाकण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा मनीषा गोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे, जिल्हा परिषद सदस्य सुनीता बुट्टे, अरुण चांभारे, जि. प. सदस्य गणेश बोत्रे, बाबा राक्षे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अंकुश राक्षे, कैलास सांडभोर, मुख्याधिकारी डॉ. अंकुश जाधव,  सर्व नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी, कर्मचारी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते  उपस्थित होते.

चाकण येथील चक्रेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यासह परिसरातील विकासकामे पूर्ण करून अजितदादांची विकासाची स्वप्ने साकार करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. खेड तालुक्यातील विकासकामांसाठी माजी आमदार दिलीप मोहिते यांनी वेळोवेळी केलेला पाठपुरावा महत्त्वपूर्ण ठरले आहे. या लोकार्पण सोहळ्यामुळे देवस्थान परिसराच्या विकासाला चालना मिळणार असून, भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचेही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नमूद केले.

हे सुद्धा वाचा : आढावा बैठकीला गैरहजर, कामकाजही प्रलंबित; दोन सह दुय्यम निबंधकांना कारणे दाखवा नोटीस

माजी आमदार दिलीप मोहिते म्हणाले, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खेड तालुक्यावर कायम विशेष प्रेम होते. तालुक्याच्या विकासासाठी त्यांनी नेहमीच भरीव मदत केली. चाकणच्या विकासासाठी महापालिका होणे ही काळाची गरज आहे. गेल्या सात ते आठ वर्षांपासून डीपीआर मंजुरीचा प्रश्न प्रलंबित आहे. चाकण महापालिका झाल्यास वाहतूक कोंडी, कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा आणि रस्त्यांसह अनेक मूलभूत प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा : ACB च्या कारवाईनंतर आयुक्तांचा दणका; पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओभासे निलंबित

💡

Frequently Asked Questions

  • Que: चाकण येथील चक्रेश्वर देवस्थान परिसराच्या विकासासाठी किती निधी देण्यात आला?

    Ans: चक्रेश्वर देवस्थान परिसराच्या विकासासाठी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुमारे ५ कोटी ८० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता.

  • Que: चक्रेश्वर देवस्थान परिसरातील विकासकामांचे लोकार्पण कोणाच्या हस्ते झाले?

    Ans: राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा पार पडला.

  • Que: चाकणला महापालिका करण्याची मागणी माजी आमदार दिलीप मोहिते यांनी का केली?

    Ans: चाकणमध्ये वाहतूक कोंडी, कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा आणि रस्त्यांसारखे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी चाकणला महापालिका होणे काळाची गरज असल्याचे दिलीप मोहिते यांनी सांगितले.

Web Title: Sunetra pawar has pledged to carry forward the legacy of public service established by ajitdada nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2026 | 03:38 PM

Topics:  

  • ajit pawar
  • maharashtra
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

आढावा बैठकीला गैरहजर, कामकाजही प्रलंबित; दोन सह दुय्यम निबंधकांना कारणे दाखवा नोटीस
1

आढावा बैठकीला गैरहजर, कामकाजही प्रलंबित; दोन सह दुय्यम निबंधकांना कारणे दाखवा नोटीस

फर्ग्युसन रोड अतिक्रमणमुक्त करा, अन्यथा…; नगरसेवक रविंद्र साळेगावकरांचा प्रशासनाला इशारा
2

फर्ग्युसन रोड अतिक्रमणमुक्त करा, अन्यथा…; नगरसेवक रविंद्र साळेगावकरांचा प्रशासनाला इशारा

Sports News: ‘खेलो इंडिया’मुळे खेळ पोहोचला गावागावात; ग्रामीण खेळाडूंना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संधी – मुख्यमंत्री फडणवीस
3

Sports News: ‘खेलो इंडिया’मुळे खेळ पोहोचला गावागावात; ग्रामीण खेळाडूंना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संधी – मुख्यमंत्री फडणवीस

Maharashtra Farmers: शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार! 73 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 5000 रुपये जमा; उर्वरित शेतकऱ्यांना कधी मिळणार?
4

Maharashtra Farmers: शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार! 73 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 5000 रुपये जमा; उर्वरित शेतकऱ्यांना कधी मिळणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.