Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 20 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dussehra 2026: देवीला निरोप देण्यापूर्वी हे जाणून घ्या! दसऱ्याला घट विसर्जन कधी कराल? शुभ वेळ आणि धार्मिक महत्त्व

Dussehra 2026: 20 ऑक्टोबर 2026, मंगळवारी दसरा म्हणजेच विजयादशमी साजरी केली जात आहे. नऊ दिवसांच्या शारदीय नवरात्रोत्सवाची सांगता होत असताना देवीची मूर्ती आणि घट विसर्जन कधी करावे, याबाबत अनेकांना उत्सुकता आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 20, 2026 | 02:08 PM
Dussehra 2026: ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Dussehra 2026: ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • विजय मुहूर्त: दुपारी 2:09 ते 2:56; हा विजयादशमीच्या पूजेसाठी शुभ मानला जातो.
  • अपराह्ण काळ: दुपारी 1:23 ते 3:42 पर्यंत.
  • घट विसर्जनाच्या वेळा: सकाळी 6:19 ते 10:12, अभिजित मुहूर्त 11:44 ते 12:31 आणि दुपारी 1:14 ते 3:30.
आज 20 ऑक्टोबर 2026, मंगळवार. आजचा दिवस खूपच खास आहे. आज दसरा म्हणजेच विजयादशमी आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून आजचा दिवस ओळखला जातो. आजच्याच दिवशी शारदीय नवरात्र संपत आहे. नऊ दिवस देवीची मनोभावे पूजा केल्यानंतर आज घराघरात घट हलवण्याची आणि देवीच्या मूर्तीला निरोप देण्याची तयारी सुरू आहे. Dussehra 2026:

बऱ्याच लोकांच्या मनात प्रश्न असतो की घट नेमका कधी हलवायचा, देवीचं विसर्जन कधी करायचं. नवमीला करायचं की दशमीला? तर याबद्दलची सगळी माहिती आपण आज पाहणार आहोत.

दुर्गा विसर्जनाचा शुभ मुहूर्त काय आहे?

पंचांगानुसार आज विजयादशमी आहे. आजचा विजय मुहूर्त दुपारी 2 वाजून 9 मिनिटांपासून ते 2 वाजून 56 मिनिटांपर्यंत आहे. हा मुहूर्त विजयादशमीच्या पूजेसाठी सगळ्यात चांगला मानला जातो. याशिवाय आजचा अपराह्ण काळ दुपारी 1 वाजून 23 मिनिटांपासून ते 3 वाजून 42 मिनिटांपर्यंत आहे.

पण एक गोष्ट लक्षात ठेवा, विजय मुहूर्त म्हणजेच विसर्जनाचा मुहूर्त असं नाही. विसर्जनासाठी वेगळी वेळ पाहावी लागते आणि ती प्रत्येक ठिकाणच्या पंचांगानुसार बदलू शकते. त्यामुळे एकच वेळ सगळीकडे लागू होईल असं समजू नका.

घट विसर्जनाचा मुहूर्त

जर तुम्हाला आज घट विसर्जन करायचं असेल तर त्यासाठी काही शुभ वेळा सांगितल्या आहेत. सकाळी 6 वाजून 19 मिनिटांपासून ते 10 वाजून 12 मिनिटांपर्यंत एक चांगला मुहूर्त आहे. त्यानंतर अभिजित मुहूर्त आहे, तो सकाळी 11 वाजून 44 मिनिटांपासून ते दुपारी 12 वाजून 31 मिनिटांपर्यंत आहे. आणि दुपारी 1 वाजून 14 मिनिटांपासून ते 3 वाजून 30 मिनिटांपर्यंत पण घट विसर्जन करता येईल.

पण या वेळा सगळीकडे सारख्या असतीलच असं नाही. तुमच्या गावाचं किंवा शहराचं पंचांग वेगळं असू शकतं. त्यामुळे स्थानिक पंचांग एकदा पाहूनच मुहूर्त ठरवा.

घट नवमीला हलवायचा की दशमीला?

याबाबत सगळ्यांच्या घरात वेगवेगळी पद्धत असते. काही घरांमध्ये महानवमीच्या दिवशीच म्हणजे कालच देवीची पूजा, हवन आणि आरती करून घट विसर्जित केला जातो. तर काही घरांमध्ये दसऱ्याच्या दिवशी पूजा करून घट हलवला जातो आणि नवरात्रीत पेरलेलं धान्य म्हणजे जव विसर्जित केलं जातं.

त्यामुळे यात काही एक नियम नाही. तुमच्या घरात जी परंपरा वर्षानुवर्षे चालत आली आहे, तीच पाळा. तुमच्या मोठ्या माणसांना विचारा, ते सांगतील तसंच करा. कुलाचार महत्त्वाचा असतो.

Numerology Horoscope 20 October 2026: पैशांची चणचण संपणार? मूलांक 4, 5 च्या व्यक्तींसाठी यशाचे संकेत; जाणून घ्या अंकभविष्य

विसर्जन करताना काय करावं?

घट किंवा देवीची मूर्ती विसर्जित करताना घाई करू नका. सगळ्यात आधी देवीची मनोभावे पूजा करा, आरती करा आणि नैवेद्य दाखवा. त्यानंतर देवीकडे तुमच्या पूजेत काही चूक झाली असेल तर माफी मागा आणि प्रार्थना करा.

घटावरचा नारळ आणि बाकीचं पूजेचं साहित्य तुमच्या घरच्या पद्धतीनुसार बाजूला काढा. घटातलं पाणी तुम्ही तुळशीसारख्या झाडाला घालू शकता. नवरात्रीत पेरलेलं धान्य मातीत विसर्जित करा, कचऱ्यात टाकू नका.जर तुमच्याकडे मोठी मूर्ती असेल तर ती नदी किंवा तलावात विसर्जित करताना प्रशासनाने घालून दिलेले नियम पाळा. जिथे कृत्रिम तलावाची सोय केली असेल तिथेच विसर्जन करा. शक्य झाल्यास पर्यावरणपूरक मूर्ती आणा आणि पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करा.

Navratri: वैवाहिक जीवनात सतत अडथळे येत असल्यास महानवमीच्या दिवशी करा हे उपाय

शेवटची महत्त्वाची गोष्ट

विजय मुहूर्ताची वेळच विसर्जनासाठी बंधनकारक आहे असं समजू नका. घट विसर्जन आणि देवी विसर्जन या दोन वेगळ्या गोष्टी आहेत आणि त्या घरच्या परंपरेनुसार वेगवेगळ्या वेळी केल्या जाऊ शकतात. त्यामुळे आपल्या शहराचं पंचांग आणि घरचा कुलाचार पाहूनच योग्य निर्णय घ्या. सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: 2026 मध्ये दसरा कधी आहे?

    Ans: दिलेल्या वृत्तानुसार, 20 ऑक्टोबर 2026, मंगळवार रोजी दसरा म्हणजेच विजयादशमी साजरी केली जात आहे.

  • Que: विजयादशमीचा विजय मुहूर्त किती वाजता आहे?

    Ans: वृत्तात दिलेल्या वेळेनुसार, विजय मुहूर्त दुपारी 2:09 ते 2:56 पर्यंत आहे. हा मुहूर्त विजयादशमीच्या पूजेसाठी शुभ मानला जातो.

  • Que: दसऱ्याला घट विसर्जनाचा मुहूर्त कोणता आहे?

    Ans: दिलेल्या वृत्तानुसार, घट विसर्जनासाठी तीन वेळा नमूद केल्या आहेत: सकाळी 6:19 ते 10:12 अभिजित मुहूर्त: सकाळी 11:44 ते दुपारी 12:31 दुपारी 1:14 ते 3:30 या वेळा स्थानिक पंचांगानुसार बदलू शकतात.

Web Title: Dussehra 2026 durga visarjan ghata visarjan muhurat timings rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2026 | 02:08 PM

Topics:  

  • Dussehra
  • Marathi News
  • Navratri

संबंधित बातम्या

Dussehra 2026: कुठे रावणदहन, तर कुठे दुर्गापूजा! भारतातील ‘या’ राज्यांमध्ये दसऱ्याचा उत्साह असतो शिगेला, जाणून घ्या खास परंपरा
1

Dussehra 2026: कुठे रावणदहन, तर कुठे दुर्गापूजा! भारतातील ‘या’ राज्यांमध्ये दसऱ्याचा उत्साह असतो शिगेला, जाणून घ्या खास परंपरा

Ashutosh Ranka And Saurav Das News: आशुतोष रांका आणि सौरभ दास यांच्या जामीन अर्ज फेटाळला: न्यायालयीन कोठडीत वाढ
2

Ashutosh Ranka And Saurav Das News: आशुतोष रांका आणि सौरभ दास यांच्या जामीन अर्ज फेटाळला: न्यायालयीन कोठडीत वाढ

Dussehra 2026: दसऱ्यानिमित्त घरी बनवा शाही केशर पिस्ता श्रीखंड, विकतच्या श्रीखंडापेक्षा लागेल भन्नाट चव
3

Dussehra 2026: दसऱ्यानिमित्त घरी बनवा शाही केशर पिस्ता श्रीखंड, विकतच्या श्रीखंडापेक्षा लागेल भन्नाट चव

फक्त भारतातच नाहीतर परदेशातही विजयादशमीचा उत्साह; टाइम्स स्क्वेअरवर गरब्याची धूम
4

फक्त भारतातच नाहीतर परदेशातही विजयादशमीचा उत्साह; टाइम्स स्क्वेअरवर गरब्याची धूम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.