Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 3 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Astro tips: देवासमोर दिवा लावताना या गोष्टी ठेवा लक्षात, जाणून घ्या धर्मशास्त्रातील नियम

प्रत्येक हिंदू धर्मातील व्यक्ती सकाळी वा सायंकाळी देवासमोर दिवा लावून देवाची पूजा करतो. दिवा लावल्याने मन प्रसन्न होते. अंधकार दूर होऊन वातावरण प्रकाशित होते. देवाजवळ दिवा लावणे हे धर्मशास्त्रात शुभ मानले जाते.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Mar 11, 2026 | 11:20 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • देवासमोर दिवा का लावतात
  • दिव्याची वात कोणत्या दिशेला असावी
  • धर्मशास्त्रामध्ये काय आहेत नियम
 

देवासमोर दिवा लावणे काय सांगितलं शास्त्रार्थ? दिव्यात किती वाती असावी, दिवा कोणत्या दिशेने लावावा. तुळशीपाशी दिवा लावण्यापूर्वी अक्षतांचे आसन अर्थात दिव्याखाली अक्षता ठेवाव्या? दिवा विझला तर काय करावे यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे धर्मशास्त्रामध्ये देण्यात आलेली आहे.

कोणत्याही पूजेची सुरुवात करण्यापूर्वीच सुरुवातीला एका बाजूला दिवा लावला जातो. पूजा करण्याचा घेतलेला संकल्प पूर्ण होईपर्यंत तेवत राहण्याचे, स्थिर राहण्याचे आवाहन अग्नी देवतेला केले जाते. यानंतर पूजा झाल्यानंतरही देवासमोर दिवा लावला जातो. देवासमोर दिवा लावल्याने लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिथे स्थिर होते, अशी मान्यता आहे. शुद्ध तुपाचा दिवा लावणे अत्यंत फायदेशीर मानले गेले आहे. शुद्ध तुपात वातावरणातील जंतू दूर करण्याची क्षमता असते. अशा तुपाचा जेव्हा अग्नीशी संबंध येतो; त्यावेळी वातावरण एकदम पवित्र होते. प्रदूषण दूर होते. दिवा लावल्याने संपूर्ण घराला त्याचा फायदा होतो.

Budh Margi: 25 मार्चपासून बुध होणार मार्गी, या राशीच्या लोकांना मिळेल कीर्ती आणि आर्थिक लाभ

वात कोणत्या दिशेला असावी

दिवा लावताना दिव्याची वात कोणत्या दिशेला असावी, याचेही काही नियम सांगण्यात आले आहेत. तेलाचा दिवा आपल्या डाव्या हाताला ठेवावा आणि तुपाचा दिवा आपल्या उजव्या हाताला असायला हवा. धनलाभासाठी दिव्याची वात उत्तर दिशेला ठेवावी. आपल्या घरामध्ये वारंवार कोणी आजारी पडत असल्यास दिव्याची वात पूर्व दिशेला ठेवावी. या दोन्ही दिशा अत्यंत शुभ मानण्यात आल्या आहेत. पश्चिम दिशेला दिव्याची वात असल्यास आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

दिव्यात किती वाती असाव्यात?

देवावर अंधार पडेल अशा ठिकाणी दीप ठेवू नये. अनेक वाती लावणे असल्यास विषम प्रमाणात म्हणजे १-३-५-७ अशा लावाव्यात. दीप लावताना त्यात वातीशिवाय थोडे तेल घालावे. निरंजनात तुप व तेल कधीही एकत्र घालू नये कारण तूप हे सत्व तत्व व निर्गुण आहे व तेल हे रज तत्व व सगुण आहे. म्हणून हे दोन्ही एकत्र करता येत नाही. नाहीतर तम तत्व वाढेल .

Guru Margi 2026: गुरू मार्गीनंतर या राशीच्या लोकांना मिळणार यश आणि काही राशीच्या लोकांना राहावे लागणार सावध

तुळशीपाशी दिवा लावण्यापूर्वी अक्षतांचे आसन अर्थात दिव्याखाली अक्षता ठेवाव्या. त्यावर आपल्या इच्छेनुसार तेल किंवा तुपाचा दिवा लावावा. देवी लक्ष्मी अक्षतांचे आसन ग्रहण करते, असे मानले जाते म्हणून अक्षता ठेवल्याने देवी विराजमान होते.

लावलेला दिवा विझला तर..

देवासमोर लावलेला दिवा विझला किंवा दिवा लावताना विझला, तर तो अशुभ संकेत मानले जाते. मात्र, धर्मशास्त्रात याला कोणताही आधार नाही. त्यामुळे दिवा विझल्यास घाबरून जाता कामा नये. देवाची आणि दिव्याची क्षमायाचना करून तो पुन्हा प्रज्वलित करावा. मात्र, दिवा ओवाळताना तो चुकून खाली पडला, तर त्यासाठी दीपपतन नावाची शांत करावी लागते. ज्या ठिकाणी दिवा पडला, त्याच ठिकाणी ती शांत करावी, असे सांगितले जाते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: देवासमोर दिवा लावण्याचे धार्मिक महत्त्व काय आहे?

    Ans: हिंदू धर्मात दिवा लावणे हे अत्यंत पवित्र मानले जाते. दिव्याचा प्रकाश अंधकार दूर करून सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो आणि देवतांची कृपा प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे.

  • Que: दिवा लावताना तुपाचा की तेलाचा दिवा लावावा?

    Ans: पूजेमध्ये शुद्ध तुपाचा दिवा अत्यंत शुभ मानला जातो. तसेच काही ठिकाणी तीळ किंवा मोहरीच्या तेलाचा दिवाही लावला जातो. मात्र तूप आणि तेल एकत्र वापरणे टाळावे असे सांगितले जाते.

  • Que: दिवा लावल्याने घरावर काय परिणाम होतो?

    Ans: नियमित दिवा लावल्याने घरातील वातावरण पवित्र आणि शांत राहते. तसेच घरात सकारात्मक ऊर्जा आणि मानसिक शांती वाढते, अशी धार्मिक मान्यता आहे.

Web Title: Astro tips follow these rules from the scriptures when lighting a lamp before god

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 11:20 AM

Topics:  

  • astro tips
  • astrology news
  • dharm
  • Religion

संबंधित बातम्या

Shravan 2026: श्रावण महिना दोनदा का येतो? जाणून घ्या उत्पत्ती, धार्मिक महत्त्व आणि शास्त्रीय कारण
1

Shravan 2026: श्रावण महिना दोनदा का येतो? जाणून घ्या उत्पत्ती, धार्मिक महत्त्व आणि शास्त्रीय कारण

Kalashtami 2026: मासिक कालाष्टमी कधी आहे? जाणून घ्या पूजा मुहूर्त, पूजाविधी आणि महत्त्व
2

Kalashtami 2026: मासिक कालाष्टमी कधी आहे? जाणून घ्या पूजा मुहूर्त, पूजाविधी आणि महत्त्व

Shivlilamrut Chapter 10: शिवलीलामृताच्या दहाव्या अध्यायात काय आहे? जाणून घ्या उमामहेश्वर व्रताचे महत्त्व
3

Shivlilamrut Chapter 10: शिवलीलामृताच्या दहाव्या अध्यायात काय आहे? जाणून घ्या उमामहेश्वर व्रताचे महत्त्व

Budh Gochar 2026: बुधाच्या राशीबदलामुळे या राशींच्या जीवनात होतील सकारात्मक बदल
4

Budh Gochar 2026: बुधाच्या राशीबदलामुळे या राशींच्या जीवनात होतील सकारात्मक बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.