फोटो सौजन्य- pinterest
देवी लक्ष्मीला धनाची देवी मानले जाते. हा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित आहे. या दिवशी देवीची मनोभावे पूजा केल्याने साधकाला अपेक्षित फळ मिळते असे म्हटले जाते. शास्त्रानुसार, शुक्रवारी असे काही उपाय केल्यास तुमचे नशीब बदलू शकते आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वादही तुमच्यावर कायम राहतो. त्यामुळे शुक्रवारच्या दिवशी वेलचीचे उपाय केल्यास तुमच्यावर असलेले कर्जाचे आणि इतर संकट, समस्या दूर होतात, अशी मान्यता आहे. शुक्रवारी वेलचीचे कोणते उपाय करायचे, जाणून घ्या.
जर तुम्हाला जीवनात पैशाची कमतरता भासत असेल तर शुक्रवारी सकाळी लवकर उठून सर्व आवरुन झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करावे. शुक्रवारी देवी लक्ष्मीसमोर दिवा तिची विधीवत पूजा करावी. त्यानंतर 5 वेलची घेऊन त्यावर हळद आणि सिंदूर लावून ते देवीला अर्पण करावे. नंतर संध्याकाळी देवीची पूजा करुन वेलची उचलून स्वच्छ लाल कपड्यात बांधून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवावी. या उपायामुळे तुमच्या पैशाच्या संबंधित असलेल्या समस्या दूर होतील.
धनाची देवी लक्ष्मी असल्याने या दिवशी वेलचीचे हे उपाय करुन बघा. जर तुम्ही दीर्घकाळापासून कर्जाचा सामना करत असाल तर शुक्रवारी देवी लक्ष्मीच्या समोर 5 वेलची ठेवा. संध्याकाळी पूजा करुन झाल्यानंतर वेलची उचलून तुमच्या पर्स किंवा खिशात ठेवा यामुळे व्यक्तीची कर्जातून सुटका होण्यास मदत होईल आणि तुम्हाला आर्थिक लाभ होताना दिसून येतील. असे मानले जाते की, शुक्रवारी वेलचीचे उपाय केल्याने देवी लक्ष्मीचा साधकावर विशेष आशीर्वाद राहतात.
जर तुमच्या जीवनामध्ये वारंवार अडचणी येत असतील किंवा तुमची कामं पूर्ण होत नसतील तर शुक्रवारी वेलचीचा हा उपाय नक्की करुन बघा. शुक्रवारी संध्याकाळी 5 ते 7 हिरव्या वेलची उशीखाली ठेवून झोपा दुसऱ्या दिवशी त्या सकाळी वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्या. हा उपाय सलग 7 शुक्रवार करा. हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होईल. तसेच तुमच्या कामामध्ये येत असलेले अडथळे दूर होतील आणि तुम्हाला नशिबाची साथ मिळेल.
या लोकांनी सकाळी लवकर उठून सर्व आवरुन झाल्यावर गुलाबी रंगाचे कपडे परिधान करणे शुभ मानले जाते. या लोकांनी देवी लक्ष्मीला 7 वेलची अर्पण करुन ‘ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्म्यै नमः’ या मंत्रांचा जप करावा. हे व्यक्तीला जीवनात यशस्वी होण्यासाठी फायदेशीर ठरेल. त्यानंतर विधीनुसार देवीची पूजा करुन ते लाल कपड्यात बांधून ठेवावे. ही बांधलेली पुडी कामाच्या ठिकाणी जाताना सोबत घेऊन जा. त्यामुळे तुमच्या कामात येणारे अडथळे दूर होतील. व्यवसाय करणाऱ्या लोकांची देखील व्यवसायात प्रगती होईल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)