Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News : अधिवेशनाच्या लगबगीत दुष्काळी उपाययोजना रखडल्या; १२८ गावे क्रिटिकल झोनमध्ये

Nagpur News : नागपुरात ७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी प्रशासनाने ३८६ कामांचे नियोजन केले आहे. मात्र, जिल्ह्यातील १२८ गावे क्रिटिकल झोनमध्ये असूनही दुष्काळ निवारणाची कामे रखडली आहेत. अधिवेशनाच्या ५०० कोटींच्या खर्चावरून निधीच्या प्राधान्यक्रमाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Nov 17, 2026 | 03:49 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • अधिवेशनासाठी प्रशासनाची जोरदार तयारी; ३८६ कामांचे नियोजन
  • नागपूर जिल्ह्यातील १२८ गावे क्रिटिकल झोनमध्ये
  • ५०० कोटींच्या अधिवेशन खर्चावर प्रश्न; दुष्काळ निवारणासाठी निधीची मागणी
Nagpur News : राज्याच्या विधिमंडळाचे यावर्षीचे हिवाळी अधिवेशन हे ७ डिसेंबर पासून उपराजधानी नागपूर येथे सुरु होत आहे . या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा तयारीला लागली असून, अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या निवासापासून ते विविध सोयीसुविधांच्या नियोजनापर्यंत जोरदार हालचाली सुरू आहेत.

मात्र, दुसरीकडे विदर्भासह नागपूर जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असताना दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना अद्याप रखडल्या आहेत. जिल्ह्यातील तब्बल १२८ गावे क्रिटिकल झोनमध्ये असतानाही पहिल्या टप्प्यातील कामांना सुरुवात झालेली नाही. त्यामुळे अधिवेशनाच्या तयारीला मिळणारा वेग दुष्काळी उपाययोजनांना कधी मिळणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

अधिवेशनासाठी प्रशासनाची जोरदार तयारी; ३८६ कामांचे नियोजन

हिवाळी अधिवेशनासाठी मंत्र्यांसह प्रधान सचिव, सचिव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निवासाची व्यवस्था निश्चित करण्यात आली आहे. नागपुरातील प्रमुख हॉटेल्स तसेच विधिमंडळ सचिवालयातील निवासव्यवस्थांचे बुकिंग जवळपास पूर्ण झाले आहे. २३ नोव्हेंबरपासून वरिष्ठ अधिकारी नागपुरात दाखल होण्याची शक्यता असून, २५ नोव्हेंबरपासून अन्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आगमन सुरू होणार आहे.

अधिवेशनाच्या व्यवस्थेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तब्बल ३८६ कामांचे नियोजन केले आहे. निवासव्यवस्था, रस्ते, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि इतर सुविधांवर प्रशासनाचे लक्ष केंद्रित झाले आहे. अधिवेशनाच्या आयोजनासाठी सुमारे ५०० कोटी रुपयांहून अधिक खर्च अपेक्षित असल्याची चर्चा आहे. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय यंत्रणा सक्रिय असताना ग्रामीण भागातील दुष्काळाचा प्रश्न दुर्लक्षित होत असल्याची नाराजी व्यक्त होत आहे.

Chandrapur Earthquake : चंद्रपुरात दीड तासात दोन भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये घबराट, सुदैवाने जीवितहानी नाही

नागपूर जिल्ह्यातील १२८ गावे क्रिटिकल झोनमध्ये

नागपूर जिल्ह्यातील १२८ गावांचा समावेश क्रिटिकल झोनमध्ये करण्यात आला आहे. या गावांमध्ये पाणीटंचाई आणि जलसंकटाचा प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून संबंधित गावांना प्राथमिक भेटी देण्यात आल्या असून, जलसंवर्धन आणि पाणी उपलब्धतेसाठी आवश्यक सूचना विविध विभागांना देण्यात आल्या आहेत. मात्र, प्रत्यक्ष कामांना अद्याप सुरुवात झालेली नाही.

पहिल्या टप्प्यातील उपाययोजनांचा कृती कार्यक्रमही प्रत्यक्षात उतरलेला नाही. कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी आवश्यक असलेली निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नसल्याने कामांचा वेग मंदावला आहे. जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हा परिषदेला निधी उपलब्ध होत असतानाही प्रत्यक्ष कामे सुरू होण्यात विलंब होत आहे. त्यामुळे पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या गावांमधील नागरिकांना दिलासा मिळण्याची प्रतीक्षा कायम आहे.

Ahilyanagar News : ऊसदराचा प्रश्न पेटला; २३ नोव्हेंबरला खासदार राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

५०० कोटींच्या अधिवेशन खर्चावर प्रश्न; दुष्काळ निवारणासाठी निधीची मागणी

डिसेंबर महिना जलसंधारण आणि दुष्काळ निवारणाच्या कामांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या काळात जमिनीतील ओलावा टिकवणे, पाणीसाठा वाढवणे आणि जलस्रोतांचे पुनर्भरण करण्यासाठी कामे होणे आवश्यक असते. मात्र, याच काळात बहुतांश प्रशासकीय यंत्रणा हिवाळी अधिवेशनाच्या व्यवस्थेत व्यस्त राहणार असल्याने दुष्काळी कामे आणखी लांबणीवर पडण्याची भीती आहे.

एकीकडे अधिवेशनाच्या आयोजनावर ५०० कोटी रुपयांहून अधिक खर्च होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे, तर दुसरीकडे १२८ गावांमध्ये मूलभूत जलसंवर्धनाच्या कामांची प्रतीक्षा आहे. त्यामुळे अधिवेशनाच्या खर्चातून किंवा उपलब्ध निधीतून काही रक्कम दुष्काळ निवारणासाठी वळवावी, अशी मागणी पुढे येत आहे. अधिवेशनाच्या तयारीप्रमाणेच दुष्काळी उपाययोजनांनाही प्रशासनाने प्राधान्य द्यावे, अन्यथा उन्हाळ्यात या गावांमधील पाणीप्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.

Web Title: Nagpur news winter session drought cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 03:49 PM

Topics:  

  • drought news
  • Marathi News
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Swapna shastr̥a :तुमच्याही स्वप्नात या ५ गोष्टी दिसतायत का ? तर समजून घेऊया ‘त्या’ गोष्टी
1

Swapna shastr̥a :तुमच्याही स्वप्नात या ५ गोष्टी दिसतायत का ? तर समजून घेऊया ‘त्या’ गोष्टी

‘इतर पक्षांतील कार्यकर्त्यांना गुलाम समजतात’; संजय शिरसाटांचा आदित्य ठाकरेंवर आरोप
2

‘इतर पक्षांतील कार्यकर्त्यांना गुलाम समजतात’; संजय शिरसाटांचा आदित्य ठाकरेंवर आरोप

Thane News: ‘उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊतच पक्षात उरतील’; नरेश म्हस्केंचा खोचक टोला
3

Thane News: ‘उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊतच पक्षात उरतील’; नरेश म्हस्केंचा खोचक टोला

Amravati News: दिवाळीनंतर पुणे-मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची लूट! विद्यार्थ्यांकडून उकळले हजारो रुपये; ३५ ट्रॅव्हल्सवर कारवाई
4

Amravati News: दिवाळीनंतर पुणे-मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची लूट! विद्यार्थ्यांकडून उकळले हजारो रुपये; ३५ ट्रॅव्हल्सवर कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.