फोटो सौजन्य- pinterest
कोणत्याही कामाची सुरुवात करण्यासाठी पैसा ही महत्त्वाची गरज असते. जसे की नवीन व्यवसायाची सुरुवात करायची असो की कोणतीही सेवा किंवा सामाजिक कार्य असो पैशांची आवश्यकता ही भासतेच. बऱ्याचदा असे घडते की तुम्ही एखादी वस्तू ग्राहकाला विकता एखादे उत्पादन विकण्यासाठी किंवा क्लायंटला सेवा देण्यासाठी खूप मेहनत घेता पण या मेहनतीचे पैसे तुम्हाला वेळेवर मिळत नाही.
जर वेळेवर पैसे मिळाले नाही तर तुमच्यातील आत्मविश्वास कायम राहतो. पण तुम्ही नवीन सुरुवातीकडे वाटचाल करण्यास देखील सक्षम असता. परंतु जेव्हा पैसे अडकायला सुरुवात होते तेव्हा कामाची गती देखील मंदावते. कधीकधी असे देखील घडते की पेमेंट कोणत्या कारणांमुळे अडकत आहे याचे योग्य कारण समजत नाही. याचे प्रमुख कारण तुमच्या घराची किंवा कार्यालयाची दिशा देखील असू शकते.
वास्तुशास्त्राच्या म्हणण्यानुसार पेमेंटचा संबंध दक्षिण दिशेशी संबंधित आहे. काही वेळा दक्षिण दिशेमध्ये अडथळा असेल किंवा योग्यरित्या उर्जेचा प्रवाह होत नसल्यास त्याचे परिणाम पैशावर म्हणजे आर्थिक गोष्टींवर होताना दिसून येतात. यावेळी एक छोटासा उपाय केल्याने तुमची यातून सुटका होण्यास मदत होऊ शकते.
सर्वांत पहिले तुमच्या घराची किंवा कार्यालयातील आग्नेय दिशा तपासून घ्यावी. हा कोपरा दक्षिण आणि पूर्व दिशेला जोडलेला असावा.
तुम्ही घरामध्ये किंवा कार्यालयामध्ये धावणारे लाल घोड्याचे फोटो. हे फोटो प्रिंट करुन किंवा शो पीस तुम्ही ठेवू शकता याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो.
घोड्याचे हे फोटो किंवा चित्र अशा ठिकाणी ठेवा की ते लगेच नजरेस पडतील.
वास्तुशास्त्रानुसार घोड्याला वेग, शक्ती आणि प्रगतीचे प्रतीक मानले जाते. लाल घोड्याचा संबंध अग्नी तत्वाशी असल्याचे मानले जाते. लाल घोडा हा अग्नी तत्वाचे प्रतिनिधित्व करतो असे मानले जाते. म्हणजेच त्याचा ऊर्जा आणि गतीशी संबंध असल्याचे मानले जाते. लाल घोडे धावतानाचे चित्र लावल्याने ऊर्जेचा प्रवाहांशी संबंधित असल्याचे मानले जाते. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा सतत फिरत राहते त्यामुळे तुमच्या कामाला गती मिळण्यास मदत होते.
हे सोपे उपाय केल्याने तुमचे कुठेही अडकलेले पैसे परत मिळू शकतात. जुन्या क्लायंटकडे अडकलेले पैसे परत मिळण्यास मदत होऊ शकते. शिवाय नवीन कामाच्या संधी निर्माण होतील. तसेच नवीन योजना आखू शकतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)