Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पितृ पक्षाच्या दुसऱ्या दिवशी श्राद्ध करण्यासाठी 3 मुहूर्त, या पद्धतीने पितरांचे श्राद्ध करावे

भाद्रपदातील संपूर्ण वद्य पक्ष हा पूर्वजांसाठी समर्पित करण्यात आला आहे. या पक्षात पितरांचे स्मरण करून त्यांचे पूजन केले जाते म्हणून याला पितृपक्ष, श्राद्धपक्ष किंवा पितृ पंधरवडा असे म्हटले जाते. दरवर्षी भाद्रपद पौर्णिमेपासून पितृपक्ष सुरु होते. यावर्षी पितृपक्षाचा दुसरा दिवस गुरुवार, 19 सप्टेंबर आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 19, 2024 | 08:36 AM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us
Close
Follow Us:

सनातन धर्मात दरवर्षी भाद्रपद पौर्णिमेपासून पितृपक्ष सुरु होते. यावर्षी पितृपक्षाच्या दिवशी दुसऱ्या दिवशीचे श्राद्ध गुरुवारी होणार आहे. यावर्षी पितृ पक्ष पौर्णिमा तिथीपासून सुरू होत असून 2 ऑक्टोबरच्या अमावास्येपर्यंत चालणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार, पितृ पक्षात पितृलोकापासून पूर्वज पृथ्वीवर येतात. यावेळी श्राद्ध केल्याने पितर प्रसन्न होतात आणि घरातील सदस्यांना आशीर्वाद देतात. पितृ पक्षाच्या दुसऱ्या दिवशी श्राद्ध करण्याचा शुभ मुहूर्त आणि श्राद्ध करण्याची सोपी पद्धत जाणून घेऊया.

पितृ पक्षाचा दुसरा दिवस आज

आज 19 सप्टेंबर रोजी पितृपक्षाचा दुसरा दिवस म्हणजेच द्वितीया श्राद्ध तिथी असेल. पंचांगानुसार, द्वितीय श्राद्धासाठी शुभ मुहूर्त जाणून घेऊया.

द्वितीया तिथी सुरुवात 19 सप्टेंबर रोजी 4.19 वाजता

द्वितीया तिथी समाप्ती 20 सप्टेंबर रोजी रात्री 12.39

कुतूप मुहुर्त सकाळी 11.50 ते दुपारी 12.39

कालावधी 00 तास 49 मिनिट

रोहिणी मुहूर्त 12.39 ते 1.28

दुपारची वेळ 1.28 ते 3.54

कालावधी 2 तास 27 मिनिट

हेदेखील वाचा- प्लास्टिक किंवा लाकडी कंगवा कोणता वापरणे अधिक फायदेशीर?

असे तर्पण द्या

पितरांना अर्पण केलेल्या पाण्यात काळे तीळ, जव, चंदन, अक्षत इत्यादी मिसळावे. श्राद्ध विधीत तीळ सोबत पाणी घेऊन पितृतीर्थाच्या बाजूने पिंडावर सोडल्यास पितरांना समाधान मिळते. पितृ पक्षाच्या काळात पंचबली देवतांना अन्न अर्पण करणे, गवत, कुत्रे, कावळे आणि मुंग्या वाढवणे खूप शुभ मानले जाते.अन्नाचा पहिला तुकडा गाईसाठी, दुसरा पक्ष्यासाठी आणि तिसरा कुत्र्यासाठी घ्यावा. ज्या दिवशी श्राद्ध असेल त्या दिवशी दोन्ही दरवाजांवर थंड पाणी शिंपडून पितरांच्या आगमनाची तयारी करावी. योग्य ब्राह्मणाला अन्न, वस्त्र इत्यादी देऊन नंतर निरोप द्यावा. पितरांच्या आत्मा शांतीसाठी श्राद्ध, तर्पण आणि पिंडदानाचे कार्य केले जाते.

हेदेखील वाचा- इलेक्ट्रिक किटलीवरील पाण्याच्या खुणा सतत राहतात का? जाणून घ्या सोप्या टिप्स

श्राद्ध करण्याची सोपी पद्धत

ज्या दिवशी पितरांचे श्राद्ध करायचे असेल त्या दिवशी लवकर उठावे.

आंघोळ झाल्यानंतर स्वच्छ कपडे घालावे.

गाईच्या शेणाचा लेप करून आणि गंगाजल वापरून पूर्वजांचे स्थान पवित्र करा.

महिलांनी आंघोळ केल्यानंतर पितरांसाठी जेवण बनवावे.

श्राद्धाच्या जेवणासाठी ब्राम्हणाला आधीच आमंत्रण द्या

ब्राम्हणाच्या आगमनानंतर त्यांच्याकडून पितरांची पूजा आणि तर्पण करुन घ्या.

पित्तरांचे नाव घेऊन श्राद्ध करण्याचा संकल्प करा.

पाण्यामध्ये काळे तीळ टाकून पितरांना तर्पण करा

पितरांसाठी अग्नीत गाईचे दूध, तूप, खीर आणि दही अर्पण करा.

तांदळाचे गोळे करून पितरांना अर्पण करा.

ब्राह्मणाला पूर्ण आदराने भोजन द्यावे.

आपल्या क्षमतेनुसार दान दक्षिणा द्या

यानंतर त्यांचे आशीर्वाद घ्या

श्राद्धामध्ये पितरांव्यक्तिरिक्त कावळा, देव, गाय, मुंगी यांना अन्न देण्याची व्यवस्था आहे.

Web Title: 3 muhurtas to perform shraddha on the second day of pitru paksha know how to perform

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2024 | 04:55 AM

Topics:  

  • dharm
  • Pitrupaksha

संबंधित बातम्या

Zodiac Sign: रुचक राजयोगामुळे मिथुन आणि सिंह राशीसह या राशीच्या लोकांच्या सुख समृद्धीमध्ये होईल वाढ
1

Zodiac Sign: रुचक राजयोगामुळे मिथुन आणि सिंह राशीसह या राशीच्या लोकांच्या सुख समृद्धीमध्ये होईल वाढ

Numerology: मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
2

Numerology: मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Grahan Yog 2025: केतू आणि चंद्राच्या युतीमुळे तयार होणार ग्रहण योग, या राशीच्या लोकांनी राहावे सावध
3

Grahan Yog 2025: केतू आणि चंद्राच्या युतीमुळे तयार होणार ग्रहण योग, या राशीच्या लोकांनी राहावे सावध

Vrishchik Sankranti 2025: वृश्चिक संक्रांतीला काय करावे आणि काय करू नये? जाणून घ्या यामागील नियम
4

Vrishchik Sankranti 2025: वृश्चिक संक्रांतीला काय करावे आणि काय करू नये? जाणून घ्या यामागील नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.