Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rehan Vadra : मी त्यांच्या नियम व अटी वाचल्या होत्या; फोटो प्रदर्शनाबाबत रेहान वाड्राचे धक्कादायक विधान

Rehan Vadra : रेहान वाड्राच्या दिल्लीतील बिकानेर हाऊस येथील फोटो प्रदर्शनातील 70 हून अधिक छायाचित्रे हटवण्यास सांगितल्याने वाद निर्माण झाला आहे. यावर प्रतिक्रिया देताना रेहानने हा आपल्यावरील अन्याय असल्याचे म्हटले.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 22, 2026 | 04:47 PM
Rehan Vadra : मी त्यांच्या नियम व अटी वाचल्या होत्या; फोटो प्रदर्शनाबाबत रेहान वाड्राचे धक्कादायक विधान

Rehan Vadra : मी त्यांच्या नियम व अटी वाचल्या होत्या; फोटो प्रदर्शनाबाबत रेहान वाड्राचे धक्कादायक विधान

Follow Us
Follow Us:
  • रेहान खासदार प्रियंका गांधींचा मुलगा
  • बिकानेर हाऊस व्यवस्थापनाने फोटो हटवले
  • रेहानच्या मते, हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला
 

काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांचा मुलगा रेहान वाड्राच्या दिल्लीस्थित बिकानेर हाऊसमध्ये होणाऱ्या सोलो फोटो प्रदर्शनाबाबत एक मोठा वाद निर्माण झाला आहे. बिकानेर हाऊस व्यवस्थापनद्वारे 70 पेक्षा जास्त फोटो हटवण्यास सांगितल्यानंतर आता रेहान वाड्रा(Rehan Vadra) ची प्रतिक्रिया समोर येत आहे.

एका वृत्तसंस्थेशी संवाद साधताना रेहान वाड्रा म्हणाला की, मी बिकानेर हाऊसच्या राजकीय बाबींशी निगडीत सर्व नियम व अटी वाचल्या होत्या. त्यानंतर मी माझे फोटो निवडले होते. तसंच माझ्या फोटो प्रदर्शनात राजकीय घोषणाबाजी किंवा नेत्यांचे फोटोही कमीच होते.

हा माझ्यावरील अन्याय

रेहान पुढे म्हणाला की, हे जे काही झालं आहे, मला वाटतं चुकीचं झाले आहे. हा माझ्यावरील अन्याय आहे. मी जितकं शक्य आहे, बिकानेर हाऊससोबत सहयोग केले. त्यांची जी राजकीय बाबींबाबतची अट होती, ते वाचूनच मी आपले फोटो निवडले. आम्ही कोणतीच राजकीय घोषणाबाजी प्रसिद्ध केली नाही. नेत्यांचे फोटोही जास्त नव्हते.
त्यांनी मला ते फोटो हटवायला सांगितले, तेव्हा मी त्यांना म्हणालो की, आम्ही तुमच्या म्हणण्याप्रमाणे करू. चार ते पाच फोटो तुम्हाला हटवायचे असेल, तर नक्की ते हटवा, पण मला त्याचे कारणही द्या. ते कारण आम्हाला मिळाले नाही. ते मला म्हणाले की, 70 च्या 70 फोटो तुम्हाला हटवावे लागतील.

शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष, दुष्काळी परिस्थितीवर लक्ष देण्याची गरज : आमदार रोहित पवार

हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला

रेहान वाड्रा म्हणाला की, एका सार्वजनिक संस्थेच्या रुपात बिकानेर हाऊसची जबाबदारी आहे की, त्यांनी कलाकार आणि कलादालनांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला कायम राखायला हवे. त्यांची रक्षा करायला हवी. मला वाटते की, याप्रकरणी असे काही झालं नाही.
तो पुढे म्हणाला की, मला सांगण्यात आले की, माझे फोटो हे संस्थेच्या नियमांविरोधात आहेत. माझे अनेक फोटो इन्स्टाग्रावरही उपस्थित आहेत व त्यात सर्वसाधारण लोकच पाहण्यास मिळतात. हो, हे फोटो आंदोलनाचा आहेत, पण त्यात सर्वसाधारण लोकच पाहण्यास मिळतील.

रेहान म्हणतो की, बिकानेर हाऊसने आपल्या नियमांना अधिक विस्ताराने बनवायला हवे. राजकीय सामग्री म्हणजे काय? व त्याचा निर्णय कोण करतो? हेही स्पष्ट करायला हवे. दुसरे म्हणजे, बहुतेक कलाकार हे राजकीय असतात, तेव्हा आपण असे नियम ठेवायलाच नकोत असे मला वाटते.

Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांचा 500 कोटींचा ऑडिओ बॉम्ब अन् शिंदे गटाची मुख्यमंत्र्यांकडे धाव, ऑडिओ क्लिपमुळे राजकारण तापलं

रेहानला विचारण्यात आले की, तुझ्या फोटोत तुझे मामा राहुल गांधी किंवा तुझी आई प्रियंका गांधी यांचे फोटो आहेत का? तर तो म्हणाला की, एक-दोन फोटोत हलकीशी झलक त्यांची पाहण्यास मिळते. मी सर्व बाजूने विचार करून हे फोटो निवडले आहेत, जेणेकरून त्यातून वाद होऊ नये.

तुला तुझी आई किंवा मामामुळे लक्ष्य करण्यात आले? असा प्रश्न केल्यावर रेहान म्हणतो की, मी त्यावर काही बोलू शकत नाही. याचं उत्तर बिकानेर हाऊसवालेच देऊ शकतात. तुझे फोटो हटवण्याबाबत तुझ्या आईची काय प्रतिक्रिया होती, असे विचारल्यावर तो म्हणाला की, हे कळल्यावर ती मला म्हणाली की, तुला जे योग्य वाटते ते तू कर.

💡

Frequently Asked Questions

  • Que: रेहान वाड्रा यांच्या फोटो प्रदर्शनाबाबत वाद का निर्माण झाला?

    Ans: दिल्लीतील बिकानेर हाऊस येथे आयोजित करण्यात येणाऱ्या रेहान वाड्रा यांच्या एकल फोटो प्रदर्शनातील ७० हून अधिक छायाचित्रे हटवण्यास सांगण्यात आल्याने वाद निर्माण झाला.

  • Que: रेहान वाड्रा यांनी या प्रकरणावर काय प्रतिक्रिया दिली?

    Ans: उत्तर: असल्याचे रेहान वाड्रा यांनी म्हटले.

  • Que: रेहान वाड्रा यांच्या फोटो प्रदर्शनात कोणत्या प्रकारची छायाचित्रे आहेत?

    Ans: रेहान यांच्या म्हणण्यानुसार, प्रदर्शनातील काही छायाचित्रे आंदोलनांशी संबंधित आहेत. मात्र, त्यात सर्वसामान्य लोक प्रामुख्याने दिसतात.

Web Title: Rehan vadra bikaner house photo exhibition controversy rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2026 | 04:31 PM

Topics:  

  • Photo
  • Priyanka Gandhi
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

SIR च्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला मोठा निर्णय; आता देशातील 17 राज्यांमध्ये…
1

SIR च्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला मोठा निर्णय; आता देशातील 17 राज्यांमध्ये…

Dharmendra Pradhan : ‘सत्तापालटासाठी आंदोलन?’ धर्मेंद्र प्रधानांचे गंभीर आरोप; राहुल गांधी, CJP वर साधला जोरदार निशाणा
2

Dharmendra Pradhan : ‘सत्तापालटासाठी आंदोलन?’ धर्मेंद्र प्रधानांचे गंभीर आरोप; राहुल गांधी, CJP वर साधला जोरदार निशाणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.