Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरून राजकारण रंगले; काय आहे सध्याची परिस्थिती?

स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार आगामी राजकीय गणिते लक्षात घेऊन रणनीती आखायचे. जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीतून त्यांचा मुत्सद्दीपणा दिसून यायचा. त्यांनी निवड केलेल्या बहुतांशी पदाधिकाऱ्यांनी पुढे चमकदार कामगिरी केली

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 05, 2026 | 08:02 AM
पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरून राष्ट्रवादीत रस्सीखेच; तरुण की अनुभवी, कोणाला मिळणार संधी?

पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरून राष्ट्रवादीत रस्सीखेच; तरुण की अनुभवी, कोणाला मिळणार संधी?

Follow Us
Follow Us:

पुणे / संदीप पाटील : राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. त्यानंतर नगरपरिषद, जिल्हा परिषद यांसारख्याही निवडणुका झाल्या. त्यातच आता पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुले झाले आहे. यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटात मोठी रस्सीखेच निर्माण झाली आहे. मिनी मंत्रालयाच्या चाव्या अनुभवी की तरुण सदस्याकडे द्यायच्या यावर पक्षात खल सुरू आहे. सत्तावाटपाचे सूत्र ठरविताना अनुभवी व तरुण चेहऱ्यांचा मेळ घातला जाऊ शकतो. इच्छुक सदस्यांनी वरिष्ठांकडे फिल्डिंग लावली आहे. मात्र, ऐनवेळी अजित पवार यांच्या धक्कातंत्राचा अवलंब केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महापालिका निवडणुका झाल्या. त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीच्या ऐन धामधुमीत तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाले. उमेदवार निवडीपासून विजयाची रणनीती ठरविण्यापर्यंत महत्त्वाचे टप्पे अजित पवार यांनी लिलया पेलले. मात्र, अखेरच्या टप्प्यात निवडणुकीवर दुखाचे सावट राहिले. राष्ट्रवादीने प्रचार न करताही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले. हा अजित पवार यांचाच करिष्मा होता. जनतेने राष्ट्रवादीच्या बाजूने कौल देत एकप्रकारे अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार आगामी राजकीय गणिते लक्षात घेऊन रणनीती आखायचे. जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीतून त्यांचा मुत्सद्दीपणा दिसून यायचा. त्यांनी निवड केलेल्या बहुतांशी पदाधिकाऱ्यांनी पुढे चमकदार कामगिरी केली आहे.

अनुभवी सदस्यांसह मातब्बर नेत्यांच्या वारसदारांचा प्रवेश

जिल्हा परिषद सभागृहात अनुभवी सदस्यांसह मातब्बर नेत्यांच्या वारसदारांनी प्रवेश केला आहे. अध्यक्षपदासाठी पक्षात रस्सीखेच निर्माण झाली आहे. सत्तावाटपाचे सूत्र ठरविताना अनुभवी व तरुण चेहऱ्यांचा मेळ घातला जाऊ शकतो. इच्छुक सदस्यांनी वरिष्ठांकडे फिल्डिंग लावली आहे. मात्र, ऐनवेळी अजित पवार यांच्या धक्कातंत्राचा अवलंब केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अनेकजण अध्यक्षपदाच्या शर्यतीत

दौंड तालुक्यातून अजित पवार यांचे विश्वासू सहकारी वरिचवळ जगदाळे, आंबेगाव तालुक्यातून माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे प्रदीप वळसे पाटील, शिरूर तालुक्यातून माजी आमदार अशोक पवार यांच्या पत्नी व पंचायत समितीच्या माजी सभापती सुजाता पवार, मुळशी तालुक्यातून शांताराम इंगवले, भोर तालुक्यातून माजी आमदार काशिनाथ खुटवड यांचे पुत्र विक्रम खुटवड, बारामतीतून पंचायत समिती माजी सभापती करण खलाटे यांच्या नावाचा विचार होऊ शकतो.

अजित पवारांची होती जिल्ह्याच्या राजकारणावर पकड

स्वर्गीय पवार यांनी आपल्या कुशल संघटन कौशल्यातून जिल्ह्याच्या राजकारणावर पकड निर्माण केली. त्यांच्या पश्चात पदाधिकारी निवड करताना पत्नी सुनेत्रा पवार यांचे कसब पणाला लागणार आहे. त्या अजित पवार यांच्या रणनीतीचा अवलंब करणार का? हे पहावे लागेल.

हेदेखील वाचा : Nanded News : नायगावच्या गावकऱ्यांच्या तोंडाचे पाणी पळाले! पाणीपट्टी थकबाकीमुळे नगरपंचायतीने पुरवठा केला बंद

Web Title: Rivalry within the ncp for the post of pune zilla parishad president

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 08:02 AM

Topics:  

  • pune news
  • ZP Election 2026

संबंधित बातम्या

पुण्यात वाढतेय मधमाश्यांसोबत सहजीवनाची नवी संकल्पना; काय आहे अर्बन बीकीपिंग’ची क्रेझ?
1

पुण्यात वाढतेय मधमाश्यांसोबत सहजीवनाची नवी संकल्पना; काय आहे अर्बन बीकीपिंग’ची क्रेझ?

Anganwadi scheme : अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव
2

Anganwadi scheme : अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

पुणे महापालिकेची सुरक्षा ऐरणीवर; आंदोलक आतपर्यंत पोहोचल्याने नगरसेवकांकडून सवाल उपस्थित
3

पुणे महापालिकेची सुरक्षा ऐरणीवर; आंदोलक आतपर्यंत पोहोचल्याने नगरसेवकांकडून सवाल उपस्थित

Maharashtra Breaking News Updates Today: जे झालं त्यासाठी माफी मागतो; अभिजीतने लाठीचार्ज झालेल्या विद्यार्थ्यांची माफी मागितली
4

Maharashtra Breaking News Updates Today: जे झालं त्यासाठी माफी मागतो; अभिजीतने लाठीचार्ज झालेल्या विद्यार्थ्यांची माफी मागितली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.