Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mallikarjun Kharge News: मल्लिकार्जुन खर्गेंच्या सभेच्या ‘शुद्धीकरण’; भाजप प्रदेशाध्यक्षांवर गुन्हा; बंगळूरमध्ये Zero FIR!

Mallikarjun Kharge News: बंगळूर विधानसभा पोलिसांनी उत्तराखंडमधील हल्द्वानी शुद्धीकरण प्रकरणात झिरो एफआयआर दाखल केला आहे. आरोपींमध्ये उत्तराखंड राज्य भाजपचे एक सदस्य आणि इतरांचा समावेश आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 05, 2026 | 12:18 PM
Mallikarjun Kharge, Rahul Gandhi, Haldwani, BJP,

Mallikarjun Kharge, Rahul Gandhi, Haldwani, BJP,

Follow Us
Follow Us:
  • मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हल्द्वानीतील सभेनंतर मंचावर कथित ‘शुद्धीकरण विधी’ केल्याचा आरोप
  • राहुल गांधी यांच्या मागणीनंतर बंगळूर येथील विधान सौध पोलीस ठाण्यात ‘झिरो एफआयआर’ दाखल
  • एफआयआरमध्ये उत्तराखंड भाजप प्रदेशाध्यक्ष महेंद्र भट्ट आणि इतर सदस्यांची नावे
Haldwani Kharge Stage Purification FIR: उत्तराखंडमधील हल्द्वानी येथील ८ ऑगस्ट २०२६ रोजी रामलीला मैदानावर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सभेनंतर झालेल्या कथित शुद्धीकरण विधी झाला होता. या विरोधात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तक्रार दाखल करण्याची मागणी केली होती. या शुद्धीकरण विधी प्रकरणी आता कर्नाटकची राजधानी बंगळूर येथील विधान सौध पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या एफआयआरमध्ये भारतीय जनता पक्षाचे (भाजप) उत्तराखंड प्रदेशाध्यक्ष महेंद्र भट्ट यांचे नाव आहे.

बंगळूर विधानसभा पोलिसांनी उत्तराखंडमधील हल्द्वानी शुद्धीकरण प्रकरणात झिरो एफआयआर दाखल केला आहे. आरोपींमध्ये उत्तराखंड राज्य भाजपचे एक सदस्य आणि इतरांचा समावेश आहे.

Dahi Handi 2026 Jai Jawan: ‘1..2..3 नाही तर’, जय जवानचा 10 थरांचा निर्धार; जमलं तर 11 थरांसाठीही प्रयत्न

काँग्रेसच्या अनुसूचित जमाती विभागाचे माजी उपाध्यक्ष टी. आर. रामप्पा यांच्या तक्रारीनंतर शुक्रवारी विधानसभा पोलीस ठाण्यात हा एफआयआर दाखल करण्यात आला.

८ ऑगस्ट रोजी मल्लिकार्जुन खर्गे यांनी हल्द्वानी येथील रामलीला मैदानावर जाहीर सभेला संबोधित केले होते.पण ११ ऑगस्ट रोजी काही लोकांनी हवन करून मंचाचे शुद्धीकरण करण्यात आले, असा काँग्रेसचा आरोप आहे. काँग्रेसने याचा संबंध जातीय भेदभाव आणि अस्पृश्यतेशी जोडून निषेध केला.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी हल्द्वानी शुद्धीकरण घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला.  जर मोदी दलित असते आणि त्यांच्यासोबत असेच घडले असते, तर ते गप्प राहिले असते का. असा प्रश्न खर्गेंनी उपस्थित केला.

Chandrapur Crime : राखी बांधून बहिणी निघाल्या अन् भावानेच केला भावाचा घात; मटण करीवरून झाला होता वाद

खर्गेचे जेपी नड्डा यांना पत्र

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ३ सप्टेंबर रोजी पत्र लिहून, केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी संसदेत आश्वासन देऊनही शुद्धीकरण घटनेत एफआयआर दाखल न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

या पत्रात त्यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना या प्रकरणात सामील असलेल्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणीही केली. खर्गे म्हणाले की, अशा लोकांना धडा शिकवणे आवश्यक आहे. त्यांच्या मते, या प्रकरणातील त्यांचा राग केवळ वैयक्तिक नसून, समाजातील मोठ्या वर्गावर परिणाम करणाऱ्या मानसिकतेविरोधात आहे.

राहुल गांधी यांच्याविरोधातही एफआयआर दाखल

‘शुद्धीकरण’ प्रकरणावरून निर्माण झालेला वाद आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यापर्यंतही पोहोचला आहे. श्री राम सेना चॅरिटेबल सर्व्हिस ट्रस्टशी संबंधित अमित कुमार यांनीही हल्द्वानीमध्ये राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

हल्द्वानीमध्ये ३१ ऑगस्ट रोजी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये असा आरोप करण्यात आला आहे की, राहुल गांधी यांनी एका धार्मिक विधीला जातीय रंग देऊन वाल्मिकी आणि अनुसूचित जाती समुदायांच्या भावना दुखावल्या आहेत. पोलिसांनी भारतीय दंड संहिता (IPC) तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा, १९८९ च्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

 

Web Title: Zero fir in bengaluru over haldwani mallikarjun kharge rally stage purification case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2026 | 12:18 PM

Topics:  

  • Mallikarjun Kharge
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Rahul Gandhi On Delhi Crime: ४७ किमी प्रवास अन् पोलिसांना खबर नाही; दिल्ली सामूहिक बलात्कारावर राहुल गांधींचा घणाघात
1

Rahul Gandhi On Delhi Crime: ४७ किमी प्रवास अन् पोलिसांना खबर नाही; दिल्ली सामूहिक बलात्कारावर राहुल गांधींचा घणाघात

Nashik Tribal Students Protest: आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवरून काँग्रेस आक्रमक; स्वतंत्र मंत्रिमंडळ बैठकीची मागणी
2

Nashik Tribal Students Protest: आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवरून काँग्रेस आक्रमक; स्वतंत्र मंत्रिमंडळ बैठकीची मागणी

Protest Against Rahul Gandhi: राहुल गांधींवरील FIR वरून डेहराडून पेटले; सचिवालयाला घेराव, काँग्रेस कार्यकर्त्यंची पोलिसांशी झटापट!
3

Protest Against Rahul Gandhi: राहुल गांधींवरील FIR वरून डेहराडून पेटले; सचिवालयाला घेराव, काँग्रेस कार्यकर्त्यंची पोलिसांशी झटापट!

Maharashtra Politics: ‘राहुल गांधींनी भाजपाची झोप उडवली’; हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर पलटवार, ‘Get Well Soon’ म्हणत लगावला टोला
4

Maharashtra Politics: ‘राहुल गांधींनी भाजपाची झोप उडवली’; हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर पलटवार, ‘Get Well Soon’ म्हणत लगावला टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.