Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dr. Nanasaheb Dharmadhikari: समाजप्रबोधनाचे युगपुरुष डॉ. नानासाहेब धर्माधिकारी; जाणून घेऊया त्यांचा समाजसेवेचा प्रेरणादायी प्रवास

समाजप्रबोधनाचे युगपुरुष, प्रख्यात अध्यात्मिक मार्गदर्शक आणि सेवाभावी व्यक्तिमत्त्व डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांची आज बुधवार, 8 जुलै रोजी पुण्यतिथी आहे. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या समाजसेवेचा, अध्यात्मिक कार्याचा आणि व्यक्तिनिर्माणाच्या प्रवासाचा सविस्तर आढावा घेऊया

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 08, 2026 | 02:40 PM
फोटो सौजन्य- chatgpt

फोटो सौजन्य- chatgpt

Follow Us
Follow Us:
  • समाजप्रबोधनाचे युगपुरुष डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांची आज पुण्यतिथी
  • त्यांना  मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
  • डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांनी आरोग्य शिबिराचे आयोजन केले
 

 

 

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांनी अध्यात्म, समाजप्रबोधन आणि सेवाकार्य यांचा सुंदर संगम घडवत लाखो लोकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवले. १ मार्च १९२२ रोजी रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथे त्यांचा जन्म झाला. त्यांच्या घराण्यात अनेक पिढ्यांपासून समाजप्रबोधनाची परंपरा होती. दर्यासारंग कान्होजी आंग्रे यांनी त्यांच्या पूर्वजांना “धर्माधिकारी” ही पदवी दिली आणि त्या नावाला साजेसे कार्य नानासाहेबांनी आपल्या आयुष्यभर केले. आज लाखो लोकांचे आयुष्य नानासाहेबांनी बदलून टाकले. त्यांना माणूस म्हणून जगायला शिकवले.

संतवाङ्मयावर आधारित अध्यात्माची शिकवण

१९४३ मध्ये त्यांनी श्रीसमर्थ आध्यात्मिक प्रासादिक सेवा समितीची स्थापना केली आणि “श्री बैठक” या उपक्रमातून संत रामदास स्वामी यांच्या दासबोधावर, गुरूचरित्र वर आणि संतवाङ्मयावर आधारित अध्यात्माची शिकवण जनसामान्यांपर्यंत पोहोचवली. आज या बैठका विविध भारतीय भाषांतून देश-विदेशात आयोजित केल्या जात असून लाखो जणांना संस्कार, नैतिक मूल्ये आणि अध्यात्माची प्रेरणा देत आहेत. जेथे एसटी बस, वीज पोहोचली नव्हती ते बैठकीचे, नानासाहेब धर्माधिकारी यांचे विचार पोहोचले होते.

Saint Tukaram Maharaj Palkhi: संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा गौरवशाली इतिहास, वारकरी परंपरा आणि भक्तीचा महासागर

मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान

नानासाहेबांनी संस्कारांच्या बळावर समाजात अंधश्रद्धा, जातिभेद, व्यसनाधीनता, स्त्रियांवरील अन्याय आणि सामाजिक विषमता यांविरुद्ध प्रभावी जनजागृती केली. “मनुष्य ही एकच जात आणि मानवता हाच एक धर्म” हा त्यांचा संदेश समाजमनाला नवी दिशा देणारा ठरला. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

त्यांच्या विचारांचा वारसा पुढे त्यांचे पुत्र आप्पासाहेब धर्माधिकारी, त्यांचा पुत्र सचिन दादा धर्माधिकारी हे नेत आहेत. डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान समाजसेवेची अनेक लोकोपयोगी कार्ये राबवत आहे. वृक्षारोपण, जलसंधारण, तलाव आणि विहिरींची स्वच्छता, ग्रामस्वच्छता, आदिवासी आणि गरजू नागरिकांना मदत, शैक्षणिक साहित्याचे वितरण, तसेच विविध सामाजिक उपक्रमांमधून प्रतिष्ठान समाजहिताचे कार्य करत आहे. पर्यावरण संवर्धनासाठी लाखो वृक्षांची लागवड आणि संगोपन करून निसर्गरक्षणाचा आदर्शही त्यांनी समाजासमोर ठेवला.

आरोग्य शिबिरांचे आयोजन

आरोग्यसेवेच्या क्षेत्रातही प्रतिष्ठानतर्फे भव्य नि:शुल्क आरोग्य शिबिरे आयोजित केली जातात. डिसेंबर २०२३ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिरात दीड लाखांहून अधिक रुग्णांची तपासणी झाली आणि या उपक्रमाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली होती.

Dwidwadash Drishti Yoga: शुक्र आणि गुरूमुळे तयार होणार द्विद्वादश योग, या राशींच्या लोकांना मिळणार यश आणि धन

८ जुलै २००८ रोजी नानासाहेबांचे देहावसान झाले. मात्र त्यांनी दिलेली अध्यात्म, सेवा, संस्कार आणि समाजप्रबोधनाची शिकवण आजही लाखो अनुयायांच्या कार्यातून जिवंत आहे. समाजहितासाठी समर्पित जीवन कसे असावे, याचा आदर्श डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांनी आपल्या कार्यातून संपूर्ण समाजासमोर ठेवला. आज शरीररूपाने नानासाहेब धर्माधिकारी हे नसले तरी त्यांचे अलौकिक कार्य अखंडपणे चालू राहील. महाराष्ट्रातील रायगड, ठाणे या दोन जिल्ह्यातील संपूर्ण गावाचं बैठकीला जाणारे आहेत. त्यांनी सुरू केलेले हे व्यक्तीनिर्मानाचे, समाजप्रबोधनाचे कार्य असेच सुरू राहिलं आणि एक संस्कारी, सुशिक्षित पिढी निर्माण होत राहील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी कोण होते?

    Ans: डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी हे प्रख्यात अध्यात्मिक मार्गदर्शक, समाजप्रबोधक आणि सेवाभावी कार्यकर्ते होते. त्यांनी अध्यात्म, संस्कार आणि समाजसेवेच्या माध्यमातून लाखो लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवला

  • Que: डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांनी समाजासाठी कोणते कार्य केले?

    Ans: अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, जातिभेद निर्मूलन, स्त्री सन्मान, ग्रामस्वच्छता, वृक्षारोपण, जलसंधारण, आरोग्य शिबिरे आणि समाजप्रबोधन अशा विविध क्षेत्रांत त्यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले.

  • Que: डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचे कार्य आजही का प्रेरणादायी मानले जाते?

    Ans: त्यांनी दिलेले अध्यात्म, सेवा, संस्कार, पर्यावरण संवर्धन आणि मानवतेचे विचार आजही लाखो अनुयायांना समाजहितासाठी कार्य करण्याची प्रेरणा देत आहेत.

Web Title: Dr nanasaheb dharmadhikari punyatithi an inspiring journey of social service

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • dharm
  • navrahstra
  • Religion

संबंधित बातम्या

Putrada Ekadashi: संतानसुखाची मनोकामना पूर्ण करण्यासाठी पुत्रदा एकादशीच्या दिवशी करा हे उपाय
1

Putrada Ekadashi: संतानसुखाची मनोकामना पूर्ण करण्यासाठी पुत्रदा एकादशीच्या दिवशी करा हे उपाय

Numberlogy: पुत्रदा एकादशीच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना मिळेल अपेक्षित यश
2

Numberlogy: पुत्रदा एकादशीच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना मिळेल अपेक्षित यश

Budhaditya Rajyog 2026: सूर्य आणि बुधाची युती बनवणार शुभ योग; आर्थिक लाभासाठी करा हे सोपे उपाय
3

Budhaditya Rajyog 2026: सूर्य आणि बुधाची युती बनवणार शुभ योग; आर्थिक लाभासाठी करा हे सोपे उपाय

Ramayan: मंदोदरीला पंचकन्यांमध्ये का मानले जाते? जाणून घ्या तिच्याशी संबंधित खास कथा
4

Ramayan: मंदोदरीला पंचकन्यांमध्ये का मानले जाते? जाणून घ्या तिच्याशी संबंधित खास कथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.