Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganesh Visarjan: गणपती बाप्पाला निरोप देताना मागे वळून पाहू नये? या परंपरेमागचं सत्य तुम्हाला माहीत आहे का?

Ganesh Visarjan: गणपती बाप्पाच्या विसर्जनानंतर मागे वळून पाहू नये, अशी परंपरा अनेक घरांमध्ये पाळली जाते. मात्र, या प्रथेमागे नेमकं कारण काय आहे? बाप्पाला निरोप दिल्यानंतर मागे वळून पाहणं अशुभ मानलं जातं का? असे प्रश्न अनेक भक्तांच्या मनात निर्माण होतात.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 15, 2026 | 05:40 PM
Ganesh Visarjan: गणपती बाप्पाला निरोप देताना ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Ganesh Visarjan: गणपती बाप्पाला निरोप देताना ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • विसर्जनानंतर मागे न पाहण्याची प्रथा भावनिक निरोपाशी जोडली जाते.
  • बाप्पा संकटं दूर करतो, अशी एक लोकमान्यता आहे.
  • मागे वळून पाहिल्याने दोष लागतो, याचा ठोस शास्त्रीय आधार दिलेला नाही.
  • श्रद्धा आणि परंपरेनुसार विसर्जनाचा विधी करावा.
गणपती बाप्पा आले की घरात किती आनंद असतो. ढोल ताशे, आरती, मोदक, सगळं कसं भरलेलं वाटतं. पण जसा विसर्जनाचा दिवस जवळ येतो तसं मन जड होतं. दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस किंवा दहा दिवस बाप्पा आपल्या घरी असतो आणि मग त्याला निरोप द्यावा लागतो. तो क्षण खरंच खूप भावनिक असतो.प्रत्येक घरात विसर्जनाची पद्धत वेगवेगळी असते. कोणी उत्तरपूजा करतो, कोणी आरती करतो, नैवेद्य दाखवतो, अक्षता वाहतो आणि मग “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” चा जयघोष करत बाप्पाला निरोप देतो.

पण विसर्जनाच्या वेळी एक प्रश्न सगळ्यांनाच पडतो – बाप्पाचं विसर्जन केल्यानंतर मागे वळून पाहावं की नाही? मोठी माणसं नेहमी सांगतात की विसर्जन झाल्यावर मागे वळून बघू नका. पण असं का सांगतात? यामागे शास्त्र आहे की फक्त एक समज आहे? चला आज हेच जाणून घेऊया. Ganesh Visarjan:

मागे वळून न पाहण्यामागची भावना काय?

पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे भावनिक. बाप्पा 10 दिवस आपल्या घरात असतो. आपण त्याची रोज पूजा करतो, त्याच्याशी बोलतो. तो आपल्या घरातलाच एक झाला असतो. त्याला पाण्यात निरोप देताना मनात खूप वाईट वाटतं. जर आपण विसर्जनानंतर परत मागे वळून पाहिलं तर तो मोह सुटत नाही. मनात सारखं वाटत राहतं की बाप्पाला अजून थोडा वेळ ठेवूया.म्हणून मोठी माणसं सांगतात की एकदा निरोप दिला की मागे वळू नका. मोहात अडकू नका. बाप्पा गेलाय हे मनाला समजवा आणि पुढच्या वर्षी तो परत येणार या आनंदात घरी जा.

दुसरं कारण काय सांगतात?

दुसरी एक मान्यता अशी आहे की, बाप्पा जाताना आपल्या घरातलं दुःख, अडचणी, संकटं सगळं सोबत घेऊन जातो. तो विघ्नहर्ता आहे. आपली सगळी विघ्नं तो दूर करतो.जर आपण विसर्जनानंतर मागे वळून पाहिलं तर आपण त्या दुःखांना परत बोलावतो असं मानलं जातं. म्हणून सांगतात की बाप्पा गेल्यावर मागे बघू नका, सरळ घरी जा. जेणेकरून घरातली नकारात्मकता पण त्याच्यासोबत जाईल आणि नवीन आशा घेऊन तुम्ही घरी याल.

Kneaded Dough Finger Marks: कणीक भिजवल्यावर बोटांचे छाप का सोडले जातात? पितर आणि सुखसमृद्धीशी जोडली मान्यता

शास्त्रात काय सांगितलं आहे?खरं सांगायचं तर कोणत्याही मोठ्या ग्रंथात असं लिहिलेलं नाही की मागे वळून पाहिलं तर पाप लागेल किंवा दोष लागेल. हा नियम नाही, ही एक लोकपरंपरा आहे. पूर्वीपासून चालत आलेली एक प्रथा आहे.जसं आपण एखाद्या पाहुण्याला स्टेशनवर सोडायला जातो आणि तो गेल्यावर जास्त वेळ तिथे उभे राहत नाही, तसंच आहे हे. एकदा निरोप दिला की विषय संपला. मनात त्याचाच विचार करत बसू नका.

Gauri Ganpati 2026: गौरी आगमनाचा शुभ मुहूर्त कोणता? पहिल्यांदा गौरी बसवणाऱ्यांसाठी संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर

मग नक्की काय करावं?

विसर्जनाच्या दिवशी बाप्पाची मनोभावे उत्तरपूजा करा. त्याला आवडणारा नैवेद्य दाखवा, आरती करा. विसर्जन करताना “पुढच्या वर्षी लवकर या” असं मनापासून म्हणा.बाप्पा पाण्यात विसर्जित केल्यानंतर नमस्कार करा आणि मागे न वळता घरी या. घरी आल्यावर हातपाय धुवा आणि घरातली थोडी साफसफाई करा. असं मानतात की बाप्पा गेल्यावर घरात पुन्हा सकारात्मकता येते.शेवटी काय, हा श्रद्धेचा विषय आहे. मागे वळून पाहणं किंवा न पाहणं याने बाप्पा रागावत नाही. तो तर आपला लाडका आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे निरोप देताना मनात भाव असला पाहिजे. बाप्पा जाताना पुढच्या वर्षी लवकर येण्याचं वचन घेऊन जातो, हाच विचार मनात ठेवा.

Web Title: Ganpati visarjan looking back after immersion belief and truth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2026 | 05:40 PM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2026
  • Ganpati Festival
  • Marathi News

संबंधित बातम्या

Japan News : वयाची शंभरी आता नवी गोष्ट नाही! जपानमध्ये १ लाखांहून अधिक शतकवीर
1

Japan News : वयाची शंभरी आता नवी गोष्ट नाही! जपानमध्ये १ लाखांहून अधिक शतकवीर

iPhone 18 Pro vs Mutual Funds: नवीन iPhone 18 चा मोह टाळा, म्युच्युअल फंडात पैसे गुंतवा! ५ वर्षांत किती होऊ शकतो पैशांचा खेळ?
2

iPhone 18 Pro vs Mutual Funds: नवीन iPhone 18 चा मोह टाळा, म्युच्युअल फंडात पैसे गुंतवा! ५ वर्षांत किती होऊ शकतो पैशांचा खेळ?

Ganeshotsav 2026: यवतमाळ जिल्ह्यात ढोल-ताशांच्या गजरात बाप्पांचे उत्साहात आगमन
3

Ganeshotsav 2026: यवतमाळ जिल्ह्यात ढोल-ताशांच्या गजरात बाप्पांचे उत्साहात आगमन

Global Economy : तेलाच्या वाढत्या दरांचा रुपयावर दबाव; डॉलरसमोर रुपया कमजोर
4

Global Economy : तेलाच्या वाढत्या दरांचा रुपयावर दबाव; डॉलरसमोर रुपया कमजोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.