फोटो सौजन्य- pinterest
चंद्र देव शुक्रवार, 20 मे रोजी मेष राशीमध्ये आपले संक्रमण करणार आहे. चंद्राच्या या राशी परिवर्तनाचा तुम्हाला सकारात्मक परिणाम होईल. कोणत्या राशीच्या लोकांना वाईट परिणामांना सामोरे जावे लागेल.
शुक्रवार, 20 जून रोजी चंद्र देव मेष राशीमध्ये संक्रमण करणार आहे. हे परिवर्तन शुक्रवारी रात्री 9.44 वाजता होणार आहे. चंद्र देव मीन राशीत असल्याने त्याचा स्वामी गुरु देव आहे. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र देवाला भावना, मनोबल, जल तत्व, आई, मानसिक स्थिती आणि आनंद यांचे कारक मानले जाते. तसेच त्यांना कर्क राशीचे स्वामी देखील मानले जाते.
चंद्र ज्या राशीत संक्रमण करत आहे ती राशिचक्रामधील पहिली राशी आहे. त्या राशीचा स्वामी मंगळ आहे. चंद्राच्या या संक्रमणामुळे मेष राशीव्यक्तिरिक्त इतर 2 राशीच्या लोकांना देखील या संक्रमणाचा फायदा होणार आहे. कोणत्या आहेत त्या राशी, जाणून घ्या
चंद्राच्या संक्रमणाचा प्रभाव या राशीच्या लोकांवर सर्वांत जास्त दिसून येऊ शकतो. चंद्र कर्क राशीत असल्यामुळे या राशीच्या लोकांचे भौतिक सुखात वाढ होईल. परिवारामध्ये असलेले मतभेद दूर होतील. करिअरमध्ये स्थिरता येईल. तरुणांमध्ये असलेला मानसिक तणाव दूर होईल. आर्थिक बाजू मजबूत राहून व्यावसायिकांना पैशाच्या कमतरतेपासून मुक्तता मिळेल. वाहन खरेदी करण्यासाठी आजचा दिवस चांगला राहील. या लोकांची आर्थिक संकटातून सुटका होईल.
चंद्राच्या संक्रमणामुळे मकर राशीच्या लोकांचा आजचा दिवस उत्तम राहील. या लोकांचे वैवाहिक जीवन चांगले राहील. नात्यांमध्ये कायम गोडवा राहील. करिअर संबंधित मुलांना चांगली बातमी ऐकायला मिळेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतो. तसेच नोकरी करणाऱ्या लोकांना देखील आर्थिक लाभ होऊ शकतो. मकर राशीची लोक मालमत्तेमध्ये देखील गुंतवणूक करु शकता या गुंतवणुकीचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल. एखाद्या व्यक्तीला दीर्घकाळापासून आजाराची समस्या असल्यास ती दूर होईल.
चंद्राच्या संक्रमणामुळे धनु राशीच्या लोकांचा आजचा दिवस उत्तम राहील. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. नवीन दुकान खरेदी करणे फायदेशीर ठरेल. नोकरी करणाऱ्यांसाठी दिवस चांगला राहील. तुम्ही वडिलोपार्जित मालमत्ता खरेदी करु शकता. धनु राशीची लोक त्यांच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवतील. जे लोक व्यवसायामध्ये भागीदारीत काम करत आहे त्यांना आज फायदा होईल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)