Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhath Puja 2026 Dates: छठ पूजेचा शुभारंभ कधी? १३ ते १६ नोव्हेंबरपर्यंतचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या!

Chhath Puja 2026 Dates: छठ पूजा हा उत्तर भारतातील एक महत्त्वाचा आणि कठीण धार्मिक सण आहे. मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबात सुख-शांती नांदावी यासाठी महिला या सणात कठोर व्रत करतात. २०२६ मध्ये छठ महापर्व १३ नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबरदरम्यान साजरे केले जाणार आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 11, 2026 | 11:23 AM
Chhath Puja 2026 Dates (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Chhath Puja 2026 Dates (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:

उत्तर भारतातला सगळ्यात मोठा आणि सगळ्यात कठीण सण कोणता असेल तर तो म्हणजे छठ पूजा. पूर्वी हा सण फक्त बिहार, झारखंड आणि यूपी मधेच दिसायचा, पण आता मुंबई, दिल्ली पासून ते अमेरिकेत पण छठ मोठ्या जल्लोषात साजरी होते. Chhath Puja 2026 Dates

मुलांच्या लांब आयुष्यासाठी आणि घरात सुख-शांती राहावी म्हणून महिला 36 तास काहीही न खाता-पिता हा उपवास करतात.हिंदू कॅलेंडर प्रमाणे कार्तिक महिन्यातल्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला या सणाची सुरुवात होते आणि सप्तमीच्या सकाळी सूर्याला अर्घ्य देऊन सांगता होते. 2026 मध्ये नेमकी तारीख काय आहे, हे अनेक जण गुगलवर शोधत आहेत.

छठ पूजा 2026 ची तारीख

द्रिक पंचांग बघितले तर 2026 सालची छठ पूजा 13 नोव्हेंबर शुक्रवार पासून चालू होत आहे आणि 16 नोव्हेंबर सोमवार पर्यंत चालणार आहे. यातला सगळ्यात महत्वाचा दिवस म्हणजे 15 नोव्हेंबरचा षष्ठीचा दिवस.

पहिला दिवस 13 नोव्हेंबर – नहाय-खाय

पहिल्या दिवसाला नहाय-खाय म्हणतात. या दिवशी ज्या बायका उपवास करणार असतात त्या सकाळी नदीवर जाऊन आंघोळ करतात. घरी येऊन स्वयंपाकघर स्वच्छ करतात आणि मग सात्विक जेवण बनवतात. या दिवशी भात, दुधीची भाजी आणि हरभरा डाळ बनवण्याची जुनी पद्धत आहे. लसूण-कांदा या दिवशी अजिबात वापरत नाहीत. एकदम साधं जेवण असतं.

दुसरा दिवस 14 नोव्हेंबर – खरना

दुसऱ्या दिवसाला खरना असे म्हणतात. हा दिवस पंचमीला येतो. या दिवशी दिवसभर काहीही खाल्ले जात नाही. संध्याकाळी मातीच्या चुलीवर गुळ आणि तांदळाची खीर बनवली जाते. त्याला बऱ्याच ठिकाणी रसिया-रोटी पण म्हणतात. खीर, पोळी आणि केळीचा नैवेद्य दाखवून मग उपवास करणारी महिला प्रसाद खाते. आणि इथूनच तिचा खरा कठीण उपवास सुरु होतो. यानंतर 36 तास तिला पाणी सुद्धा प्यायचे नसते.

Navratri 2026: अष्टमीला देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

तिसरा दिवस 15 नोव्हेंबर – डूबते सूर्य को अर्घ्य

तिसरा दिवस हा सगळ्यात मोठा दिवस असतो. या दिवशी संध्याकाळी बुडत्या सूर्याला अर्घ्य दिले जाते. सगळ्या महिला नवीन साड्या नेसून, डोक्यावर टोपलीत ठेकुआ, फळे, ऊस घेऊन घाटावर जातात. कमरेपर्यंत पाण्यात उभे राहून सूर्याला नमस्कार केला जातो. दिल्लीमध्ये या दिवशी सूर्य मावळण्याची वेळ संध्याकाळी 5:28 ची आहे. तुमच्या शहरानुसार वेळ 5-10 मिनिटे मागे-पुढे होऊ शकते.

चौथा दिवस 16 नोव्हेंबर – उगते सूर्य को अर्घ्य

हा शेवटचा आणि सांगतेचा दिवस. सकाळी लवकर उठून परत सगळे घाटावर जातात आणि उगवत्या सूर्याची वाट बघतात. सूर्य वर येताच त्याला अर्घ्य दिले जाते आणि मग सगळ्यांकडून आशीर्वाद घेऊन उपवास सोडला जातो. दिल्लीमध्ये हा सुर्यादय सकाळी 6:44 ला होईल.

Navratri 2026: नवरात्रीचा पहिला दिवस देवी शैलपुत्रीला समर्पित, अशा पद्धतीने करा देवीची पूजा

थोडक्यात लक्षात ठेवा –

  • 13 नोव्हेंबर ला नहाय-खाय
  • 14 नोव्हेंबर ला खरना
  • 15 नोव्हेंबर ला संध्याकाळचा अर्घ्य
  • 16 नोव्हेंबर ला सकाळचा अर्घ्य
व्रत समाप्तीही पूजा फक्त पूजा नाही, तर निसर्गाला आणि सूर्याला थँक्यू म्हणण्याचा सण आहे.

Web Title: Chhath puja 2026 dates nahaye khaye kharna arghya timings rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2026 | 11:23 AM

Topics:  

  • Chhath Puja
  • dharm
  • Marathi News

संबंधित बातम्या

America News : अमेरिकेत गोळ्या झाडून फाशीच्या शिक्षेचे थेट प्रक्षेपण? पोप लिओ चौदाव्यांचा मृत्युदंडाला विरोध
1

America News : अमेरिकेत गोळ्या झाडून फाशीच्या शिक्षेचे थेट प्रक्षेपण? पोप लिओ चौदाव्यांचा मृत्युदंडाला विरोध

Israel News : गाझा युद्धाच्या निषेधार्थ लंडनमध्ये हजारोंचा मोर्चा; पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले नागरिक
2

Israel News : गाझा युद्धाच्या निषेधार्थ लंडनमध्ये हजारोंचा मोर्चा; पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले नागरिक

World News : नोबेल शांतता पुरस्कार न मिळाल्याने ट्रम्प संतप्त; नॉर्वेच्या नोबेल समितीवर देशाची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप
3

World News : नोबेल शांतता पुरस्कार न मिळाल्याने ट्रम्प संतप्त; नॉर्वेच्या नोबेल समितीवर देशाची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप

Russia-Ukraine War : रशियन डिझेलवरील निर्बंध शिथिल; झेलेन्स्कींचा अमेरिकेला संतापजनक सवाल, निर्णयाला ‘पुतिन यांना भेट’ म्हटले
4

Russia-Ukraine War : रशियन डिझेलवरील निर्बंध शिथिल; झेलेन्स्कींचा अमेरिकेला संतापजनक सवाल, निर्णयाला ‘पुतिन यांना भेट’ म्हटले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.