
फोटो सौजन्य-pinterest
गणेश चतुर्थी हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक असून, तो भगवान गणेशाला समर्पित आहे. त्यांना विघ्नहर्ता म्हणून ओळखले जाते. धार्मिक श्रद्धेनुसार, भगवान गणेशाची पूजा केल्याने जीवनातील संकटे दूर होतात आणि सुख-समृद्धीचा आशीर्वाद मिळतो. आज अनंत चतुर्दशीचा संपूर्ण दिवस गणेश विसर्जनासाठी शुभ मानला जात असला तरी, विसर्जनासाठी दिवसभरात अनेक शुभ मुहूर्त उपलब्ध असतील असं ज्योतिषशास्त्रानुसार सांगण्यात येतं.
द्रिक पंचांगानुसार, २५ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनासाठी शुभ वेळ सकाळी ६:११ ते १०:४२ पर्यंत असेल. या काळात चर, लाभ आणि अमृत चोघडिया यांचा संयोग असतो. या काळात भक्त पूजा-अर्चा करून बाप्पाला निरोप देऊ शकतात.
जर सकाळी विसर्जन शक्य नसेल, तर गणपती बाप्पाला दुपारीही निरोप देता येतो. शुभ चोघडिया दुपारी १२:१३ ते १:४३ पर्यंत असेल. विसर्जनापूर्वी गणपतीची पूजा करणे, आरती करणे आणि भोग अर्पण करणे ही एक पारंपरिक प्रथा आहे.
संध्याकाळी मूर्तीचे विसर्जन करणाऱ्या भक्तांसाठी शुभ वेळ देखील उपलब्ध असेल. चार चौघडिया सायंकाळी ४:४४ ते ६:१४ पर्यंत असेल. या कालावधीत, विधी पार पाडून गणपतीचे विसर्जन करता येईल.
जर काही कारणास्तव दिवसा विसर्जन शक्य झाले नाही, तर रात्रीसुद्धा शुभ वेळ उपलब्ध आहे. लाभ चौघडिया रात्री ९:१४ ते १०:४३ पर्यंत असेल. या वेळीसुद्धा भक्तगण गणपती बाप्पाला भक्तिभावाने निरोप देऊ शकतात.
२५ सप्टेंबर रोजी सकाळपासून रात्रीपर्यंत गणपती विसर्जनासाठी अनेक शुभ चौघडिया उपलब्ध आहेत. भक्तगण आपल्या सोयीनुसार यापैकी कोणतीही वेळ निवडू शकतात. धार्मिक मान्यतेनुसार, विसर्जनापूर्वी गणपतीची अंतिम पूजा आणि आरती करणे शुभ मानले जाते. यानंतर, त्यांना आदराने निरोप दिला जातो.
विसर्जनाच्या वेळी बाप्पांना नैवेद्य दाखवून आरती केली जाते. त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती भक्तिभावाने विसर्जनासाठी नेली जाते. यावेळी ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष केला जातो. गणेशोत्सवातील भक्ती, आनंद आणि उत्साहाचा हा भावपूर्ण समारोप मानला जातो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)