Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 17 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला आमरस पुरीचा नैवेद्य का दाखवला जातो? जाणून घ्या धार्मिक आणि आरोग्यदायी महत्त्व

अक्षय्य तृतीयेचा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. या दिवशी देवाची पूजाअर्चा केली जाते. त्यासोबतच आमरस-पुरीचा नैवेद्य देखील दाखवला जातो. आमरस-पुरीचा नैवेद्य दाखवण्यामागे काय आहे धार्मिक महत्त्व जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 19, 2026 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • अक्षय्य तृतीयेला आमरस पुरीचा नैवेद्य का दाखवतात
  • पितरांना नैवेद्य का दाखवतात
  • अक्षय्य तृतीयेला दान करण्याचे काय आहे महत्त्व
 

 

अक्षय्य तृतीयाचा दिवस म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. या पवित्र दिवशी दानधर्म करणे, कोणतेही शुभ काम करणे फलदायी मानले जाते. यादिवशी केलेल्या कामाचा क्षय होत नाही. त्यामुळेच या दिवशीचा मुहूर्त पाहून अनेक चांगल्या गोष्टींचा शुभारंभ केला जातो. पण या दिवशी आणखी दोन पद्धती आहेत. त्या म्हणजे आमरस पुरीचा नैवेद्य दाखवणे आणि पितरांना तृप्त करणे. अक्षय्य तृतीयेला आमरस-पुरीचा नैवेद्य दाखवणे आणि पितरांना तृप्त करण्याची काय आहे परंपरा जाणून घ्या

अक्षय्य तृतीयेला आमरस-पुरीचा बेत आणि पितरांना नैवेद्य देण्यामागे ऋतूचक्र, आरोग्य आणि धार्मिक परंपरा कारणीभूत आहेत. हा सण वैशाख महिन्यात येतो, जेव्हा आंबा पूर्णपणे पिकून रसाळ होतो आणि उष्णता वाढलेली असते. शरीराला थंडावा देण्यासाठी आमरस आणि पचनासाठी पुऱ्या हा परिपूर्ण आहार मानला जातो.

भारतीय संस्कृतीत प्रत्येक सण, प्रत्येक मुहूर्त आणि प्रत्येक खाद्यपरंपरेमागे एक सखोल सांस्कृतिक, ऋतूचक्राशी निगडित आणि आध्यात्मिक आशय दडलेला आहे. “आमरस–पुरीचे जेवण” आणि त्या दिवशी “पितरांना नैवेद्य ठेवण्याची प्रथा” हीदेखील अशीच बहुआयामी परंपरा आहे. ती केवळ चव किंवा रूढीपुरती मर्यादित नसून, निसर्ग, कुटुंबव्यवस्था आणि पूर्वजांप्रती कृतज्ञता यांचा संगम आहे.

आमरस पूरी सण-समारंभांमध्ये, खास करून अक्षय्य तृतीया किंवा इतर शुभ मुहूर्तांवर केले जाते. आंबा हा भारतीय संस्कृतीत “फळांचा राजा” मानला जातो. उन्हाळ्याच्या प्रारंभी आंबा पिकतो आणि त्याचवेळी अनेक शुभ कार्यांना प्रारंभ होतो. त्यामुळे आंब्याचा समावेश हा समृद्धी, नवीनतेचा प्रारंभ आणि आनंदाचे प्रतीक मानला जातो.

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला पूजा करताना या फुलाचा करा वापर, देवी लक्ष्मी आणि कुबेर देवांचा मिळेल आशीर्वाद

आमरस-पुरी जेवणाची कारणे

हंगामी फळ (Seasonal Fruit): या काळात आंबा बाजारात मुबलक आणि परिपक्व होतो. नवीन फळाचे स्वागत म्हणून पहिला मान आंब्याला दिला जातो‌. या दिवशी आंब्याचे पूजनही करून मग त्याचे आमरस केले जाते. तसेच त्याचे आरोग्यदायी लाभ ही आहेत.‌ उन्हाळ्यात शरीराला ऊर्जा आणि थंडावा देण्यासाठी आंब्याचा रस उत्तम असतो. यासोबत गव्हाच्या पुऱ्या पचनास मदत करतात. तसेच एक स्वादिष्ट जेवण होते.

पितरांना नैवेद्य का ठेवतात?

भारतीय संस्कृती पाउलो पावली कृज्ञता व्यक्त केली जाते. निसर्गाचे तर कधी पर्वत, वृक्ष, पाने, फुले, प्राणी यांच्या प्रति व्यक्त केली जाते. जसं भाद्रपद महिन्यात पितृपक्षात आपल्या पूर्वजांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते. तसेच आजच्या दिवशी ही पूर्वजांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अत्यंत पवित्र मानला जातो. नैवेद्याद्वारे पितरांना तृप्त करून त्यांच्या स्मृतीला उजाळा दिला जातो, जेणेकरून कुटुंबात सुख-समृद्धी राहते.

Astro Tips: देवाला गूळ फुटाणे अर्पण करण्यामागे काय आहे धार्मिक परंपरा, जाणून घ्या

दानाचे महत्त्व

या दिवशी दिलेल्या दानाचा किंवा अर्पण केलेल्या नैवेद्याचे पुण्य ‘अक्षय’ (कधीही न संपणारे) असते, असे मानले जाते. त्यामुळे या दिवशी थोडं तरी दान करावे, असे धर्मशास्त्रात सांगितले आहे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: अक्षय्य तृतीयेला आमरस-पुरी का अर्पण करतात?

    Ans: हा सण वैशाख महिन्यात येतो, जेव्हा आंबा पिकलेला असतो. त्यामुळे हंगामी फळ म्हणून आमरस अर्पण केला जातो आणि तो समृद्धी व आनंदाचे प्रतीक मानला जातो.

  • Que: आमरस-पुरीचा आरोग्यदृष्ट्या काय फायदा आहे?

    Ans: आमरस शरीराला थंडावा आणि ऊर्जा देतो, तर पुरी पचनास मदत करते. उन्हाळ्यात हा आहार संतुलित मानला जातो.

  • Que: आमरस-पुरी हा सात्विक नैवेद्य आहे का?

    Ans: होय, हा पूर्णपणे सात्विक आणि शुद्ध अन्न मानला जातो, जो देवाला अर्पण करण्यासाठी योग्य आहे.

Web Title: Akshaya tritiya why aamras puri is offered as naivedya know its religious and health significance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 07:05 AM

Topics:  

  • Akshaya Tritiya
  • Hindu Festival
  • hindu religion

संबंधित बातम्या

Ashada Gupta Navratri: आषाढ गुप्त नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी करा या देवीची पूजा, जाणून घ्या पूजा पद्धत
1

Ashada Gupta Navratri: आषाढ गुप्त नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी करा या देवीची पूजा, जाणून घ्या पूजा पद्धत

Shaiva vs Vaishnava: शैव आणि वैष्णव संप्रदायात नेमका काय फरक? जाणून घ्या दोन्ही परंपरांचे महत्त्व
2

Shaiva vs Vaishnava: शैव आणि वैष्णव संप्रदायात नेमका काय फरक? जाणून घ्या दोन्ही परंपरांचे महत्त्व

Kalidas Day: आषाढाच्या पहिल्या दिवशीच का साजरा केला जातो महाकवी कालिदास दिन
3

Kalidas Day: आषाढाच्या पहिल्या दिवशीच का साजरा केला जातो महाकवी कालिदास दिन

Mahaganpati Yajna: महागणपती यज्ञामुळे दूर होतात विघ्ने; मिळते सुख, समृद्धी आणि यश
4

Mahaganpati Yajna: महागणपती यज्ञामुळे दूर होतात विघ्ने; मिळते सुख, समृद्धी आणि यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.