फोटो सौजन्य- istock
मूलांक 2 असलेल्यांचा स्वामी ग्रह शुक्र आहे. शुक्राची संख्या 6 मानली जाते. अंकशास्त्रानुसार, आजचा दिवस मूलांक 2 असणाऱ्या लोकांसाठी मिश्रित परिणामांचा असेल आणि सर्जनशील कार्यात तुमची आवड वाढू शकते. त्याचबरोबर मूलांक 6 असलेल्या लोकांच्या नातेसंबंधात गोडवा राहील. घरातील वातावरण आनंदाचे राहील. मूलांक 1 ते 9 असलेल्या लोकांचा आजचा शुक्रवारचा दिवस कसा राहील, जाणून घ्या
मूलांक 1 असलेल्या लोकांचा आत्मविश्वास वाढलेला असेल. या लोकांना कामाच्या ठिकाणी कोणताही मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो. या लोकांनी टीमवर्क केल्यास याचा फायदा होईल. हे लोक सामाजिक कार्यात सहभागी होतील.
मूलांक 2 असलेल्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित असेल. आज या लोकांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. कौटुंबिक संबंधांमध्ये स्नेह आणि सहकार्य राहील. तुमचा मानसिक ताण कमी होईल.
मूलांक 3 असलेल्या लोकांचा दिवस सामान्य राहील. हे कामाच्या लोकांनी नवीन योजना आखू शकतात. कोणत्याही कामाची सुरुवात करताना वडिलधारी माणसांचा सल्ला घ्यावा. तुमची महत्त्वाची कामे पूर्ण होतील.
मूलांक 4 असलेल्या लोकांना दिवसाच्या सुरुवातीला कामामध्ये काही अडथळे येऊ शकतात. कोणतेही काम करताना हुशारीने करावे. आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी. मोठ्यांचा आदर करा.
मूलांक 5 असलेले लोक आज कामामध्ये व्यस्त राहतील. नवीन व्यक्तीची भेट होऊ शकते त्याचा तुम्हाला भविष्यात खूप फायदा होऊ शकतो. कामानिमित्त तुम्ही कुठेही बाहेर जाऊ शकतात.
मूलांक 6 असलेले लोक जोडीदारासोबत वेळ घालवतील. एखाद्या जुन्या मित्रालाही भेटू शकता. यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. घरात आणि कुटुंबात आनंदी वातावरण असेल. धार्मिक कार्यात सहभागी होतील.
मूलांक 7 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला मोठी संधी मिळू शकते ज्याचा तुम्हाला फायदा होईल. तुमचा मानसिक ताण कमी होईल आणि तुम्हाला आराम वाटेल.
मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. मूलांक 8 असणाऱ्या लोकांवर नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात. तुम्हाला कामाच्या ठिकाणी लक्ष केंद्रित करुन काम करावे लागेल. दीर्घकाळापासून प्रलंबित राहिलेले काम आज पूर्ण होऊ शकते.
मूलांक 9 असलेल्या लोकांचा आजचा दिवस उत्साहाचा राहील. कोणतेही निर्णय घेताना घाई करु नका. रागावर नियंत्रण ठेवा. कामाच्या ठिकाणी धाडसी निर्णय घ्यावे लागतील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)