Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Astro Tips: हातातून दूध किंवा तेल सांडणे का मानले जाते अशुभ, जाणून घ्या ज्योतिषशास्त्रीय आणि धार्मिक श्रद्धा

वास्तुशास्त्रानुसार, घरातील लहानसहान घटनासुद्धा भविष्यासाठी शुभ किंवा अशुभ संकेत देऊ शकतात. हातातून दूध किंवा तेल सांडणे ही अशीच एक घटना आहे. या घटना ग्रहांची स्थिती आणि व्यक्तीच्या नशिबाशी निगडित असतात. हातातून दूध किंवा तेल सांडणे शुभ की अशुभ जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: May 28, 2026 | 10:20 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • हातातून दूध किंवा तेल सांडणे का मानले जाते अशुभ
  • काय आहे ज्योतिषशास्त्रीय आणि धार्मिक श्रद्धा
  • दूध किंवा तेल सांडण्याचा जीवनावर काय परिणाम होतो
 

 

स्वयंपाकघरात काम करताना दूध किंवा तेल सांडणे ही एक सामान्य गोष्ट मानली जाते. परंतु सनातन धर्म, शकुनशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार, याला एक साधा अपघात मानले जात नाही. मान्यतेनुसार, घरात घडणाऱ्या लहानसहान घटनासुद्धा भविष्यासाठी शुभ किंवा अशुभ संकेत देऊ शकतात. यामुळेच आपले वडीलधारी आपल्याला दूध, तेल किंवा इतर खाद्यपदार्थ सांडताना विशेष काळजी घेण्याचा सल्ला देतात. धार्मिकदृष्ट्या, या घटना ग्रहस्थिती आणि व्यक्तीच्या नशिबाशी निगडित असतात.

दूध उकळून सांडणे मानले जाते शुभ

हिंदू धर्मात दुधाला अत्यंत पवित्र मानले जाते. दुधाचा संबंध भगवान विष्णू, देवी लक्ष्मी आणि चंद्र यांच्याशी जोडला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्र हा मनःशांती, आनंद आणि समृद्धीसाठी जबाबदार असलेला ग्रह आहे. असे मानले जाते की, स्वयंपाकघरात स्टोव्हवर ठेवलेले दूध उतू जाऊन सांडल्यास, ते अनेकदा एक शुभ असल्याते मानले जाते. हे घरात समृद्धी, चांगली बातमी किंवा एखाद्या शुभ घटनेचे लक्षण मानले जाते. नवीन घरात प्रवेश करताना किंवा कोणत्याही शुभ प्रसंगी दूध उकळणे विशेषतः शुभ मानले जाते. याउलट, जर तुमच्या हातातून थंड दूध सांडले किंवा दुधाचा ग्लास चुकून खाली पडून जमिनीवर सांडला, तर शकुनशास्त्रात हे अशुभ मानले जाते. धार्मिक श्रद्धेनुसार, हे व्यक्तीच्या कुंडलीतील कमजोर चंद्राचे लक्षण आहे. यामुळे कुटुंबात वाढलेला मानसिक ताण, संघर्ष आणि आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात. अनेक लोक याचा संबंध घरातील नकारात्मक ऊर्जेशी देखील जोडतात.

Gemology: धनप्राप्तीसाठी प्रसिद्ध असलेले हे रत्न; परिधान करण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

हे मोठे संकट

जर एखादी व्यक्तीच्या हातातून वारंवार दूध किंवा तेल सांडत असेल, तर त्यांनी आपल्या वागणुकीकडे, मानसिक स्थितीकडे आणि ग्रहांच्या स्थितीकडे लक्ष दिले पाहिजे. विशेषतः, सांडलेले तेल हे शनि ग्रहाच्या अशुभ स्थितीचे द्योतक असू शकते. तेल हे न्यायाची देवता आणि कर्माचे दाता असलेल्या शनिदेवाशी संबंधित आहे. शकुनशास्त्रानुसार, हातातून तेल सांडणे शुभ मानले जात नाही. जर घरात वारंवार तेल सांडत असेल, तर ते आर्थिक अडचणी, पैशाचे नुकसान, वाढते कर्ज किंवा चालू असलेल्या कामात अपयश येण्याचे लक्षण आहे. हा आजारपण, मानसिक ताण किंवा कुटुंबातील मोठ्या संकटाचा इशारा असतो.

pradosh vrat: ग्रहदोष दूर करण्यासाठी प्रदोष व्रताच्या दिवशी करा ‘हे’ उपाय

अशावेळी काय करावे

ज्योतिषशास्त्रामध्ये यावर काही उपाय सांगण्यात आलेले आहे. दूध किंवा तेल चुकून सांडल्यास, ताबडतोब देवाची क्षमा मागावी. तेल सांडल्यास, शनिवारी शनि मंदिरात मोहरीच्या तेलाचे दान करणे शुभ मानले जाते. गरजू लोकांना मदत करणे आणि घरात सकारात्मक वातावरण राखणे हे देखील फायदेशीर आहे. पंडित दीपलाल जयपुरी यांच्या मते, या गोष्टी अंधश्रद्धा म्हणून न पाहता, धार्मिक श्रद्धा आणि परंपरा म्हणून पाहिल्या पाहिजेत.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: हातातून दूध किंवा तेल सांडणे अशुभ का मानले जाते?

    Ans: धार्मिक आणि पारंपरिक श्रद्धेनुसार दूध, तेल किंवा तूप यांसारख्या वस्तू समृद्धीचे प्रतीक मानल्या जातात. त्यामुळे त्यांचे सांडणे काही ठिकाणी अशुभ संकेत मानले जाते.

  • Que: दूध सांडणे कोणत्या गोष्टीचे संकेत मानले जाते?

    Ans: काही मान्यतानुसार दूध सांडणे मानसिक अस्थिरता, घरातील तणाव किंवा चंद्राशी संबंधित ऊर्जेतील असंतुलनाचे प्रतीक मानले जाते.

  • Que: वारंवार दूध किंवा तेल सांडत असेल तर काय करावे?

    Ans: घरात शांतता ठेवणे, स्वच्छता राखणे आणि सकारात्मक वातावरण निर्माण करणे उपयुक्त मानले जाते.

Web Title: Astro tips why is it considered inauspicious to spill milk or oil from hands what are the astrological and religious beliefs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 10:20 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Moon in Scorpio: २३ ते २५ जुलै दरम्यान या राशींच्या लोकांना प्रत्येक कामात मिळेल यश
1

Moon in Scorpio: २३ ते २५ जुलै दरम्यान या राशींच्या लोकांना प्रत्येक कामात मिळेल यश

Numberlogy: मूलांक ४ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
2

Numberlogy: मूलांक ४ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Budh Uday: बुध ग्रहाच्या उदयामुळे २५ जुलैनंतर या राशींच्या लोकांना करिअर, व्यवसाय आणि उत्पन्नाला मिळेल चालना
3

Budh Uday: बुध ग्रहाच्या उदयामुळे २५ जुलैनंतर या राशींच्या लोकांना करिअर, व्यवसाय आणि उत्पन्नाला मिळेल चालना

Chaturmas 2026: २५ जुलैपासून सुरू होणार चातुर्मास; जाणून घ्या महत्त्व आणि धार्मिक नियम
4

Chaturmas 2026: २५ जुलैपासून सुरू होणार चातुर्मास; जाणून घ्या महत्त्व आणि धार्मिक नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.