फोटो सौजन्य- pinterest
दहीहंडी हा दरवर्षी जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी उत्साहात साजरा करण्यात येणारा सण आहे. या सणाला गोकुळाष्टमी नावाने देखील ओळखले जाते. हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. या दिवशी लोक भगवान श्रीकृष्णाच्या बालपणीच्या कृत्यांची आठवण करून देतात आणि त्यांच्याप्रमाणेच मडकी फोडून हा सण साजरा करतात. यावर्षी दहीहंडीचा सण शनिवार, 16 ऑगस्ट रोजी सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. हा सण म्हणजे एक खेळ नाही, परंपरा नाही तर या सणाला लोकांमध्ये एकता, कठोर परिश्रम आणि उत्सवाचे प्रतीक मानले जाते. जाणून घेऊया दहीहंडीची सुरुवात कशी झाली आणि या सणामागील इतिहास आणि महत्त्व काय आहे, जाणून घ्या
यंदा श्रावण महिन्यामध्ये दहीहंडीचा सण शुक्रवार, 16 ऑगस्ट रोजी रात्री 9.34 वाजता सुरू होईल आणि त्याची समाप्ती रविवार, 17 ऑगस्ट रोजी सकाळी 7.24 वाजता होईल. उद्यतिथीनुसार, दहीहंडीचा सण शनिवार, 16 ऑगस्ट रोजी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येईल.
श्रीकृष्णाला लहानपणापासूनच लोणी खायला खूप आवडत असे. श्रीकृष्ण त्यांच्या मित्रांसह गोपींच्या घरातून लोणी चोरून खात असत. लोणी वाचवण्यासाठी गोपींनी घरातील एका उंच ठिकाणी एका भांड्यात दही आणि मिठाई बांधून ठेवण्यास सुरुवात केली. मात्र श्रीकृष्ण त्यांच्या मित्रांसह मनोरे रचत असत आणि ते भांडे फोडून सहज लोणी मिळवत असत आणि त्यानंतर ते लोणी चोरून खात असतं. आजही लोक त्याचप्रकारे मनोरे रचतात आणि मडकी फोडून दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. दहीहंडीसाठी विविध ठिकाणी बक्षिसे ठेवली जातात आणि हा उत्सव आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो.
हल्ली दहीहंडी स्पर्धा घेतली जाते त्यासाठी मोकळ्या जागेमध्ये दहीहंडी काही फूट उंच बांधली जाते. ती दहीहंडी फोडण्यासाठी महिला आणि मुली त्यावर पाणी ओतून त्यांचे प्रयत्न निष्फळ करण्याचा प्रयत्न करतात. यावेळी लोक ‘गोविंदा आला रे!’ असा जयघोष करतात.
दहीहंडी हा भगवान श्रीकृष्णाच्या बालपणीच्या विनोदांवर आधारित असलेला एक सण. यालाच गोपाळकाला असे देखील म्हटले जाते. या दिवशी तरुण पुरुष, महिला मुली गोंविदा नावाने मनोरे तयार करुन उंचीवर टांगलेले मडके फोडण्याचा प्रयत्न करतात. हे मडके दही, लोणी इत्यादी गोष्टींच्या प्रसादाने भरलेले असते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)