Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

साताऱ्यात ओबीसी प्रवर्गाचा प्रबळ चेहरा कोण?; सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद इतर मागासवर्गीय महिला प्रवर्गासाठी राखीव

अध्यक्षपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झाल्याने सर्व राजकीय पक्षांची ओबीसी प्रवर्ग महिलांची चाचपणी सुरू झाली आहे. सातारा जिल्हा परिषद आणि ११ पंचायत समिती निवडणूक येत्या काही महिन्यात होत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 14, 2025 | 01:34 PM
साताऱ्यात ओबीसी प्रवर्गाचा प्रबळ चेहरा कोण?; सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद इतर मागासवर्गीय महिला प्रवर्गासाठी राखीव

साताऱ्यात ओबीसी प्रवर्गाचा प्रबळ चेहरा कोण?; सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद इतर मागासवर्गीय महिला प्रवर्गासाठी राखीव

Follow Us
Close
Follow Us:

सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची हालचाल पुन्हा गतिमान झाली आहे. ग्रामविकास मंत्रालयाने शुक्रवारी राज्यातील ३४ जिल्हा परिषदांची आरक्षण जाहीर केली. यामध्ये सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव झाले आहे तर पंचायत समिती सभापती पदासाठी प्रवर्गानुसार संख्या निश्चित केली असून सोडत काढली जाणार आहे. ही पदे अडीच वर्षासाठी असणार आहेत.

अध्यक्षपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झाल्याने सर्व राजकीय पक्षांची ओबीसी प्रवर्ग महिलांची चाचपणी सुरू झाली आहे. सातारा जिल्हा परिषद आणि ११ पंचायत समिती निवडणूक येत्या काही महिन्यात होत आहे. अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली आहे. राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने अधिसूचना काढून जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद जाहीर केले आहे. हे अध्यक्षपद इतर मागास प्रवर्ग महिला प्रवर्गासाठी राखीव करण्यात आले आहे.

दुसऱ्यांदा ओबीसी प्रवर्गासाठी राखीव

११ पंचायत समिती सभापती पदांचे प्रवर्गनिहाय आरक्षणाची संख्या स्पष्ट करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे पूर्वीचे आरक्षण रद्द झाले होते. त्यामुळे नवीन कोणते आरक्षण पडणार याविषयी लक्ष लागून राहिले होते. यावेळी ही ओबीसी प्रवर्गातील महिलांसाठीच अध्यक्षपद राखीव झाले आहे. त्यामुळे ओबीसी प्रवर्गातील महिलेला संधी मिळणार आहे.

निवडणुका वर्षाच्या अखेरीस होण्याची अपेक्षा

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या वर्षाच्या अखेरीस होण्याची अपेक्षा आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडूनही या दिशेने तयारी सुरू आहे. एकीकडे निवडणूक आयोग तयारीत व्यस्त असताना, दुसरीकडे सरकारकडून एक मोठी अपडेट आली आहे. सरकारने राज्यातील ३४ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांसाठी आरक्षण जाहीर केले आहे. सरकारने जारी केलेल्या सरकारी आदेशात ठाणे, पालघर, पुणे, सोलापूरसह राज्यातील ३४ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण देण्यात आले आहे.

Web Title: Who is the dominant face of the obc category in satara the post of president of satara zilla parishad is reserved

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2025 | 01:32 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • political news
  • Satara Politics

संबंधित बातम्या

Political News : पंढरपुरात राजकारण तापलं; इच्छुकांना आरक्षणाचे लागले वेध, आगामी निवडणुकीसाठी…
1

Political News : पंढरपुरात राजकारण तापलं; इच्छुकांना आरक्षणाचे लागले वेध, आगामी निवडणुकीसाठी…

NCP Advertisement on Devabhau : “देवा आता तूच सांग’…..; राष्ट्रवादी शरद पवार गटाने सूचक जाहिरातीतून टोचले महायुतीचे कान
2

NCP Advertisement on Devabhau : “देवा आता तूच सांग’…..; राष्ट्रवादी शरद पवार गटाने सूचक जाहिरातीतून टोचले महायुतीचे कान

शरद पवार आज नाशिकमध्ये; सुप्रिया सुळेंसह रोहित पवारही येणार, आगामी निवडणुकांबाबत…
3

शरद पवार आज नाशिकमध्ये; सुप्रिया सुळेंसह रोहित पवारही येणार, आगामी निवडणुकांबाबत…

मराठा आरक्षण वाद पेटणार! ‘आतापर्यंत 12 मराठा CM, मग टार्गेट फडणवीसच का?’ संभाजीनगर येथील बॅनरची जोरदार चर्चा
4

मराठा आरक्षण वाद पेटणार! ‘आतापर्यंत 12 मराठा CM, मग टार्गेट फडणवीसच का?’ संभाजीनगर येथील बॅनरची जोरदार चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.