फोटो सौजन्य- pinterest
जीवनामध्ये स्वप्न ही महत्त्वाची भूमिका बजावते. आजपासून आषाढ गुप्त नवरात्रीची सुरुवात झालेली आहे. अशा वेळी तुम्हाला स्वप्नामध्ये देवीच्या विविध रुपाचे दर्शन होणे हे तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकते.
हिंदू धर्मात अनेक शास्त्राबद्दल सांगण्यात आले आहे त्यापैकी एक म्हणजे स्वप्नशास्त्र. स्वप्नात आपल्याला ज्या गोष्टी दिसतात त्यांचा अर्थ शास्त्रात स्पष्ट केलेला आहे. अशावेळी नवरात्रीमध्ये देवीचे दर्शन होणे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे देवी कोणत्या रुपात दिसते यावरुन अर्थ लावता येतो. ही शुभ घटना आहे की अशुभ ते जाणून घेऊया.
स्वप्नशास्त्रानुसार, स्वप्नात एखाद्या व्यक्तीला दुर्गा देवीची पूजा करताना दिसणे म्हणजे त्या व्यक्तीला लवकरच त्याच्या जीवनात काही शुभ संकेत मिळणार आहेत, म्हणजेच त्याच्या जीवनात काही शुभ घटना घडणार आहेत, असे म्हटले जाते.
जर तुम्हाला नवरात्रीच्या दिवसामध्ये तुम्हाला स्वप्नात कोणत्याही स्वरूपात देवी दुर्गेची मूर्ती, चित्र किंवा रूप दिसणे म्हणजे तुमच्या जीवनातील आतापर्यंतचे सर्व समस्या त्रास संपणार आहेत आणि तुम्हाला आनंदाची गुरुकिल्ली मिळणार आहे. तसेच सुख समृद्धी येणार आहे असे म्हटले जाते.
स्वप्नामध्ये देवी दुर्गा किंवा तिचे कोणतेही रूप सिंहावर स्वार झालेले दिसल्यास समजावे की, तुमचे प्रतिस्पर्धी आणि शत्रू नष्ट होणार आहेत. तुमच्या आर्थिक समस्या आणि ताण दूर होऊ शकतो. नात्यांमध्ये गोडवा राहील.
स्वप्नामध्ये तुम्ही देवीची पूजा करताना पाहत असाल तर तुम्ही तुमच्या जीवनात योग्य मार्गावर आहात आणि येणारा काळ तुमच्यासाठी खूप चांगला असणार आहे, असे मानले जाते.
तुम्हाला स्वप्नामध्ये दुर्गा देवी आशीर्वाद देत आहे किंवा कोणतीही वृद्ध महिला आशीर्वाद देताना दिसणे म्हणजे तुमच्यावर देवीचा आशीर्वाद आहे असे गृहीत धरावे.
जर तुम्हाला स्वप्नामध्ये देवीची पूजा करताना दिसत असल्यास त्याचा अर्थ असा होतो की तुमच्या जीवनात तुम्हाला आदर आणि यश मिळेल. तसेच प्रलंबित कामे लवकर पूर्ण होतील.
जर स्वप्नामध्ये तुम्हाला असे दिसले की, तुम्हाला कोणत्यातरी महिलेकडून पैसे परत मिळत आहे याचा अर्थ तुमची आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होणार आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)