हिंदू पंचांगानुसार, वर्षभरात तब्बल 24 एकादशी असतात. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील अकराव्या तिथीला एकादशी म्हणून संबोधले जाते. असे म्हणतात की, एकादशी ही भगवान विष्णूंची अतिशय प्रिय तिथी आहे. या काळात भक्त भगवान विष्णूंची मनोभावे पूजा करतात. एकादशीच्या दिवशी मनोभावनेने भगवान विष्णूंची पूजाअर्चा केल्याने त्यांची कृपा दृष्टी राहते आणि त्यांच्या आयुष्यात सुखसमृद्धी येते, अशी मान्यता आहे. त्यातच आता आज ज्येष्ठ महिन्यातील अकरावी तिथी असून या दिवशी योगिनी एकादशी साजरी केली जाते. काय आहे या एकादशीची खासियत जाणून घेऊयात.
शास्त्रानुसार, योगिनी एकादशीच व्रत योग्य तिथीनुसार योग्य प्रकारे पाळाले तर भक्तांना इच्छित फळ मिळतं. या दिवशी सकाळी स्नान करून भजन विष्णूंचे ची पूजा करून व्रत करावे. एकादशीला नियमानुसार उपवास केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्यावर धनाचा वर्षाव करते असेही म्हटले जाते. चांगले परिणाम प्राप्त करण्यासाठी हा उपवास मनोभावनेने आणि योग्य प्रकारे करणे फार गरजेचे आहे. तसेच यावेळी काही गोष्टी विशेष करून टाळायला हव्यात. या नक्की कोणत्या गोष्टी आहे, सविस्तर जाणून घेऊयात.
धार्मिक मान्यतेनुसार, योगिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. या दिवशी पूजा केल्याने मनुष्याला स्वर्गप्राप्ती होते असे मानले जाते. तसेच अशा व्यक्तीला वैकुंठ लोकात जाण्याचे भाग्य प्राप्त होते. भगवान श्रीकृष्णांनी देखील युधिष्ठिराला योगिनी एकादशीचे महत्त्व समजावून सांगितले होते.