Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sonia Gandhi चं इंस्टाग्रामवर पदार्पण; फॉलोइंग लिस्टमध्ये केवळ हे 3 अकाउंट्स, नावं वाचून व्हाल थक्क!

Sonia Gandhi Instagram Debut: सोनिया गांधी यांनी अखेर इंस्टाग्रामवर त्यांचे अधिकृत अकाऊंट सुरु केले आहेत. अकाऊंट सुरु केल्यानंतर त्यांच्या फॉलोवर्समध्ये हजारोंच्या संख्येने वाढ झाली.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 23, 2026 | 10:09 AM
Sonia Gandhi चं इंस्टाग्रामवर पदार्पण; फॉलोइंग लिस्टमध्ये केवळ हे 3 अकाउंट्स, नावं वाचून व्हाल थक्क!

Sonia Gandhi चं इंस्टाग्रामवर पदार्पण; फॉलोइंग लिस्टमध्ये केवळ हे 3 अकाउंट्स, नावं वाचून व्हाल थक्क!

Follow Us
Follow Us:
  • सोनिया गांधी आतापर्यंत फेसबुक, एक्स आणि इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सपासून दूर होत्या
  • सोनिया गांधी यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटची आता सर्वत्र चर्चा
  • अकाऊंट तयार होताच सोनिया गांधींची फॉलोवर्स संख्या हजारोंनी वाढली
Sonia Gandhi Instagram Account: राष्ट्रीय काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अखेर इंस्टाग्रामच्या जगात पदार्पण केले आहे. त्यांनी वयाच्या 79 व्या वर्षी इंस्टग्रामवर त्यांचे अधिकृत अकाऊंट तयार करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. सोनिया गांधी आतापर्यंत फेसबुक, एक्स आणि इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सपासून दूर होत्या. मात्र आता त्यांनी इंस्टाग्राम अकाऊंट तयार करत सर्वांनाच चकित केले आहे. सोनिया गांधी यांनी त्यांचे आगामी आत्मचरित्र, “बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह” (Belonging: A Journey of Love) ची एक झलक शेअर करण्यासाठी सोशल मीडियाची मदत घेतली आहे. इंस्टाग्राम अकाऊंटवरील पहिल्या पोस्टमध्ये एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.  (फोटो सौजन्य: Instagram)

फेक कॉल्सना बसणार आळा! अनोळखी कॉल उचलण्यापूर्वीच समजणार कॉलिंगच कारण, WhatsApp चं नवं फीचर नेमकं आहे तरी काय?

सोनिया गांधींच्या इंस्टाग्राम अकाऊंटची सर्वत्र चर्चा

सोनिया गांधी यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटची आता सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. अकाऊंट तयार होताच सोनिया गांधींची फॉलोवर्स संख्या हजारोंनी वाढली. मात्र सोनिया गांधी यांनी त्यांच्या अकाऊंटच्या फॉलोइंग लिस्टकडे पाहिले तर त्यामध्ये केवळ तीन अकाऊंट्स दिसत आहेत. ज्यामध्ये राहुल गांधी, प्रियंका गांधी वाड्रा आणि काँग्रेस पार्टीचे ऑफिशियल पेज यांचा समावेश आहे.

अकाऊंटवर शेअर करण्यात आलेल्या पहिल्या रिलमध्ये देखील त्यांनी राहुल, प्रियंका आणि त्यांच्या पुस्तकाचे प्रकाशक हार्परकॉलिन्स इंडियाला टॅग केले आहे. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आधीपासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर ॲक्टिव्ह असतात. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी दोघेही एकमेकांना इंस्टाग्रामवर फॉलो करतात.

गांधी कुटूंबातील सदस्यांचे इंस्टाग्रामवर किती फॉलोअर्स?

गांधी कुटूंबातील सदस्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट्सबद्दल बोलायचं झालं तर, राहुल गांधी यांचा इंस्टाग्रामवर सर्वाधिक दबदबा पाहायला मिळत आहे. भारत जोडो यात्रानंतर राहुल गांधी यांच्या इंस्टाग्राम फॉलोवर्सच्या संख्येत झपाट्याने वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. राहुल गांधी यांचे इंस्टाग्रामवर 16 मिलीअनहुन अधिक फॉलोवर्स आहेत. राहुल गांधी यांना त्यांच्या कुटूंबातील सर्वात प्रसिद्ध चेहरा मानला जातो.

6700mAh बॅटरीसह नवा Poco 5G स्मार्टफोन लाँच! 50MP कॅमेरा अन् 120Hz OLED डिस्प्लेसह मिळणार तगडे फीचर्स, वाचा सविस्तर

प्रियंका गांधी यांच्या इंस्टाग्राम फॉलोवर्सची संख्या सुमारे 3 मिलीयन आहे. त्यांच्या प्रत्येक पोस्टवर जबरदस्त एंगेजमेंट पाहायला मिळते. वरुण गांधी आणि मेनका गांधी यांचे देखील इंस्टाग्रामवर लाखो फॉलोवर्स आहेत. तसेच रॉबर्ट वाड्रा, रेहान वाड्रा आणि मिराया वाड्रा यांनी देखील इंस्टाग्रामवर त्यांचा एक वेगळा फॅनबेस तयार केला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: सोनिया गांधी यांनी इंस्टाग्रामवर पदार्पण कधी केले?

    Ans: सोनिया गांधी यांनी वयाच्या ७९ व्या वर्षी गुरुवारी इंस्टाग्रामवर आपले अधिकृत अकाऊंट सुरू केले.

  • Que: सोनिया गांधी यांनी इंस्टाग्रामवर येण्यामागचे कारण काय आहे?

    Ans: सोनिया गांधींचे आगामी आत्मचरित्र Belonging: A Journey of Love याची झलक शेअर करण्यासाठी त्यांनी इंस्टाग्रामचा वापर केला.

  • Que: सोनिया गांधी इंस्टाग्रामवर कोणत्या तीन अकाऊंट्सना फॉलो करतात?

    Ans: सोनिया गांधी या राहुल गांधी, प्रियंका गांधी वाड्रा आणि काँग्रेस पक्षाच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटला फॉलो करतात.

Web Title: Sonia gandhi create instagram account and following only three accounts learn who are they hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2026 | 10:09 AM

Topics:  

  • instagram
  • Rahul Gandhi
  • Sonia Gandhi

संबंधित बातम्या

Rehan Vadra : मी त्यांच्या नियम व अटी वाचल्या होत्या; फोटो प्रदर्शनाबाबत रेहान वाड्राचे धक्कादायक विधान
1

Rehan Vadra : मी त्यांच्या नियम व अटी वाचल्या होत्या; फोटो प्रदर्शनाबाबत रेहान वाड्राचे धक्कादायक विधान

Belonging: A Journey of Love: इटलीतील बालपणापासून पंतप्रधानपदाच्या संधीपर्यंत; Sonia Gandhiनी शेअर केली आत्मचरित्राची पहिली झलक
2

Belonging: A Journey of Love: इटलीतील बालपणापासून पंतप्रधानपदाच्या संधीपर्यंत; Sonia Gandhiनी शेअर केली आत्मचरित्राची पहिली झलक

रील्सच्या वाटेने Tourism चे सीमोल्लंघन! इन्स्टाग्राम ‘रील्स’ ठरताहेत पुणेकरांच्या भटकंतीचा नवा पर्याय
3

रील्सच्या वाटेने Tourism चे सीमोल्लंघन! इन्स्टाग्राम ‘रील्स’ ठरताहेत पुणेकरांच्या भटकंतीचा नवा पर्याय

Viral Garba Video: कंबरेला टॉवेल, तोंडात ब्रश अन् गरब्याचा फुल्ल जोश! तरुणाचा व्हिडीओ पाहून मुलीही चक्रावल्या
4

Viral Garba Video: कंबरेला टॉवेल, तोंडात ब्रश अन् गरब्याचा फुल्ल जोश! तरुणाचा व्हिडीओ पाहून मुलीही चक्रावल्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.