फोटो सौजन्य- pinterest
जर तुम्ही मानसिक तणाव आणि नकारात्मक विचारांशी झुंजत असल्यास हा उपाय तुमच्यासाठी उपयुक्त ठरु शकतो. असे म्हटले जाते की, भगवान शिवाची आवडती वस्तू परिधान केल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात.
बऱ्याचदा आपल्याला असे वाटते की आपल्या जीवनातील सर्व मार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे मनामध्ये निराशा निर्माण होऊन अस्वस्थता जाणू लागते. मनामध्ये सारखे नकारात्मक विचार येण्यास सुरुवात होते. अशा वेळी अध्यात्मिक आणि ज्योतिषीय उपाय करणे खूप प्रभावी ठरु शकते. भगवान शिवाची आवडती वस्तू परिधान केल्याने तुमच्या सर्व समस्या दूर होतात अशी मान्यता आहे. परंतु ती वस्तू परिधान करण्याचे काही नियम आहे. कोणती वस्तू आहे ती आणि काय नियम आहेत ते जाणून घ्या.
अशा काही गोष्टी आहेत ज्या भगवान शिवांना खूप आवडतात त्यापैकीच एक म्हणजे रुद्राक्षाची माळ. शिवपुराणामध्ये रुद्राक्षाची उत्पत्ती भगवान शिवाच्या अश्रूंपासून झाली आहे, असे म्हटले आहे. ज्यामुळे ते खूप पवित्र समजले जाते. जर व्यक्तीच्या मनात वारंवार नकारात्मक विचार किंवा मानसिक ताण असेल तर रुद्राक्षाची माळ परिधान करणे फायदेशीर ठरते. कारण रुद्राक्ष धारण केल्याने मानसिक शांती, एकाग्रता, आत्मविश्वास वाढतो.
रुद्राक्ष 1 ते 21 मुखीपर्यंत आढळतात. पण रुद्राक्ष फक्त 14 मुखीपर्यंतच असलेले वापरावे. रुद्राक्ष घालण्याचे काही नियम आहेत. कोणत्याही व्यक्तीने असा कोणताही मुखी रुद्राक्ष परिधान करु नये. नाहीतर व्यक्तीच्या जीवनावर त्याचा नकारात्मक परिणाम देखील होऊ शकतो. जर तुम्ही मानसिक ताणतणावात असाल किंवा नकारात्मक विचार करत असाल तर पाचमुखी रुद्राक्ष घाला. दरम्यान, राशीनुसार रुद्राक्ष धारण करणे फायदेशीर मानले जाते.
रुद्राक्ष परिधान करण्यापूर्वी शिवलिंगावर ठेवून अभिषेक करावा. त्यानंतरच ते परिधान करावे. अशा प्रकारे परिधान न केल्यास त्याचा प्रभाव शून्य राहतो.
मासिक पाळी दरम्यान रुद्राक्ष परिधान करु नये.
तामासिक अन्न खाणाऱ्या लोकांनी रुद्राक्ष परिधान करु नये.
गर्भवती महिलांनी रुद्राक्ष परिधान करु नये
रुद्राक्ष परिधान केल्याने भगवान शिवाचा आशीर्वाद राहतो आणि घरामध्ये सुख समृद्धी राहते.
कुंडलीत सूर्याची स्थिती बलवान राहते.
मानसिक तणाव दूर होतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)