Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 20 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फक्त भारतातच नाहीतर परदेशातही विजयादशमीचा उत्साह; टाइम्स स्क्वेअरवर गरब्याची धूम

अमेरिकेतील भारतीय-अमेरिकी समुदायाकडून दसरा आणि नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. इलिनॉय, कॅलिफोर्निया, न्यू जर्सी, टेक्सास, जॉर्जिया, मिशिगन, फ्लोरिडा आणि वॉशिंग्टन यांसारख्या राज्यांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 20, 2026 | 08:19 AM
नेपाळपासून अमेरिकेपर्यंत विजयादशमीचा उत्साह

नेपाळपासून अमेरिकेपर्यंत विजयादशमीचा उत्साह

Follow Us
Follow Us:
  • जगभरातील विविध देशांमध्येही असतो मोठा उत्साह
  • भारतीय संस्कृतीचा जागतिक जागर
  • बांगलादेशात दुर्गापूजा व विजयादशमीची परंपरा
मुंबई : भारताची सभ्यता, संस्कृती आणि परंपरांना शेकडो वर्षांचा इतिहास आहे. भारतीय सण-उत्सव आता केवळ देशाच्या सीमांपुरते मर्यादित राहिलेले नाहीत, तर जगभरातील विविध देशांमध्येही ते मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांकडून आपल्या सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. नुकतेच अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर एका समूहाने गरबा सादर केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. गरब्याच्या तालावर भारतीयांसह परदेशी नागरिकही थिरकताना दिसले.

नवरात्रोत्सवानंतर आता विजयादशमी अर्थात दसऱ्याचा सण भारतासह जगातील विविध देशांमध्ये साजरा केला जातो. विशेषतः भारतीय, हिंदू आणि नेपाळी समुदाय मोठ्या संख्येने वास्तव्यास असलेल्या देशांमध्ये या सणाला विशेष महत्त्व आहे. वाईटावर चांगल्याचा विजय, सत्याचा असत्यावर विजय आणि अन्यायाविरुद्ध न्यायाचा संदेश हे दसऱ्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. प्रभू श्रीरामांनी रावणावर मिळविलेला विजय आणि काही परंपरांमध्ये देवी दुर्गेने महिषासुराचा केलेला वध यांच्याशी हा सण जोडलेला आहे.

भारतीय संस्कृतीचा जागतिक जागर

अमेरिकेतील भारतीय-अमेरिकी समुदायाकडून दसरा आणि नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. इलिनॉय, कॅलिफोर्निया, न्यू जर्सी, टेक्सास, जॉर्जिया, मिशिगन, फ्लोरिडा आणि वॉशिंग्टन यांसारख्या राज्यांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमांमध्ये पारंपरिक पूजा, गरबा-दांडिया, संगीत, नृत्य, रामलीला आणि सामुदायिक मेळाव्यांचा समावेश असतो. काही ठिकाणी रावणाच्या पुतळ्याचे दहनही केले जाते. या उत्सवांच्या माध्यमातून भारतीय समुदाय आपल्या पुढील पिढीला भारतीय संस्कृती आणि परंपरांची ओळख करून देतो.

वेगवेगळ्या देशांमध्ये आहेत दसऱ्याच्या विविध परंपरा

नेपाळ : १५ दिवस चालणारा दसई उत्सव

नेपाळमध्ये दसऱ्याला ‘बडा दसई’ असे म्हटले जाते. हा तेथील प्रमुख सणांपैकी एक आहे. या काळात देवी दुर्गेची पूजा केली जाते. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती लहानांच्या कपाळावर टीका लावून आणि जमरा म्हणजेच जवाच्या अंकुरांचे आशीर्वाद देऊन त्यांना शुभेच्छा देतात. नेपाळमध्ये दसईचा उत्सव साधारणतः १५ दिवस चालतो. कुटुंबीय एकत्र येऊन हा सण साजरा करतात. सार्वजनिक सुट्ट्या, धार्मिक विधी आणि कौटुंबिक भेटीगाठींमुळे संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण असते.

बांगलादेश : दुर्गापूजा व विजयादशमीची परंपरा

बांगलादेशातील हिंदू समुदायासाठी दुर्गापूजा हा महत्त्वाचा धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव आहे. या काळात आकर्षक मंडप उभारले जातात, देवी दुर्गेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. विजयादशमीच्या दिवशी अनेक ठिकाणी मूर्तीचे विसर्जन केले जाते.

FAQ 

यंदा विजयादशमी कधी आहे? मुहूर्त काय?

– 20 ऑक्टोबर 2026, मंगळवार – आज! दशमी तिथी – सकाळी 8:20 ते 21 ऑक्टो सकाळी 9:41 AM पर्यंत.

परदेशात विजयादशमी कशी साजरी होते? फक्त भारतातच का?

– नाही, जिथे हिंदू समाजबंधू, तिथे दसरा साजरा केला जातो.

परदेशात रावण दहन कसे करतात? परवानगी मिळते का?

– हो, USA मध्ये अग्निशमन विभागाची परवानगी घेऊन मोठ्या मैदानात 20-30 फूट उंच रावणाचे पुतळे जाळतात. जळणारे पुतळे हे अहंकार, वाईट विचार जाळण्याचे प्रतीक मानले जाते.

Dussehra 2026 : दसऱ्याच्या दिवशी या राशींच्या लोकांना मिळणार नशिबाची साथ, रखडलेल्या कामांना मिळेल गती

Web Title: Enthusiasm for vijayadashami is seen not only in india but also abroad nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2026 | 08:19 AM

Topics:  

  • Dussehra
  • Vijayadashami

संबंधित बातम्या

Kanda Bhaji Recipe: सोडा – रव्याचा अजिबात वापर न करता दसऱ्याच्या नैवेद्यासाठी बनवा कुरकुरीत गोल कांदा भजी, नोट करा रेसिपी
1

Kanda Bhaji Recipe: सोडा – रव्याचा अजिबात वापर न करता दसऱ्याच्या नैवेद्यासाठी बनवा कुरकुरीत गोल कांदा भजी, नोट करा रेसिपी

Dussehra: दसऱ्याला राशीनुसार करा या गोष्टींचे दान, जाणून घ्या ज्योतिषशास्त्रीय महत्त्व
2

Dussehra: दसऱ्याला राशीनुसार करा या गोष्टींचे दान, जाणून घ्या ज्योतिषशास्त्रीय महत्त्व

Dussehra 2026: सोनं घ्या, सोन्यासारखे रहा..! विजयादशमीनिमित्त नातेवाईक आणि प्रियजनांना द्या खास मराठमोळ्या शुभेच्छा
3

Dussehra 2026: सोनं घ्या, सोन्यासारखे रहा..! विजयादशमीनिमित्त नातेवाईक आणि प्रियजनांना द्या खास मराठमोळ्या शुभेच्छा

‘पावले शिस्तीची, दिशा राष्ट्रनिर्माणाची’! महाबळेश्वरमध्ये उत्साहात पार पडले RSS चे संचलन
4

‘पावले शिस्तीची, दिशा राष्ट्रनिर्माणाची’! महाबळेश्वरमध्ये उत्साहात पार पडले RSS चे संचलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.