
9 Kitchen Spices: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
आपल्या स्वयंपाकघरात रोज वापरले जाणारे मसाले फक्त जेवणाला चव देत नाहीत. आपल्या आजी-पणजीपासून सांगितलं जातंय की प्रत्येक मसाल्यामध्ये एक ग्रहाचा वास असतो. ज्योतिष शास्त्रात असं मानतात की स्वयंपाकघरातील प्रत्येक डबा हा एका ग्रहाशी जोडलेला आहे. त्याचा रंग, त्याचा गुण पाहून तो कोणता ग्रह आहे हे ठरवलं आहे.चला मग बघूया कोणता मसाला कोणत्या ग्रहाचे प्रतीक आहे. 9 Kitchen Spices:
पिवळ्या रंगाची हळद ही गुरु ग्रहाची मानली जाते. गुरु म्हणजे ज्ञानाचा, मोठेपणाचा आणि भरभराटीचा ग्रह. जिथे हळद आहे तिथे शुभ असतं. म्हणूनच कोणत्याही चांगल्या कामात हळद वापरतात. हळद घरात असेल तर समृद्धी राहते असं म्हणतात.
धणे हे बुध ग्रहाशी जोडलेले आहेत. बुध म्हणजे बुद्धीचा, बोलण्याचा आणि हुशारीचा ग्रह. ज्यांची वाणी गोड हवी, ज्यांना चांगलं बोलता यावं, त्यांचा बुध चांगला असावा लागतो. धणे वापरल्याने बुद्धी तेज होते अशी मान्यता आहे.
सध्या सगळीकडे सैंधव मीठ, गुलाबी मीठ वापरतात. हे गुलाबी मीठ सूर्याचं प्रतीक आहे. सूर्य म्हणजे सगळ्या ग्रहांचा राजा. आत्मविश्वास, मान-सन्मान आणि तेज हे सूर्याकडून मिळतं. गुलाबी मिठाचा वापर शरीरासाठी तर चांगला आहेच, पण त्याने घरात सूर्याची ऊर्जा येते.
रोजचं पांढरं मीठ हे चंद्राशी संबंधित आहे. चंद्र म्हणजे मनाचा ग्रह. आपलं मन, आपल्या भावना या चंद्रावर अवलंबून असतात. घरात मीठ व्यवस्थित असेल, सांडलवंड होणार नाही याची काळजी घेतली तर मन शांत राहतं असं वास्तूमध्ये सांगतात.
लालभडक मिरची ही मंगळाची आहे. मंगळ म्हणजे ताकदीचा, हिंमतीचा आणि रागाचा ग्रह. त्याच्यात अग्नी आहे. म्हणूनच लाल मिरची तिखट असते. घरात मंगळाची ऊर्जा संतुलित ठेवण्यासाठी मिरचीचा वापर जपून करावा असं म्हटलं जातं.
गोड पदार्थ म्हणजे शुक्र. साखर, खडीसाखर ही शुक्र ग्रहाची प्रतीके आहेत. शुक्र म्हणजे प्रेमाचा, सौंदर्याचा, मजा-मौजेचा आणि कलेचा ग्रह. घरात गोड पदार्थ असले की शुक्र प्रसन्न राहतो आणि घरात आनंद राहतो, असं मानतात.
Diwali 2026: दिवाळीच्या रात्री मुख्य दारावरच का लावले जातात दिवे? 99% लोकांना माहीतच नाही रहस्य
जिऱ्याचा संबंध थेट राहू-केतू या दोन छाया ग्रहांशी जोडतात. राहू-केतू म्हणजे अचानक घडणाऱ्या गोष्टी, रहस्य आणि बदल घडवणारे ग्रह. जिरे दिसायला लहान आहे पण त्याचा प्रभाव मोठा आहे, अगदी राहू-केतूसारखाच. त्यामुळे जिऱ्याला विशेष महत्त्व आहे.
काळी मिरी ही शनीची मानली जाते. शनी म्हणजे शिस्तीचा, कष्टाचा आणि संयमाचा ग्रह. तो माणसाची परीक्षा घेतो. काळी मिरी कडक आणि टिकाऊ असते. ती शनीसारखीच कठीण परिस्थितीतही तग धरून राहण्याची ताकद देते असं म्हणतात.
आपलं स्वयंपाकघर हे फक्त जेवण बनवायची जागा नाही. ते घराची सगळी ऊर्जा जिथून येते असं ठिकाण आहे. मसाल्याचे डबे व्यवस्थित, स्वच्छ भरून ठेवले तर घरातले नऊ ग्रह पण शांत राहतात आणि घरात बरकत राहते, असं जुने जाणते लोक सांगतात.
Ans: पारंपरिक वास्तुमान्यतेनुसार मसाल्यांचे डबे स्वच्छ आणि व्यवस्थित भरून ठेवावेत.
Ans: पांढरे मीठ चंद्र ग्रहाशी संबंधित मानले जाते.
Ans: हळद गुरु ग्रहाचे प्रतीक मानली जाते.