Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 7 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Naraka Chaturdashi: नरक चतुर्दशीला उटण लावण्याची का आहे परंपरा? जाणून घ्या धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व

Naraka Chaturdashi: दिवाळीत नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंगस्नान करताना अंगाला उटणे लावण्याची परंपरा आहे. मात्र, या परंपरेमागे केवळ धार्मिक श्रद्धाच नाही, तर पौराणिक कथा आणि आयुर्वेदिक महत्त्वही दडलेले आहे. उटणे लावण्याची परंपरा कशी सुरू झाली आणि त्वचेसाठी त्याचे काय फायदे आहेत, जाणून घेऊया.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 07, 2026 | 03:30 PM
फोटो सौजन्य- gemini

फोटो सौजन्य- gemini

Follow Us
Follow Us:
  • नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंगस्नान करताना अंगाला उटणे लावण्याची प्राचीन परंपरा आहे.
  • उटणे लावणे हे शरीर आणि मन शुद्ध करण्याचे प्रतीक मानले जाते.
  • उटण्यामध्ये हळद, चंदन, नागरमोथा, कचोरा आणि वाळा यांसारख्या नैसर्गिक घटकांचा वापर केला जातो.
 

 

दिवाळीत, विशेषतः नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे अभ्यंगस्नान करताना अंगाला उटणे लावण्याला आपल्या संस्कृतीत प्रचंड महत्त्व आहे. उटणे लावण्यामागे धार्मिक, आध्यात्मिक आणि वैज्ञानिक (आयुर्वेदिक) अशी तीन प्रमुख कारणे आहेत.

धर्मशास्त्रीय व पौराणिक पार्श्वभूमी

या परंपरेची सुरुवात पौराणिक काळात नरकासूर वधाच्या कथेपासून झाली असे मानले जाते.. श्रीमद्भागवत पुराणानुसार प्राग्ज्योतिषपूरचा क्रूर राजा नरकासूर याने देव आणि मानवांना त्रास दिला होता आणि १६ हजार स्त्रियांना कैद केले होते. कार्तिक कृष्ण चतुर्दशीला भगवान श्रीकृष्ण आणि सत्यभामा यांनी नरकासुराचा वध केला आणि जगाला त्याच्या त्रासातून मुक्त केले.

Narak Chaturdashi 2026: नरक चतुर्दशीला सूर्योदयापूर्वीच का करावे अभ्यंगस्नान? अकाली मृत्यूशी काय आहे संबंध

विजयाचा आणि शुद्धीचा सण

नरकासुराचा वध केल्यानंतर, श्रीकृष्णाच्या अंगावरील रक्ताचे डाग आणि युद्धाचा थकवा दूर करण्यासाठी त्यांच्या शरीराला सुगंधी तेल आणि उटणे (उबटन) लावून मंगल स्नान घालण्यात आले. हा विजय साजरा करण्यासाठी आणि नरकासुराच्या त्रासातून मुक्त झाल्याच्या आनंदात प्रजेने दिवे लावले. हा विजय आणि भगवान श्रीकृष्णाचे ते मंगल स्नान म्हणजेच अभ्यंगस्नान. तेव्हापासून असुरी प्रवृत्तींचा नाश आणि स्वतःमधील नकारात्मकता (अज्ञान, आळस) धुवून काढण्याचे प्रतीक म्हणून ही परंपरा सुरू झाली.

आध्यात्मिक महत्त्व

धर्मशास्त्रानुसार, उटणे हे सात्त्विक आणि रजोगुणी वनौषधींपासून बनवले जाते. ते शरीराला लावल्याने मानवी शरीराची ब्रह्मांडातून सात्त्विक लहरी आणि चैतन्यकण ग्रहण करण्याची क्षमता वाढते. शरीराला तेल आणि उटणे घासून आंघोळ केल्याने शरीराभोवती असलेले त्रासदायक स्पंदने दूर होण्यास मदत होते, अशी आध्यात्मिक समजूत आहे.

Diwali 2026: नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनात काय आहे फरक, जाणून घ्या दोन्ही दिवसांचे महत्त्व

वैज्ञानिक आणि आयुर्वेदिक महत्त्व

दिवाळी हा सण शरद ऋतू संपून हेमंत ऋतू (थंडीच्या दिवसांची) सुरुवात होत असताना येतो. या ऋतू बदलाचा शरीरावर मोठा परिणाम होतो. थंडीच्या दिवसांत हवा कोरडी होते, ज्यामुळे त्वचा रुक्ष आणि निस्तेज पडते. त्यामुळे त्वचेचे रक्षण करण्यासाठी
उटण्यामध्ये हळद, चंदन, नागरमोथा, कचोरा, वाळा आणि कापूर यांसारख्या नैसर्गिक व औषधी वनस्पती असतात. हे घटक त्वचेची आर्द्रता आणि स्निग्धता टिकवून ठेवतात.

रक्ताभिसरण सुधारणे

उटणे लावण्यापूर्वी अंगाला कोमट तीळ तेल लावले जाते (ज्याला अभ्यंग म्हणतात). त्यानंतर उटणे लावून हलक्या हाताने मसाज केल्याने शरीरातील रक्ताभिसरण (Blood Circulation) सुधारते, ज्यामुळे शरीरातील थकवा दूर होऊन नवीन ऊर्जा मिळते.

नैसर्गिक स्क्रब (Scrub)

उटणे हे प्राचीन काळापासून वापरले जाणारे नैसर्गिक सौंदर्यप्रसाधन आहे. ते त्वचेवरील मृत पेशी (Dead Skin) आणि साचलेली धूळ काढून त्वचा स्वच्छ व चमकदार बनवते. उटणे लावणे म्हणजे केवळ दिवाळीची हौस नसून, ती ऋतू बदलाच्या काळात आरोग्य राखण्यासाठी आणि मनातील नकारात्मकता दूर सारण्यासाठी पूर्वजांनी सुरू केलेली एक शास्त्रोक्त जीवनशैली आहे

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: नरक चतुर्दशीला उटणे का लावतात?

    Ans: धार्मिक मान्यतेनुसार उटणे लावणे हे शरीर आणि मन शुद्ध करण्याचे प्रतीक मानले जाते. तसेच त्वचेची स्वच्छता आणि निगा राखण्यासाठीही त्याचा वापर केला जातो.

  • Que: अभ्यंगस्नानात उटणे लावण्याची परंपरा कशी सुरू झाली?

    Ans: पौराणिक कथेनुसार नरकासुराचा वध केल्यानंतर भगवान श्रीकृष्णाला सुगंधी तेल आणि उटणे लावून मंगलस्नान घालण्यात आले. या कथेशी अभ्यंगस्नानाची परंपरा जोडली जाते.

  • Que: उटणे लावण्यापूर्वी तेल का लावतात?

    Ans: अभ्यंगस्नानात कोमट तेलाने शरीराला मसाज करण्याची परंपरा आहे. यामुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होण्यास आणि शरीराला आराम मिळण्यास मदत होऊ शकते.

Web Title: Diwali 2026 narak chaturdashi abhyang snan utane religious and ayurvedic benefits pp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • Diwali
  • Diwali 2026
  • Hindu Festival

संबंधित बातम्या

Diwali Special: १४ वर्षांचा वनवास संपवून राम अयोध्येत परतले, तेव्हा नगरीत कसा साजरा झाला दीपोत्सव
1

Diwali Special: १४ वर्षांचा वनवास संपवून राम अयोध्येत परतले, तेव्हा नगरीत कसा साजरा झाला दीपोत्सव

Diwali 2026: नरक चतुर्दशीला हनुमान जयंती का साजरी करतात? जाणून घ्या दोन जन्मतिथींचे रहस्य
2

Diwali 2026: नरक चतुर्दशीला हनुमान जयंती का साजरी करतात? जाणून घ्या दोन जन्मतिथींचे रहस्य

Diwali 2026: गोड पदार्थ खाण्याची इच्छा होईल पूर्ण! साखरेचा अजिबात वापर न करता १० मिनिटांमध्ये बनवा शुगर फ्री मखाणा खीर
3

Diwali 2026: गोड पदार्थ खाण्याची इच्छा होईल पूर्ण! साखरेचा अजिबात वापर न करता १० मिनिटांमध्ये बनवा शुगर फ्री मखाणा खीर

Diwali 2026: नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनात काय आहे फरक, जाणून घ्या दोन्ही दिवसांचे महत्त्व
4

Diwali 2026: नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनात काय आहे फरक, जाणून घ्या दोन्ही दिवसांचे महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.