फोटो सौजन्य- pinterest
ज्योतिषशास्त्रात, शनि ग्रहाला न्यायाचा कारक मानला जातो, तर शुक्र ग्रह हा शुभ ग्रह म्हणून ओळखला जातो. या ग्रहांचा परिणाम व्यक्तीच्या कारकिर्दीवरच नाही तर त्याच्या भौतिक सुखावरही होतो. आता सध्या शनि मीन राशीत आहे आणि शुक्र मिथुन राशीत आहे. हे दोन्ही ग्रह इतर ग्रहांशी युती करतील. त्यामुळे राजयोग तयार होतील. ज्याचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर शुभ अशुभ होणार आहे. यावेळी मंगळवार, 26 ऑगस्ट रोजी सकाळी 6.23 वाजता शुक्र आणि शनि एकमेकांपासून 120 अंशांवर असतील. त्यामुळे नवपंचम योग तयार होईल. हा योग शुभ मानला जातो. ज्यावेळी शुक्र ग्रह कर्क राशीमध्ये प्रवेश करेल त्यावेळी बुधासोबत लक्ष्मी नारायण योग तयार होईल. या काळाचा शुभ परिणाम कोणत्या राशीच्या लोकांवर होणार आहे, जाणून घ्या
नवपंचम राजयोग मेष राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे. या काळात तुम्ही कुटुंबातील सदस्यासोबत सहलीला जाऊ शकता. व्यवसायात आणि करारावर काम करणाऱ्यांसाठी हा काळ खूप शुभ राहील. या काळात तुम्हाला व्यवसायाला नवीन दिशा मिळेल. त्यासोबतच करिअर आणि व्यवसायामध्ये समान विचारसरणीच्या लोकांना भेटण्याची शक्यता आहे. हा काळ आरोग्याच्या दृष्टीने चांगला राहील तर यावेळी आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल. त्याचप्रमाणे व्यवसायात नफा आणि सौदे मिळू शकतात.
सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप फायदेशीर राहील. या काळात तुम्ही धार्मिक ठिकाणी जाऊ शकता. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे त्यांना चांगली बातमी मिळू शकते. तसेच तुमच्यामधील आत्मविश्वास वाढू शकतो. तुम्ही सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात कठोर मेहनत घेतल्यास तुम्हाला अपेक्षित यश मिळू शकते. विवाहाशी संबंधित बाबी तुमच्या बाजूने असतील. जीवनात सुरू असलेल्या समस्या संपतील.
मीन राशीच्या लोकांना या काळामध्ये व्यवसाय आणि करिअरमुळे खूप प्रवास करावा लागू शकतो. मात्र हा प्रवास तुमच्यासाठी आनंददायी आणि यशस्वी ठरणारा राहील. सरकारी क्षेत्रात काम करत असणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. या काळात तुम्हाला नवीन गोष्टी शिकण्याची आवड निर्माण होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ खूप फायदेशीर असणार आहे. तसेच या काळात तुम्ही परदेश प्रवास करु शकता. तुम्ही सामाजिक क्षेत्रात कार्यरत राहाल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)