
गडहिंग्लज उपविभागात विचित्र आघाड्यांची रचना झाल्यास नवल नाही. उपविभागात निवडणुका आल्या की एकमेकांचे कट्टर विरोधक सत्तेसाठी एकत्र येण्याचा अनुभव सर्वांनाच आला आहे. सत्तेत असणारे पक्ष एकमेका विरोधात आणि विरोधात असणारे पक्ष सोयरी का करून निवडणूक लढवत आहेत. जिल्हा परिषद निवडणुका ही त्याला अपवादनसणार आहेत. चंदगड नगरपंचायत निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन काँग्रेसने देखील शाहू आघाडीच्या माध्यमातून युती केली होती. त्याच धर्तीवर आता जिल्हा परिषद निवडणुकीतही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता बळावली आहे.
मात्र जागा वाटपाच्या चर्चेतून नेमकी भूमिका स्पष्ट होणार आहे. दोन्ही राष्ट्रवादीचे नेते स्वतंत्रपणे प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठका
घेऊन मते जाणून घेत आहेत. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार राजेश पाटील यांच्यासह शरदचंद्र पवार
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या डॉ. नंदाताई बाभुळकर कुपेकर यांनी कार्यकत्यांची मते जाणून घेतली आहेत.
चंदगड विधानसभा मतदारसंघाला जोडलेल्य गडहिंग्लज तालुक्यातील चार जिल्हा परिषदेचे आठ पंचायतीचे गण आहेत. यामध्ये प्रत्येकी दोन गट व चार गण वाट्याला येतील अशी चर्चा आहे. त्यामुळे ही वाटणी सोपी वाटत असली तरी कोणत गट, गण कोणाकडे या मुद्द्यावरच चर्चेचे गुन्हाल्ट सुरू असल्याचे समजते. काहीही करून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र लढणार यात शंक नाही. मात्र जागा वाटपाचा तिढा कधी संपणार यार्च चिंता इच्छुकांना लागली आहे.
दोन्ही राष्ट्रवादी विरोधात प्रमुख पक्ष म्हणून भाजप असणार आहे, तालुक्याच्या ग्रामीण भागातील काही गावात जनता दलाचे मतांचे पॉकेट आहे. या निवडणुकीतही जनता दल भाजपासोबत जाण्याची दाट शक्यता चर्चेत आहे. काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादीसोबत जातो की ठराविक गट, गणात वेगळी चूल मांडणार याची ही उत्सुकता आहे. दोन्ही शिवसेनेची भूमिका गुलदस्त्यात आहे. उबाठा, शिवसेना आणि स्वाभिमानी संघटनेच्या भूमिकेवरही लक्ष केंद्रित केले जात आहे.
गडहिंग्लज तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादीचे गावागावात उत्तम संघटन आहे. इच्छुक कार्यकत्यांची संख्याही दोन्हीकडे आहे, त्यामुळे आपल्या पक्षाची ताकत असलेल्या जागा पदरात पाडून घेण्यात रस्सीखेच होणार आहे. काही इच्छुकांनी तर बंडखोरीची तयारी केली आहे. गडहिंग्लज, चंदगड तालुक्यात ऐनवेळी विचित्र आधाड्यांची रचना झाल्यास नवल नाही. चंदगड तालुक्यातील गट तटाच्या राजकारणातून राजकीय भकंप होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.