Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dhanteras 2026: धनत्रयोदशीला सोनं खरेदी करणं बंधनकारक आहे का? सोन्याऐवजी या वस्तू खरेदी करणं मानलं जातं शुभ

Dhanteras 2026: धनत्रयोदशीला सोनं किंवा चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते; मात्र सोनं खरेदी करणे बंधनकारक नाही. तुमच्या बजेटनुसार पितळ-तांब्याची भांडी, धने, झाडू यांसारख्या वस्तूही खरेदी करू शकता. जाणून घेऊया, धनत्रयोदशीला सोन्याऐवजी कोणत्या वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते आणि त्यामागील धार्मिक महत्त्व काय आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 02, 2026 | 03:30 PM
फोटो सौजन्य- chatgpt

फोटो सौजन्य- chatgpt

Follow Us
Follow Us:
  • धनत्रयोदशीला सोनं खरेदी करणे बंधनकारक आहे का?
  • सोनं खरेदी करणे शक्य नसेल तर कोणत्या वस्तू खरेदी कराव्यात?
  • धनत्रयोदशीला पितळ आणि तांब्याची भांडी खरेदी करणे शुभ का मानले जाते?
 

 

हिंदू धर्मशास्त्रात आणि भारतीय संस्कृतीत धोनी अर्थात धनत्रयोदशी (धन्वंतरी जयंती) या सणाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. परंतु, बऱ्याच लोकांचा असा समज असतो की या दिवशी फक्त सोनं किंवा चांदीच खरेदी केली पाहिजे. धर्मशास्त्र याबद्दल काय सांगते, सोनं खरेदी करणे बंधनकारक आहे का आणि सोन्याऐवजी कोणत्या वस्तू खरेदी कराव्यात, याबद्दलचा सविस्तर जाणून घेऊया

धनत्रयोदशीला सोनं खरेदी केलं पाहिजे का?

धर्मशास्त्रानुसार, धनत्रयोदशीला सोनं खरेदी करणं चांगलं मानलं जातं, पण ते अनिवार्य किंवा बंधनकारक अजिबात नाही.
धर्मशास्त्रात ‘धन’ याचा अर्थ केवळ पैसा किंवा सोनं-चांदी असा नाही. आरोग्य, समृद्धी, अन्नधान्य आणि समाधान हे देखील धनाचाच भाग आहेत. या दिवशी आपल्या आर्थिक क्षमतेच्या बाहेर जाऊन, कर्ज काढून किंवा मानसिक ताण घेऊन सोनं खरेदी करण्याची गरज नाही. श्रद्धेला आणि आनंदाला महत्त्व आहे, वस्तूच्या किंमतीला नाही.

Dhanteras 2026: धनत्रयोदशीला मीठापासून तेलापर्यंत या गोष्टींची देवाणघेवाण करणे टाळा, जाणून घ्या परंपरा

सोनं खरेदी नाही केलं, तर काय खरेदी करावं?

जर या पवित्र दिवशी तुम्हाला सोनं खरेदी करायचं नसेल किंवा बजेट नसेल, तर धर्मशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार खालील वस्तू खरेदी करणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते.

पितळ किंवा तांब्याची भांडी

धनत्रयोदशी हा दिवस प्रामुख्याने भगवान धन्वंतरी (आरोग्याचे देवता) यांचा प्रकटीकरण दिवस आहे. जेव्हा ते समुद्रमंथनातून प्रकट झाले, तेव्हा त्यांच्या हातात अमृताने भरलेला पितळाचा कलश होता. त्यामुळे या दिवशी पितळ (Brass) किंवा तांब्याचे (Copper) भांडे किंवा पाण्याचा कलश खरेदी करणे सोन्याइतकेच शुभ मानले जाते.

चांदीच्या वस्तू किंवा नाणी

सोनं परवडत नसल्यास चांदीचे लहान नाणे, चांदीचा दिवा किंवा चमचा खरेदी करू शकता. चांदीला पवित्र आणि मनाला शांतता देणारा धातू मानले जाते.

अख्खे धणे (धने)

धनत्रयोदशीला धणे खरेदी करण्याची जुनी परंपरा आहे. धणे हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते. या दिवशी थोडे अख्खे धणे खरेदी करून दिवाळीच्या पूजेत लक्ष्मीमातेसमोर ठेवावे. भाऊबीजेनंतर हे धणे घरातील कुंडीत किंवा बागेत पेरावे. अशी मान्यता आहे की जशी धण्याची रोपे वाढतात, तशी घरामधील समृद्धी वाढते.

खडीसाखर आणि बत्तासे

लक्ष्मी पूजनासाठी आणि नैवेद्यासाठी या दिवशी खडीसाखर, बत्तासे किंवा लाह्या खरेदी करणे शुभ असते.

Dhanteras 2026: धनत्रयोदशीला धणे पूजन का करतात? जाणून घ्या धार्मिक महत्त्व आणि योग्य विधी

नवीन झाडू (कुंचला)

झाडूला ‘लक्ष्मी’चे रूप मानले जाते. झाडू घरातील दारिद्र्य आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर काढतो. धनत्रयोदशीला एक नवीन झाडू खरेदी करून त्याची पूजा केली जाते. यामुळे घरात स्वच्छता आणि सकारात्मकता नांदते.

मातीचे दिवे आणि लक्ष्मी-गणेश मूर्ती

दिवाळीच्या पूजेसाठी लागणारे मातीचे दिवे, पणत्या आणि लक्ष्मी-गणेशाची नवीन मूर्ती किंवा फोटो या दिवशी खरेदी करावा.

धर्मशास्त्रात धनत्रयोदशीशी संबंधि कथा

धन्वंतरी जयंती (आरोग्य धन)

समुद्रमंथनातून वैद्यराज धन्वंतरी प्रकट झाले. म्हणून या दिवशी आरोग्याची प्रार्थना केली जाते. शास्त्र सांगते की ‘पहिलं सुख निरोगी काया’, म्हणजेच चांगले आरोग्य हेच सर्वात मोठे धन आहे.

या दिवशी संध्याकाळी घराबाहेर यमराजासाठी दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावला जातो (ज्याला यमदीपदान म्हणतात). यामुळे कुटुंबातील सदस्यांचे अकाली मृत्यूपासून रक्षण होते, असे शास्त्र सांगते.

धनत्रयोदशीशी संबंधित पौराणिक कथा

समुद्रमंथनातून वैद्यराज धन्वंतरी प्रकट झाले. म्हणून या दिवशी आरोग्याची प्रार्थना केली जाते. शास्त्र सांगते की ‘पहिलं सुख निरोगी काया’, म्हणजेच चांगले आरोग्य हेच सर्वात मोठे धन आहे.

या दिवशी संध्याकाळी घराबाहेर यमराजासाठी दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावला जातो (ज्याला यमदीपदान म्हणतात). यामुळे कुटुंबातील सदस्यांचे अकाली मृत्यूपासून रक्षण होते, असे शास्त्र सांगते.
राजा हेमा यांच्या पुत्राला लग्नानंतर चौथ्या दिवशी सर्पदंशाने मृत्यू येईल असा शाप होता. त्याच्या पत्नीने अपमृत्यूपासून वाचवण्यासाठी विवाहानंतरच्या चौथ्या दिवशी रात्री महालात सोन्या-नाण्यांचे ढीग लावले आणि चोहोबाजूंनी दिवे प्रज्वलित केले. दिव्यांच्या लखलखाटाने आणि सोन्याच्या चकाकीने यमराज (सर्पवेषात आलेल्या) यांचे डोळे दिपले आणि ते आत प्रवेश करू शकले नाहीत, ज्यामुळे राजकुमारचे प्राण वाचले. तेव्हापासून या दिवशी दिवे लावण्याची आणि यमपूजनाची प्रथा सुरू झाली.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: धनत्रयोदशीला सोनं खरेदी करणे बंधनकारक आहे का?

    Ans: नाही. धार्मिक मान्यतेनुसार सोनं खरेदी करणे शुभ मानले जाते; मात्र ते बंधनकारक नाही. आपल्या आर्थिक क्षमतेनुसार खरेदी करावी.

  • Que: धनत्रयोदशीला सोन्याऐवजी काय खरेदी करू शकतो?

    Ans: सोन्याऐवजी पितळ किंवा तांब्याची भांडी, चांदीचे नाणे, अख्खे धणे, नवीन झाडू, मातीचे दिवे आणि लक्ष्मी-गणेशाची मूर्ती खरेदी करू शकता.

  • Que: धनत्रयोदशीला तांब्याची किंवा पितळेची भांडी खरेदी करणे शुभ का मानले जाते?

    Ans: समुद्रमंथनातून भगवान धन्वंतरी अमृतकलश घेऊन प्रकट झाल्याची पौराणिक कथा आहे. त्यामुळे या दिवशी धातूची भांडी खरेदी करण्याची परंपरा आहे.

Web Title: Dhanteras 2026 gold shopping alternatives auspicious items to buy pp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • Dhanteras festival
  • Dhanteras Puja
  • Diwali 2026

संबंधित बातम्या

Nagpur News : दिवाळीत घरी येणे महागणार हवाई प्रवासाचे भाडे ११ ते १७ हजारांवर; बसचे तिकीटही ५ हजारांवर
1

Nagpur News : दिवाळीत घरी येणे महागणार हवाई प्रवासाचे भाडे ११ ते १७ हजारांवर; बसचे तिकीटही ५ हजारांवर

Diwali 2026: दिवाळीच्या प्रकाशपर्वासाठी मळेवाड सज्ज! सिंधुदुर्ग ते गोव्यापर्यंत अविनाश कुंभार यांच्या पणत्यांना पसंती
2

Diwali 2026: दिवाळीच्या प्रकाशपर्वासाठी मळेवाड सज्ज! सिंधुदुर्ग ते गोव्यापर्यंत अविनाश कुंभार यांच्या पणत्यांना पसंती

Diwali 2026: नानकटाई बनवल्यानंतर दगडासारखी कडक होऊन जाते? मग या पद्धतीने घरी बनवा बेकरीस्टाईल खुसखुशीत नानकटाई
3

Diwali 2026: नानकटाई बनवल्यानंतर दगडासारखी कडक होऊन जाते? मग या पद्धतीने घरी बनवा बेकरीस्टाईल खुसखुशीत नानकटाई

Diwali 2026: घरात वर्षभरात जवळच्या व्यक्तीचे निधन झाले असेल तर दिवाळी साजरी करावी का? जाणून घ्या परंपरा
4

Diwali 2026: घरात वर्षभरात जवळच्या व्यक्तीचे निधन झाले असेल तर दिवाळी साजरी करावी का? जाणून घ्या परंपरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.