Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News : दिवाळीत घरी येणे महागणार हवाई प्रवासाचे भाडे ११ ते १७ हजारांवर; बसचे तिकीटही ५ हजारांवर

Nagpur News : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागपूरला येणाऱ्या प्रवाशांना महागाईचा फटका बसत आहे. विमान तिकिटांचे दर १७ हजार ७९९ रुपयांपर्यंत, तर खासगी बसचे भाडे पाच हजारांपर्यंत पोहोचले आहे. रेल्वे आरक्षण फुल्ल झाल्याने प्रवाशांसमोर महागड्या प्रवासाचा पर्याय उरला आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Nov 02, 2026 | 03:05 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • दिवाळीच्या प्रवासाचे बजेट कोलमडले
  • रेल्वे आरक्षण फुल्ल; विमान प्रवासाला पसंती
  • मागणीनुसार भाड्यात चढ-उतार; बसचे दरही वाढले
Nagpur News : दिवाळीचा सण म्हटला की गावी जाण्याची ओढ आणि कुटुंबीयांसोबत सण साजरा करण्याचा आनंद काही औरच असतो. मात्र, यंदा हा आनंद प्रवाशांच्या खिशाला चांगलाच महाग पडणार आहे. दिवाळीच्या तोंडावर विमान आणि खासगी बसच्या तिकीट दरांनी मोठी झेप घेतली असून, नागपूरला येण्यासाठी प्रवाशांना हजारो रुपये मोजावे लागत आहेत. रेल्वेचे आरक्षणही फुल्ल झाल्याने चाकरमान्यांसमोर प्रवासाचे मोठे संकट उभे राहिले आहे.

दिवाळीच्या प्रवासाचे बजेट कोलमडले

दिवाळीचा सण जवळ येताच घरापासून दूर राहणाऱ्या नागरिकांची गावी परतण्याची लगबग सुरू झाली आहे. नोकरी, व्यवसाय किंवा शिक्षणानिमित्त पुणे, मुंबई, हैदराबाद आणि बंगळुरू यांसारख्या शहरांमध्ये राहणारे अनेक जण कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी नागपूरला येण्याचे नियोजन करीत आहेत. मात्र, यंदा गावी परतण्याचा प्रवास चांगलाच महागला आहे. दिवाळीपूर्वीच विमान आणि खासगी बसच्या तिकीट दरांनी मोठी उसळी घेतली असून प्रवाशांच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे.

ऑनलाईन बुकिंग संकेतस्थळांवर विमान प्रवासाचे भाडे ११ हजारांपासून १७ हजार ७९९ रुपयांपर्यंत पोहोचले आहे. तर खासगी बसचे तिकीट दरही चार ते पाच हजार रुपयांपर्यंत गेले आहेत. सणासुदीच्या काळात प्रवाशांची संख्या वाढत असल्याने विमान कंपन्यांकडून मागणीनुसार तिकीट दर वाढवले जात असल्याचे चित्र आहे.

Nagpur News : लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने सराफा व्यापाऱ्यांना धमकी; १० लाखाची मागितली खंडणी

रेल्वे आरक्षण फुल्ल; विमान प्रवासाला पसंती

दिवाळीच्या काळात रेल्वे आणि विमानांची तिकिटे मिळणे कठीण होत असल्याने अनेक प्रवाशांनी आगाऊ बुकिंगला सुरुवात केली आहे. पुण्यासह अन्य शहरांतून नागपूरला येणाऱ्या रेल्वेगाड्यांचे आरक्षण जवळपास पूर्ण झाले आहे. अनेक गाड्या हाउसफुल्ल झाल्याने प्रवाशांसमोर विमान किंवा खासगी बसने प्रवास करण्याचा पर्याय उरला आहे.

विविध विमान कंपन्यांच्या संकेतस्थळांवर एकाच मार्गासाठी वेगवेगळे दर दिसत आहेत. काही कंपन्यांकडून क्रेडिट कार्डद्वारे सवलती दिल्या जात असल्या तरी वाढलेल्या मूळ भाड्यामुळे प्रवाशांना त्याचा फारसा फायदा होत नाही. पुणे ते नागपूर प्रवासासाठी काही प्रवाशांना १२ हजार रुपये, तर काहींना १४ ते १५ हजार रुपयांपर्यंत खर्च करावा लागत आहे.

Nagpur News : नागपूरकरांना दिलासा; तूर्तास पाणी कपात नाही; पाण्याची बचत आणि गळती रोखण्यावर मनपाचा भर

मागणीनुसार भाड्यात चढ-उतार; बसचे दरही वाढले

पुणे, मुंबई आणि हैदराबादहून नागपूरला येणाऱ्या विमानांचे भाडे तुलनेने अधिक आहे. प्रवाशांची मागणी वाढल्यास विमान कंपन्या तिकीट दरात वाढ करतात, तर मागणी कमी झाल्यास काही प्रमाणात दर घटतात. उपलब्ध ऑनलाईन दरांनुसार, ६ नोव्हेंबरला बंगळुरू-नागपूर विमान प्रवासासाठी १७ हजार ते १७ हजार ७९९ रुपये मोजावे लागत आहेत. दिल्ली-नागपूर मार्गावर हेच भाडे सुमारे ९ हजार १६९ ते १० हजार रुपये आहे. पुणे-नागपूर आणि मुंबई-नागपूर मार्गावरील तिकिटांचे दरही १४ हजारांच्या पुढे गेले आहेत.

दुसरीकडे, खासगी बस प्रवासही महागला आहे. पुणे-नागपूर मार्गावर ६ नोव्हेंबरला बसचे भाडे चार ते साडेचार हजार रुपये, तर ७ नोव्हेंबरला साडेचार ते पाच हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहे. हैदराबाद-नागपूर मार्गावरही बसचे भाडे चार हजार रुपयांच्या पुढे गेले आहे.

एकंदरीत, दिवाळीला कुटुंबीयांसोबत सण साजरा करण्यासाठी गावी जाणाऱ्या नागरिकांना यंदा प्रवासासाठी अधिक पैसे खर्च करावे लागणार आहेत. रेल्वेचे आरक्षण उपलब्ध नसल्याने विमान आणि खासगी बसचा पर्याय निवडणाऱ्या प्रवाशांचे आर्थिक गणित मात्र पूर्णपणे कोलमडण्याची शक्यता आहे.

Web Title: Diwali travel airfare bus fare hike pune mumbai nagpurcp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 03:05 PM

Topics:  

  • Diwali 2026
  • Inflation News
  • Marathi News
  • Nagpur News

संबंधित बातम्या

NSDL ची घोडदौड! 4.72 कोटी डिमॅट खात्यांसह कमाईत 35% वाढ
1

NSDL ची घोडदौड! 4.72 कोटी डिमॅट खात्यांसह कमाईत 35% वाढ

Breaking News : बांगलादेशात गारमेंट कामगारांचा उद्रेक; ५२९ कारखाने ठप्प
2

Breaking News : बांगलादेशात गारमेंट कामगारांचा उद्रेक; ५२९ कारखाने ठप्प

Kirtan Movie Poster Launched: ‘कीर्तन’ चित्रपटाचे दिमाखात पोस्टर लाँच; सोहळ्यात सामाजिक संस्थांना 2 कोटींचे दान
3

Kirtan Movie Poster Launched: ‘कीर्तन’ चित्रपटाचे दिमाखात पोस्टर लाँच; सोहळ्यात सामाजिक संस्थांना 2 कोटींचे दान

lokshahir Vitthal Umap: लोककलेचा स्वर, आठवण लोकशाहीरांची! विठ्ठल उमप यांच्या १६व्या स्मृती संगीत समारोहाचे आयोजन
4

lokshahir Vitthal Umap: लोककलेचा स्वर, आठवण लोकशाहीरांची! विठ्ठल उमप यांच्या १६व्या स्मृती संगीत समारोहाचे आयोजन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.