फोटो सौजन्य- pinterest
आज सोमवार, 25 ऑगस्ट रोजी चंद्र सिंह राशीतून कन्या राशीमध्ये आपले संक्रमण करणार आहे. आजचा सोमवारचा स्वामी ग्रह चंद्र असेल. तर चंद्राच्या या स्थितीमुळे चंद्र मंगल योग आणि अनाफ योग देखील तयार होईल. त्याचसोबत उत्तराफाल्गुनी नक्षत्रासोबतच सिद्ध योग देखील तयार होईल. आजचा सोमवार असल्याने आजचा दिवस महादेवांना समर्पित राहील. सिद्ध योग आणि महादेवाच्या आशीर्वादाने कन्या राशीसह या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर ठरणार आहे. यावेळी तुम्हाला वेगवेगळ्या कामामध्ये अपेक्षित यश मिळेल. सोमवारी कन्या राशीसह कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे, जाणून घ्या
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ राहणार आहे. या राशीच्या लोकांना आज लाभ होऊ शकतात. आज तुमच्या कुटुंबामध्ये आनंद आणि शांतीचे वातावरण राहील. मानसिकदृष्ट्या तुम्ही आज मजबूत राहाल. तुम्हाला सर्जनशील कामात मोठे फायदे होऊ शकतात. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अपेक्षेपेक्षा जास्त चांगला राहील. आर्थिक लाभ होऊ शकतो. वैवाहिक जीवन चांगले राहील.
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप खास असणार आहे. तुम्हाला प्रत्येक कामामध्ये कुटुंबाचा पाठिंबा मिळेल. व्यवसायात धाडसी निर्णय घेतल्याने तुम्हाला फायदा होईल. जेवण, रेस्टॉरंट, हॉटेल, कंटेंट रायटिंग, कम्युनिकेशन या क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. व्यवसायानिमित्त तुम्ही बाहेर जाऊ शकता. प्रवास करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
कन्या राशीच्या लोकांचा आजचा सोमवारचा दिवस चांगला राहील. तुमचे व्यक्तिमत्व वेगळ्या पद्धतीने चमकेल. तुमच्यामधील आत्मविश्वास वाढेल. परदेशात काम करणाऱ्यांसाठी आजचा दिवस फायदेशीर ठरेल. आयात आणि निर्यात क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आजचा दिवस अतिरिक्त नफ्याचा असू शकतो. करिअर किंवा व्यवसायासाठी परदेशात स्थायिक होऊ शकता. कुटुंबामध्ये अनुकूल वातावरण राहील.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहणार आहे. तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल. सरकारी सेवांशी संबंधित लोकांशी संबंधित लोकांची प्रलंबित कामे लवकर पूर्ण होतील. तुम्ही कंत्राटदार असाल आणि सरकारी निविदा मिळवण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुम्हाला चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांनी कामावर आपले लक्ष केंद्रित करावे. कुटुंबात उत्साहाचे वातावरण राहील.
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला राहील. यावेळी तुम्हाला व्यवसायात अपेक्षित फायदा होईल. तसेच नशिबाची साथ मिळेल. त्यामुळे तुमची अपूर्ण कामे लवकर पूर्ण होतील. तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. जर तुम्ही भागीदारीमध्ये काम करत असाल तर तुमचा आजचा दिवस चांगला राहील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. जोडीदारासोबतचे नाते चांगले राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)