Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganesh Chaturthi 2025: गणपती बाप्पाला तुळस का अर्पण करत नाही? काय आहे यामागील पौराणिक कारण

गणेश चतुर्थीचा सण सर्वत्र उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी घरात आणि सार्वजनिक मंडपामध्ये बाप्पाची 10 दिवस स्थापना केली जाते. मात्र यावेळी तुळस अर्पण करणे निषिद्ध मानले जाते. काय आहे यामागील कारण जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 25, 2025 | 10:26 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

संपूर्ण भारतामध्ये गणेश चतुर्थीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी भाविक विविध प्रकारचे नैवेद्य, फुले आणि पाने अर्पण करतात. पूजा करताना महादेव आणि विष्णू यांना तुळस अर्पण करणे शुभ मानले जाते पण गणपती बाप्पाला तुळस अर्पण करणे निषिद्ध का मानले जाते. यामागे भक्तांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले असतील. विघ्नांचा नाश करणाऱ्या बाप्पाला तुळशी का अर्पण केली जात नाही. याचा संबंध एका प्राचीन धार्मिक कथेशी संबंधित असल्याचे म्हटले जाते. या काही कारणांमुळे आजही आपण गणपती बाप्पाच्या पूजेवेळी तुळशीचा वापर केला जात नाही. काय आहे यामागील पौराणिक कथा जाणून घ्या

तुळस आणि गणपती बाप्पा

मान्यतेनुसार एकदा तुळशीने गणपती बाप्पासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. पण गणपती बाप्पा ब्रह्मचर्य पाळत असल्याने त्यांनी लग्नाचा विचार केला नाही. ज्यावेळी गणपती बाप्पाने लग्नाचा प्रस्ताव नाकारला त्यावेळी तुळशीला त्याचा राग आला आणि तिने त्यांना शाप दिला की ते नक्कीच लग्न करतील. याचे उत्तर म्हणून गणपतीने तुळशीला शाप दिला की ती लग्नासाठी अयोग्य असेल आणि तिच्या पूजेमध्ये कधीही स्वीकारली जाणार नाही. तेव्हापासून गणपती बाप्पाच्या पूजेमध्ये तुळशी अर्पण करणे निषिद्ध मानले जाते.

Skand Shashthi: स्कंद षष्ठी कधी आहे? रवि योगात कार्तिकेयची पूजा केल्याने होतात हे फायदे

काय आहेत धार्मिक श्रद्धा आणि महत्त्व

हिंदू धर्मामध्ये प्रत्येक फूल, पान आणि नैवेद्याचे स्वतःचे असे महत्त्व आहे. दुर्वा, मोदक आणि लाल फुले या गणपती बाप्पाच्या आवडत्या गोष्टी मानल्या जातात. पण तुळस निषिद्ध मानली जाते. धार्मिक परंपरेनुसार पाहिले गेल्यास याकडे एक संदेश म्हणून देखील पाहिले जाते. असे मानले जाते की, गणपती बाप्पाला तुळस अर्पण केल्यास भक्ताला योग्य फळ मिळत नाही आणि त्यांच्या इच्छा देखील अपूर्ण राहतात.

गणपती बाप्पाच्या पूजेवेळी कोणत्या गोष्टी अर्पण कराव्या

गणेश चतुर्थी आणि पुढील 10 दिवस भाविक बाप्पाला 21 दुर्वा, शमीची फुले, लाल फुले आणि मोदक अर्पण करतात. कारण या गोष्टी गणपती बाप्पाच्या आवडत्या मानल्या जातात. तसेच हे अर्पण केल्याने बाप्पा प्रसन्न होऊन सुख समृद्धीचा आशीर्वाद देतात.

तुळस निषेधामागील संदेश

तुळशीची निषेध ही केवळ धार्मिक श्रद्धा नसून आध्यात्मिक शिकवण आहे. गणपती बाप्पाला बुद्धी आणि विवेकाचे देव मानले जाते. त्यांची शिकवण आपल्याला हे शिकवते की, सर्वत्र सर्वकाही योग्य नसते. जसे विष्णूची पूजा करताना तुळशीला सर्वोच्च स्थान आहे, तसेच गणेशपूजेतही तुळशीचा वापर निषिद्ध आहे. यामधील असलेले संतुलन आणि योग्य दृष्टिकोन शिकवते.

Zodiac Sign: सिद्ध योगामुळे कन्या राशीसह या राशीच्या लोकांचे चमकेल नशीब, मिळेल अपेक्षित यश

हा नियम आजही का पाळला जातो

आजही घरांमध्ये आणि मंडळांमध्ये गणपतीच्या पूजेवेळी तुळशीचा वापर केला जात नाही. पण काहीवेळेस लोक चुकून तुळशीचा वापर करतात. मात्र जुन्या समजुतीनुसार ती लगेच काढून टाकली जाते. धार्मिक शास्त्रात आणि पुराणात उल्लेख केल्यानुसार भक्त पूर्ण भक्ती आणि परंपरेने गणेशाची पूजा करताना तुळशीचा वापर करत नाहीत.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Ganesh chaturthi 2025 mythological reason why people do not offer tulsi to lord ganesha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2025 | 10:26 AM

Topics:  

  • dharm
  • Ganesh Chaturthi 2025
  • religions

संबंधित बातम्या

Vivah Panchami: विवाहच्या पंचमीच्या दिवशी राशीनुसार रामसीतेला अर्पण करा या गोष्टी, वैवाहिक जीवन राहील चांगले
1

Vivah Panchami: विवाहच्या पंचमीच्या दिवशी राशीनुसार रामसीतेला अर्पण करा या गोष्टी, वैवाहिक जीवन राहील चांगले

Chaturgrahi Yog: धनु राशीत तयार होणार चतुर्ग्रही योग, या राशीच्या लोकांसाठी सुवर्णकाळाची संधी
2

Chaturgrahi Yog: धनु राशीत तयार होणार चतुर्ग्रही योग, या राशीच्या लोकांसाठी सुवर्णकाळाची संधी

November Panchak: नोव्हेंबरमध्ये दोषरहित पंचकाची सुरुवात कधी होत आहे? जाणून घ्या
3

November Panchak: नोव्हेंबरमध्ये दोषरहित पंचकाची सुरुवात कधी होत आहे? जाणून घ्या

Gajkesari Rajyog: देवगुरू गुरू तयार करणार गजकेसरी राजयोग, या राशीच्या लोकांना होणार फायदाच फायदा
4

Gajkesari Rajyog: देवगुरू गुरू तयार करणार गजकेसरी राजयोग, या राशीच्या लोकांना होणार फायदाच फायदा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.