Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘जिभेवर लगाम ठेवा, नाहीतर गाठ काँग्रेसशी आहे!’ बावनकुळेंच्या विधानावर यशोमती ठाकूरांचा घणाघाती पलटवार

राहुल गांधींवर चंद्रशेखर बावनकुळेंनी केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आक्रमक झाल्या आहेत. “जिभेवर लगाम ठेवा, अन्यथा काँग्रेस कार्यकर्ते शांत बसणार नाहीत,” असा इशारा त्यांनी दिला.

  • By विवेक
Updated On: Sep 22, 2026 | 02:43 PM
Yashomati Thakur on Chandrashekhar Bawankule

Yashomati Thakur on Chandrashekhar Bawankule

Follow Us
Follow Us:
  • राहुल गांधींवरील बावनकुळेंच्या वक्तव्यावर यशोमती ठाकूरांचा पलटवार
  • “पदाची गरिमा बाळगा, पातळी सोडून बोलू नका” – यशोमती ठाकू
  • बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारवर निशाणा
 

अमरावती : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर राज्याचे महसूल मंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापलं आहे. काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी बावनकुळेंच्या वक्तव्यावर जोरदार पलटवार केला आहे. “बावनकुळे साहेब, जरा तुमच्या जिभेवर लगाम आणा. पुन्हा अशी भाषा वापरली तर तुमची गाठ सच्च्या काँग्रेस कार्यकर्त्यांशी आहे,” असा थेट इशारा ठाकूर यांनी दिला.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना राहुल गांधींवर अत्यंत हीन पातळीवर जात वैयक्तिक टीका केली होती. “राहुल गांधी सठिया गेले आहेत, त्यांचा बुद्धिभ्रंश झाला आहे आणि त्यांना नागपूरच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याची गरज आहे,” असे वादग्रस्त वक्तव्य बावनकुळे यांनी केले होते. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखे असून राहुल गांधींना देशाने नाकारले आहे, असेही ते म्हणाले होते.

बावनकुळे यांच्या या विधानावर पलटवार करताना ॲड. यशोमती ठाकूर म्हणाल्या की, “चंद्रशेखर बावनकुळे हे एक गंभीर राजकीय नेते असून वैचारिक पातळीवर ही लढाई लढतील असे वाटले होते; मात्र ते चक्क वैयक्तिक पातळीवर येऊन बोलत आहेत. राहुल गांधी हे देशाच्या संसदेतील विरोधी पक्षनेते आहेत आणि ज्या गांधी-नेहरू घराण्याने देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले, त्या घराण्याचे ते प्रतिनिधी आहेत. त्यांच्यावर अशा प्रकारे वैयक्तिक टीका करण्याइतकी बावनकुळेंची राजकीय उंची नाही.”

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या

सरकारवर ताशेरे

पुढे बोलताना त्यांनी सरकारवर ताशेरे ओढले, “देशातील व राज्यातील वाढती बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि जनतेच्या मूळ प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांकडे बोलायला काहीच नाही. पुण्यात पार पडलेला ‘छात्रों की बात’ कार्यक्रम आणि इंदूरचा राहुल गांधींचा कार्यक्रम विरोधकांच्या डोळ्यात खुपला असून तो त्यांना सहन झालेला नाही; म्हणूनच ते अशी वैयक्तिक चिखलफेक करत आहेत, असे ठाकूर म्हणाल्या.

बावनकुळे साहेब, जिभेवर लगाम ठेवा! राहुल गांधींवर बोलण्याइतकी तुमची राजकीय उंची नाही. वैयक्तिक पातळीवर जाऊन पातळी सोडून बोलाल, तर लक्षात ठेवा गाठ सच्च्या काँग्रेस कार्यकर्त्यांशी आहे!#ChandrashekharBawankule #RahulGandhi #Congress@cbawankule @INCIndia @INCMaharashtra… pic.twitter.com/3nvCIc8zng — Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) September 22, 2026

स्थानिक प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप

यशोमती ठाकूर म्हणाल्या, पालकमंत्र्यांच्या जनता दरबारावर टीका करताना त्या म्हणाल्या, “नुकत्याच घेतलेल्या जनता दरबारात दोन-दोन हजार नागरिक निवेदने घेऊन हजर झाले, यावरूनच जनता सरकारवर किती नाराज आणि असंतुष्ट आहे हे उघड होते. शेतकऱ्यांच्या शेतातील वीज गायब आहे, वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढल्याने पिकांची नासाडी होत आहे, पण अशा गंभीर विषयांकडे शासनाचे लक्ष नाही.”

शेवटी ताकीद देताना ॲड. ठाकूर म्हणाल्या, “तुम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे जबाबदार मंत्री आहात, पदाची गरिमा बाळगा. पातळी सोडून विधाने करणे बंद करा; अन्यथा काँग्रेस कार्यकर्ते शांत बसणार नाहीत आणि जशास तसे उत्तर दिले जाईल.”

Rohit Pawar : ‘निर्णय घेता येत नसेल तर बांधावर फिरता कशाला? आता मुख्यमंत्र्यांनाच बांधावर पाठवा!’ रोहित पवारांचा सरकारला सवाल

Web Title: Yashomati thakur slams chandrashekhar bawankule over rahul gandhi statement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 02:42 PM

Topics:  

  • Adv. Yashomati Thakur
  • chandrashekhar bawankule
  • Congress
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Vijay Wadettiwar: काँग्रेस नेते विजय वडेट्टिवार यांचे ‘अकांऊट’ हॅक, पोस्ट आणि मेसेजशी माझा काही संबंध नाही …
1

Vijay Wadettiwar: काँग्रेस नेते विजय वडेट्टिवार यांचे ‘अकांऊट’ हॅक, पोस्ट आणि मेसेजशी माझा काही संबंध नाही …

Rahul Gandhi: पीएम मोदींची राहुल गांधींनी उडवली खिल्ली? ‘रामायण’ फेम सुनील लहरींनी व्यक्त केला संताप
2

Rahul Gandhi: पीएम मोदींची राहुल गांधींनी उडवली खिल्ली? ‘रामायण’ फेम सुनील लहरींनी व्यक्त केला संताप

IIT Bombay Student Suicide : साहिल वाकोडे प्रकरण पेटलं! IIT बॉम्बेच्या बाहेर युवक काँग्रेसचं जोरदार आंदोलन, कार्यकर्ते ताब्यात
3

IIT Bombay Student Suicide : साहिल वाकोडे प्रकरण पेटलं! IIT बॉम्बेच्या बाहेर युवक काँग्रेसचं जोरदार आंदोलन, कार्यकर्ते ताब्यात

बाप्पा गणराया, संकटातील शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची सरकारला सुबुद्धी दे…; हर्षवर्धन सपकाळ यांची प्रार्थना
4

बाप्पा गणराया, संकटातील शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची सरकारला सुबुद्धी दे…; हर्षवर्धन सपकाळ यांची प्रार्थना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.