
फोटो सौजन्य- pinterest
वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वतीला पिवळ्या रंगाची मिठाई जसे की बेसनची बर्फी, केशर युक्त भात, राजभोग, मूग डाळीचा हलवा आणि रव्याचा हलव्याचा नैवेद्य दाखवणे शुभ मानले जाते. तुम्ही या मिठाई एकत्रच देखील बनवू शकता. जाणून घ्या याची रेसिपी
वसंत पंचमीचा सण ज्ञान, विद्या आणि कलेची देवी सरस्वती देवीला समर्पित आहे. या दिवशी पिवळ्या रंगाला विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की, पिवळा रंग समृद्धी, ऊर्जा आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे. यासाठी वसंत पंचमीच्या दिवशी पिवळ्या रंगांच्या मिठाईंचा नैवेद्य दाखवणे शुभ मानले जाते. जर तुम्ही वसंत पंचमीच्या दिवशी घरामध्ये प्रसाद बनवायचा असल्यास या 5 प्रकारच्या मिठाई कशी बनवायची जाणून घ्या
बेसनची बर्फी एक स्वादिष्ट असते. खास करून ती वसंत पंचमीच्या दिवशी घरोघरी बनवली जाते. यासाठी बेसन तुपामध्ये भाजून घ्या. त्यानंतर त्यामध्ये वेलची पावडर आणि साखर टाका. हे मिश्रण एकत्र करून एका ताटामध्ये घेऊन थंड करून घ्या. जेव्हा हे मिश्रण थंड होईल त्यावेळी तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये ते कापून घ्या. बेसनची बर्फी फ्रीजमध्ये ठेवून काय दिवस तुम्ही तिला स्टोअर करू शकता.
वसंत पंचमीच्या दिवशी पिवळ्या रंगांच्या मिठाईमध्ये केसर भात खूप शुभ मानला जातो. हे बनवणे खूप सोपे आहे. सर्वात पहिले तांदूळ स्वच्छ धुऊन कुकरमध्ये ठेवा. त्यानंतर त्यामध्ये दूध, साखर आणि केशर मिसळा. नंतर कुकर बंद करून दोन ते तीन शिट्ट्या काढा. चावी कुकर थंड होईल आणि तांदूळ चांगल्या प्रकारे शिजला जाईल त्यावर काजू, बदाम आणि मनुके यांसारखे सुका मेवा टाकून सजवा. केशर गरबा प्रसाद म्हणून गरमागरम तुम्ही खाऊ शकता किंवा थंड झाल्यावर देखील खाऊ शकता.
राजभोग एक भारतीय पारंपरिक मिठाई आहे. जे वसंत पंचमीला बनवले जाते. भूत उकळून त्यामध्ये लिंबू पिळून ते फाटून द्या. त्या चौथ्या चा छोटे छोटे गोळे बनवा. त्याला साखळीच्या पाकामध्ये शिजवा आणि वरून सुकामेवा आणि केशर लावून सजवा.
वसंत पंचमीच्या दिवशी मुक्ताई चा हलवा बनवणे हा पौष्टिक पदार्थ आहे. मूग डाळीची पेस्ट बनवून तुपामध्ये ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्या. त्यानंतर त्यामध्ये साखर आणि सुकामेवा टाकून ते घट्ट होईपर्यंत शिजवून घ्या. या हलव्यात चवीसोबतच प्रथिने भरपूर असतात.
वसंत पंचमीच्या दिवशी रव्याचा हलवा चविष्ट प्रसाद आहे. जे लहान मुलं ते वृद्ध या सर्वांना आवडते. हे बनवण्यासाठी रवा तुपामध्ये भाजून घ्या. त्यानंतर त्यामध्ये दूध टाकून तो हलवून घ्या. दूध जाड झाल्यावर त्यात साखर आणि केशर टाका. शेवटी बदाम काजू आणि पिस्त्याने त्याला सजवून घ्या.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: वसंत पंचमी हा विद्या, बुद्धी, कला आणि संगीताची देवी सरस्वती यांच्या पूजनाचा पवित्र सण आहे. या दिवशी देवीची पूजा केल्याने ज्ञान, एकाग्रता व यश प्राप्त होते.
Ans: देवी सरस्वतीला सात्त्विक व पिवळ्या रंगाच्या मिठाया विशेष प्रिय मानल्या जातात.
Ans: बेसन लाडू, केसरयुक्त खीर शिरा, पिवळे पेढे , बूंदी लाडू, केशरी भात