Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zilla Parishad Election: ३२ जिल्हा परिषद, ३२२ पंचायत समिती निवडणूक; आज घोषणेची शक्यता, ७ फेब्रुवारीला मतदान?

राज्यात ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्यांसाठी ही निवडणूक होणार आहे. यातील १७ जिल्हा परिषदा आणि ८८ समित्यांमध्ये पंचायत ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यात आली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 07, 2026 | 03:55 PM
Zilla Parishad Election: ३२ जिल्हा परिषद, ३२२ पंचायत समिती निवडणूक; आज घोषणेची शक्यता, ७ फेब्रुवारीला मतदान?
Follow Us
Close
Follow Us:
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा धुरळा
  • ७फेब्रुवारी रोजी यासाठी मतदान होण्याची शक्यता
  • १७ जिल्हा परिषदा आणि ८८ समित्यांमध्ये पंचायत ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यात आली
 

Zilla Parishad Election: राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा धुरळा लवकरच उडणार आहे. चालू आठवड्यातच दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या निवडणुकांसाठी पुढच्या महिन्यात ७फेब्रुवारी रोजी मतदान होण्याची शक्यता आहे. दरम्यान, निवडणुकांची घोषणा बुधवार, ७ जानेवारीला होण्याची शक्यता आहे. राज्यात ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्यांसाठी ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकांची तयारी राज्य निवडणूक आयोगाककडून केली जात आहे. (Zilla Parishad Election)

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारीपर्यंत घेण्यात याव्यात असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. पण आरक्षणाच्या पेचामुळे जिल्हा परिषद निवडणुकीवर परिणाम झाला आहे. या आरक्षणामुळेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्यास उशिर होत आहे. पण आता या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. ७फेब्रुवारी रोजी यासाठी मतदान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Exclusive: मतदान की खेळ? नवी मुंबईत प्रभागानुसार चार मतदान, मतदार गोंधळात; सामन्यांचं मत नक्की कोणाला

आरक्षणाच्या मर्यादेत असेल तेथेच मतदान

राज्यात ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्यांसाठी ही निवडणूक होणार आहे. यातील १७ जिल्हा परिषदा आणि ८८ समित्यांमध्ये पंचायत ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यात आली आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मर्यादेमध्ये असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत.

आयोगाच्या आजच्या बैठकीत होणार मंथन

निवडणूक आयोगाने बुधवारी प्रशासनाची महत्वाची बैठक बोलावली आहे. यात मनपा निवडणुकांची मतमोजणी, निर्माण होणारी कायदा व सुव्यवस्थेची स्थिती तसेच जिल्हा परिषद निवडणुकांच्या संभाव्य तारखांवर चर्चा होणार आहे. मनपाची रणधुमाळी आटोपताच जि. प. निवडणुका घेणे शक्य आहे का, यावर अधिकाऱ्यांची स्पष्ट भूमिका या बैठकीत जाणून घेतली जाण्याची शक्यता आहे. (Panchayat Samiti Election) 

लग्नात अनोखा रोमान्स! नवरीच्या इच्छेखातर लग्नात नवऱ्याने स्पायडरमॅन स्टाईलमध्ये घेतली KISS, रश्शीला लटकला अन्

राज्यात अपुरे मनुष्यबळ

प्रशासनापुढे मनुष्यबळाचा प्रश्न असल्याने जि.प. निवडणुका फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात घेण्याची मुभा देण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाला करण्याबाबत चर्चा सुरू आहे. सध्या मनपा निवडणुका सुरू असून, त्यासाठी मोठे अधिकारी व कर्मचारी बळ तैनात आहे, या निवडणुका असलेल्या ठिकाणी ‘जि. प. निवडणुकाही आहेत.

 

Web Title: Zilla parishad election polls for 32 zilla parishads and 322 panchayat samitis likely to be announced today voting on february 7

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2026 | 03:45 PM

Topics:  

  • Panchayat Samiti Election
  • Zilla Parishad Election

संबंधित बातम्या

Karjat Panchayat Samiti: कर्जत पं.स. मध्ये महिला सभापती? पुरुषांची मक्तेदारी मोडली जाणार
1

Karjat Panchayat Samiti: कर्जत पं.स. मध्ये महिला सभापती? पुरुषांची मक्तेदारी मोडली जाणार

मुळशीमध्ये नव्या ‘पॅटर्न’ची चर्चा, भोरमध्ये चिट्ठीवर सभापती? सत्ता स्थापनेची समीकरणे गुंतागुंतीची
2

मुळशीमध्ये नव्या ‘पॅटर्न’ची चर्चा, भोरमध्ये चिट्ठीवर सभापती? सत्ता स्थापनेची समीकरणे गुंतागुंतीची

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.