
फोटो सौजन्य सोशल मीडिया
दरम्यान, महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगानेही या प्रकरणाची दखल घेतली आहे. आयोगाच्या सदस्या गीतांजली बूटी मंगळवारी तपासाचा आढावा घेणार आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला कामठीतील खासगी जेईई-नीट शिकवणी वर्गात कार्यरत आहे. जुलै महिन्यात तिने स्वतःचे अश्लील फोटो आणि व्हीडिओ तयार करून शिकवणी वर्गातील अनेक अल्पवयीन विद्यार्थ्यांना व्हॉट्स अॅपसह समाजमाध्यमांद्वारे पाठविल्याचा आरोप आहे. या प्रकरणात नेमके किती विद्यार्थी प्रभावित झाले आणि ही सामग्री पुढे कोणाकोणापर्यंत पोहोचली,याचा तपास पोलिस करीत आहेत.
Nagpur News : अधिवेशनाच्या लगबगीत दुष्काळी उपाययोजना रखडल्या; १२८ गावे क्रिटिकल झोनमध्ये
जुनी कामठी पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांनाही तपास अधिकाऱ्यांना आवश्यक कागदपत्रांसह आयोगाच्या सदस्या गीतांजली बूटी यांच्यासमोर उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आयोगाच्या आढाव्यादरम्यान आतापर्यंत किती विद्यार्थ्यांची ओळख पटविण्यात आली, प्रभावित विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी कोणती पावले उचलली आणि तपासाची सद्यस्थिती काय आहे, याची माहिती घेतली जाणार आहे. तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी आवश्यक उपाययोजनांवरही चर्चा होणार आहे.
१३ नोव्हेंबर रोजी बालसाहाय्य हेल्पलाइन क्रमांक १०९८ वर या प्रकरणाची तक्रार प्राप्त झाली होती. जिल्हा बालसंरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण यांनी प्राथमिक चौकशीचे निर्देश दिले. बालसाहाय्य कक्षाच्या प्रकरण पर्यवेक्षिका पूजा कांबळे आणि पथकातील सदस्या मीनाक्षी धडाडे यांनी उपलब्ध पुराव्यांची प्राथमिक पडताळणी केली.
त्यानंतर १४ नोव्हेंबर रोजी जुनी कामठी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी संबंधित महिलेविरुद्ध पोक्सो आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदविला. प्राथमिक तपासात काही छायाचित्रे आणि चित्रफितीही समोर आल्या आहेत.
या प्रकरणामागे संघटितपणे चालणारे लैंगिक शोषण किंवा ब्लॅकमेलिंगचे जाळे सक्रिय आहे का, याचीही पडताळणी केली जात आहे. काही अल्पवयीन विद्यार्थ्यांशी संबंधित कथित शारीरिक संबंधांच्या आरोपांचीही चौकशी सुरू आहे. मात्र, याची अद्याप पुष्टी झालेली नाही.