Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘1 मिनिट निसर्गासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी’; ‘शिवाजी पार्कचा विघ्नहर्ता’ देतोय मोलाचा संदेश

आजच्या धकाधकीच्या आणि वेगवान जीवनशैलीमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या तोंडी एकच वाक्य नेहमी ऐकायला मिळते - 'वेळच मिळत नाही'. कुटुंबासाठी वेळ नाही, निसर्गासाठी वेळ नाही, समाजासाठी वेळ नाही, स्वतःसाठीही वेळ नाही.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 16, 2026 | 08:16 AM
'1 मिनिट निसर्गासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी'; 'शिवाजी पार्कचा विघ्नहर्ता' देतोय मोलाचा संदेश

'1 मिनिट निसर्गासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी'; 'शिवाजी पार्कचा विघ्नहर्ता' देतोय मोलाचा संदेश

Follow Us
Follow Us:

मुंबई : गणपती बाप्पा म्हणजे बुद्धी, कसब व समृद्धीचे प्रतीक. या देवतेचा उत्सव आपण नेहमीच उत्साह, आनंद आणि भक्तीभावाने साजरा करतो. यावर्षी आपल्या मंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला ५३ वर्षे पूर्ण होत असून, ‘शिवाजी पार्कचा विघ्नहर्ता’ या नावाने हा उत्सव दादर येथे सर्वत्र प्रसिद्ध आहे.

गणेशोत्सवाचा मूळ हेतू केवळ धार्मिक उत्सव साजरा करणे नसून, सामाजिक प्रबोधन घडवणे हा आहे. आपल्या मंडळाचा समाजातील विविध प्रश्नांकडे सकारात्मक आणि विधायक दृष्टिकोनातून पाहत, गणेशोत्सवाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा मंडळाचा सातत्यपूर्ण प्रयत्न राहिला आहे. आजच्या धकाधकीच्या आणि वेगवान जीवनशैलीमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या तोंडी एकच वाक्य नेहमी ऐकायला मिळते – ‘वेळच मिळत नाही’. कुटुंबासाठी वेळ नाही, निसर्गासाठी वेळ नाही, समाजासाठी वेळ नाही, स्वतःसाठीही वेळ नाही. मात्र, जर आपण आपल्या दिवसातील केवळ एक मिनिट योग्य कारणासाठी दिले, तर त्या एका मिनिटातून निर्माण होणारा बदल किती मोठा असू शकतो, याचा विचार करण्याची गरज आहे.

याच विचारातून यंदा ‘शिवाजी पार्कचा विघ्नहर्ता’ आपल्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून एक अत्यंत साधा, पण प्रभावी संदेश घेऊन आपल्या भेटीला येत आहे. ‘1 मिनिट निसर्गासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी’ ही संकल्पना आणि सजावट कलादिग्दर्शक डॉ. सुमित पाटील यांची आहे.

एक मिनिट मोठा वेळ नाही पण…

एक मिनिट म्हणजे फार मोठा वेळ नाही. पण कोट्यवधी लोकांनी आपल्या दिवसातील फक्त एक मिनिट निसर्गासाठी दिले, तर त्यातून निर्माण होणारा परिणाम निश्चितच मोठा असेल. दिवसातील केवळ एक मिनिट वीज वाचवण्यासाठी दिवे बंद करणे, एक मिनिट पाणी वाचवण्याचा संकल्प करणे, आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करणे, प्लास्टिकचा वापर टाळणे, जुन्या वस्तूंचा पुनर्वापर करणे, कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करणे, एखादे झाड जपणे किंवा लावणे, अन्नाची नासाडी टाळणे अशा छोट्या-छोट्या कृती प्रत्येक व्यक्तीने केल्या, तर त्या केवळ एका व्यक्तीपुरत्या मर्यादित राहत नाहीत.

संकल्पनेचा मुख्य उद्देश काय?

एक व्यक्ती एक मिनिट देईल, तर तो एक छोटासा प्रयत्न असेल. पण हजारो, लाखो आणि कोट्यवधी लोकांनी आपापला एक मिनिट दिला, तर त्या छोट्या-छोट्या प्रयत्नांची बेरीज एक मोठा सामाजिक आणि जागतिक बदल घडवू शकते. “माझ्या एका मिनिटाने काय फरक पडणार?” या विचाराऐवजी “मी माझे एक मिनिट दिले तर बदलाची सुरुवात माझ्यापासून होईल” हा विचार समाजात रुजवणे, हाच यंदाच्या संकल्पनेचा मुख्य उद्देश आहे.

विविध विषयांना संकल्पनेशी जोडण्यात आले

आपल्या सजावटीच्या माध्यमातून याच विचाराला विविध कल्पक आणि दृश्यात्मक स्वरूप देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. वीज बचत, पाणी संवर्धन, स्वच्छता, पुनर्वापर, पुनर्चक्रण, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकी अशा विविध विषयांना एका मिनिटाच्या संकल्पनेशी जोडण्यात आले आहे.

मंडळाचे खजिनदार म्हणाले…

आपला गणेशोत्सव हा केवळ सजावट, रोषणाई आणि उत्सवाचा सोहळा नसून, समाजाला काहीतरी सकारात्मक देण्याची एक संधी आहे. बाप्पाच्या चरणी नतमस्तक होताना आपल्या मनातही एखादा छोटासा सकारात्मक संकल्प रुजावा आणि तो आपल्या कृतीतून पुढे जावा, हीच ‘शिवाजी पार्कचा विघ्नहर्ता’ची भावना असल्याचे मंडळाचे खजिनदार दर्शन मुसळे यांनी सांगितले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देताना आपली सामाजिक बांधिलकीही मंडळाने सातत्याने जपली आहे.

Ganesh Visarjan: गणपती बाप्पाला निरोप देताना मागे वळून पाहू नये? या परंपरेमागचं सत्य तुम्हाला माहीत आहे का?

Web Title: 1 minute for nature for a bright future shivaji park cha vighnaharta conveys a valuable message

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2026 | 08:16 AM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2026

संबंधित बातम्या

Radhika Merchant Ambani’s Pink Kanjivaram Saree Look: गुलाबी कांजीवरम साडीत राधिका अंबानीचा शाही अंदाज; नृत्य करत जिंकली मन
1

Radhika Merchant Ambani’s Pink Kanjivaram Saree Look: गुलाबी कांजीवरम साडीत राधिका अंबानीचा शाही अंदाज; नृत्य करत जिंकली मन

Ganesh Visarjan: गणपती बाप्पाला निरोप देताना मागे वळून पाहू नये? या परंपरेमागचं सत्य तुम्हाला माहीत आहे का?
2

Ganesh Visarjan: गणपती बाप्पाला निरोप देताना मागे वळून पाहू नये? या परंपरेमागचं सत्य तुम्हाला माहीत आहे का?

Ganeshotsav 2026: यवतमाळ जिल्ह्यात ढोल-ताशांच्या गजरात बाप्पांचे उत्साहात आगमन
3

Ganeshotsav 2026: यवतमाळ जिल्ह्यात ढोल-ताशांच्या गजरात बाप्पांचे उत्साहात आगमन

Zee Marathi Artists Ganeshotsav: बाप्पाच्या आठवणींमध्ये रमले झी मराठीचे कलाकार; सांगितल्या घरातील परंपरा अन् खास अनुभव
4

Zee Marathi Artists Ganeshotsav: बाप्पाच्या आठवणींमध्ये रमले झी मराठीचे कलाकार; सांगितल्या घरातील परंपरा अन् खास अनुभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.