Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

400 वर्षांचं रहस्य; नवसाला पावणारी भराडी देवी, आंगणेवाडीच्या जत्रेचं काय आहे वैशिष्ट्यं ?

गावातल्या उत्सवासाठी देवी कौैल देते आणि मग मुंबईकर चाकरमान्यांना वेध लागतात ते गावच्या उत्सवाचे. भराडी देवीची जत्रा इतकी प्रसिद्ध का आहे हे जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 15, 2025 | 07:17 PM
400 वर्षांचं रहस्य; नवसाला पावणारी भराडी देवी, आंगणेवाडीच्या जत्रेचं काय आहे वैशिष्ट्यं ?
Follow Us
Close
Follow Us:
  • आंगणेवाडीच्या जत्रेचं काय आहे वैशिष्ट्यं ?
  • नवसाला पावणारी भराडी देवी
  • कोकणातलं जागृत देवस्थान
नारळी पोफळीच्या बागा, समुद्राची गाज, कौलारु घरं असं देखणं रुप कोकणातल्या प्रत्येक गावाचं पाहायला मिळतं. इतिहास, निसर्ग सौंदर्ययाच प्रमाणे कोकण प्रसिद्ध आहे धार्मिक कारणासाठी देखील. मग रत्नागिरीचं गणपतीपुळे असो किंवा देवगडचा कुणकेश्वर. देवस्थानाबरोबर आणखी एक जागृत देवस्थान महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे ते म्हणजे आंगणेवाडीची भराडीदेवी. सिंधुदुर्गच्या मसुरे गावातील आंगणेवाडीची जत्रा हा कायमच आकर्षणाचा विषय ठरतो याला कारण देखील तसंच आहे. 400 वर्षांचं रहस्य आणि नवसाला पावणारी भराडी देवीची जत्रा कायमच पर्यटकांना भुरळ घालतं. असं म्हणतात की गावातल्या उत्सवासाठी देवी कौैल देते आणि मग मुंबईकर चाकरमान्यांना वेध लागतात ते गावच्या उत्सवाचे. भराडी देवीची जत्रा इतकी प्रसिद्ध का आहे हे जाणून घेऊयात.

गावकऱ्याला दृष्टांत

कोकणातल्या धार्मिक उत्सवांपैकी एक म्हणजे भराडी देवीची उत्सव. या उत्सवासाठी आजुबाजूच्या गावातील गावकरी तसंच चाकरमानी देखील येतातच येतात. असं म्हटलं जातं की, सुमारे 400 वर्षांपूर्वी एका गावकऱ्याला दृष्टांत झाला. या गावकऱ्याची गाय रानात जाऊन एका पाषाणावर पान्हा सोडायची. एकदा या गावकऱ्याने तिच्यावर पाळत ठेवली. गायीने पान्हा सोडला तेव्हा तो पाषाण सजीव झाल्याचं दिसलं. त्या पाषाणात देवीचा अंश असल्याचा भास झाला. हा परिसर म्हणजे मसुरे गावातील भराड.

तुळजाभवानीचा अंश

याभागत प्रकट झालेली आणि गावचं रक्षण करणारी देवी म्हणजे भराडी देवी म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध झाली. असं म्हटलं जातं की, भराडी देवी ही आई तुळजा भवानीचं रुप आहे. तुळजाभवानी कोकणातल्या भूमीवर भराडी देवीचं रुप घेऊन प्रकटली.

याचबरोबर एक अशीही गोष्ट सांगितली जाते की, पेशवे कुळातील चिमाजी आप्पा यांनी भराडी देवीचं दर्शन घेतलं आणि त्यांच्यावर देवी प्रसन्न झाली. परकिय सत्तांशी लढताना पेशव्यांना विजय प्राप्त झाला. देवीआईची कृपा फळाला आली म्हणून पेशव्यांनी 22 हजार एकर जमीन देवीच्या मंदिरासाठी दान केली आणि बघता बघता भराडी देवी ही नवसाला पावणारी देवी म्हणून तिचा महिमा महाराष्ट्र आणि इतर राज्यात पसरु लागला.

त्राहिमाम! ‘या’ मंदिरातून निघणार भयावह चित्कार कलियुगाचा अंत, आवाजाने मरतील असंख्य लोक; ‘या’ राज्यात आहे दैवीस्थान

भराडी देवीची उत्सव

उत्सवासाठी देवीला कौैल लावला जातो. देवीने कौैल दिल्याच्या नंतरच उत्सवाची तारिख ठरते. काही दंतकथेनुसार असं देखील सांगितलं जातं की, तांदळाच्या वड्यांमधून भराड या ठिकाणी प्रकट झाली. तांदळाचे वडे हे कोकणातलं पारंपरिक पदार्थ आहे. म्हणूनच देवीच्या उत्सवाला प्रसाद म्हणून तांदळाचे वडे दिले जातात. नवसाला पावणारी देवी असल्याने कोकणासह, महाराष्ट्र, कर्नाटक आणि देशातल्या इतर भागातूनही भाविक उपस्थित राहतात. आंगणेवाडीचा हा उत्सव केवळ दीड दिवस असतो मात्र लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात.

भगवान शंकराला भस्म का लावतात? भस्म आरतीची ही कथा तुम्हाला माहितेय का ?

💡

Frequently Asked Questions

  • Que: आंगणेवाडीची भराडी देवी कुठे आहे?

    Ans: आंगणेवाडीची भराडी देवी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मसुरे गावातील भराड या परिसरात आहे. हे कोकणातील एक जागृत देवस्थान मानले जाते.

  • Que: भराडी देवीची जत्रा किती जुनी आहे?

    Ans: भराडी देवीच्या जत्रेचा इतिहास सुमारे ४०० वर्षांचा असल्याचे मानले जाते. त्यामुळे ही जत्रा कोकणातील अत्यंत प्राचीन आणि प्रसिद्ध उत्सवांपैकी एक आहे.

  • Que: जत्रेची तारीख कशी ठरते?

    Ans: भराडी देवीच्या उत्सवासाठी देवीला कौल लावला जातो. देवीकडून कौल मिळाल्यानंतरच जत्रेची तारीख निश्चित केली जाते. त्यामुळे दरवर्षी जत्रेची तारीख वेगळी असते.

Web Title: 400 year old secret the goddess bharadi who is celebrating her birthday is at the anganwadi jatra in sindhudurg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 15, 2025 | 07:17 PM

Topics:  

  • hindu religion
  • Sindhudurg

संबंधित बातम्या

Astro Tips : अशुभ काळ सुरु होतोय ; खरमासमध्ये कशी घ्याल स्वत: ची काळजी?
1

Astro Tips : अशुभ काळ सुरु होतोय ; खरमासमध्ये कशी घ्याल स्वत: ची काळजी?

भगवान शंकराला भस्म का लावतात? भस्म आरतीची ही कथा तुम्हाला माहितेय का ?
2

भगवान शंकराला भस्म का लावतात? भस्म आरतीची ही कथा तुम्हाला माहितेय का ?

ऐकावं ते विशेष; देशातील एकमेव मंदिर जिथे होते शस्त्रांची होते पूजा, काय आहे याचं रहस्य
3

ऐकावं ते विशेष; देशातील एकमेव मंदिर जिथे होते शस्त्रांची होते पूजा, काय आहे याचं रहस्य

Sindhudurg : शेतकऱ्यांना मिळणारी भरपाई तुटपुंजी, शेतकरी नाखूश
4

Sindhudurg : शेतकऱ्यांना मिळणारी भरपाई तुटपुंजी, शेतकरी नाखूश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.