
दसऱ्यानिमित्त घरी बनवा शाही केशर पिस्ता श्रीखंड, विकतच्या श्रीखंडापेक्षा लागेल भन्नाट चव
Dussehra 2026: साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला सण म्हणजे दसरा. दसऱ्याच्या दिवशी घरोघरी शस्त्रपूजन, सीमालंगण आणि आपट्याची पाने देऊन घरातील मोठ्यांचे आशीर्वाद घेतले जातात. हा दिवस हिंदू परंपरेमध्ये अतिशय महत्वाचा मानला जातो. सणावारांचा उत्साह वाढवण्यासाठी घरात विविध गोडाचे पदार्थ सुद्धा बनवले जातात. पुरणपोळी, खीर, गुलाबजाम इत्यादी ठराविक पदार्थ कायमच बनवले जातात. पण नेहमीच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यास सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही शाही केशर पिस्ता श्रीखंड बनवू शकता. बाजारातील महागडे आणि प्रिजर्व्हेटिव्ह्ज असलेले पदार्थ विकत आणून खाण्याऐवजी घरी बनवलेले चवदार पदार्थ खावेत. तुम्ही बनवलेले श्रीखंड घरातील प्रत्येक व्यक्तीला खूप जास्त आवडेल. त्यामुळे सणावारांचा उत्साह वाढवण्यासाठी विकतचे पदार्थ आणून खाण्याऐवजी घरी बनवलेले पदार्थ खावेत. चला तर जाणून घेऊया श्रीखंड बनवण्याची रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
विना कांदा लसूण नैवेद्यासाठी अशाप्रकारे बनवा रसरशीत बटाट्याची भाजी, चव अशी की सर्वच बोटं चाटतील