Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गौरी गणपती विसर्जन करण्याचा शुभ मुहूर्त कोणता? यावेळी करु नका या चुका

गणेश चतुर्थीला लाडक्या बाप्पाचे आगमन अगदी थाटामाटात होते. लाडका बाप्पा सगळ्यांच्या घरी विराजमान होतो. त्यानंतर आगमन होते ते गौराईचे त्यांची विधीपूर्वक पूजा करुन विसर्जन केले जाते. यंदा 12 सप्टेंबर रोजी गौरी गणपतीचे विसर्जन होणार आहे. गौरी गणपती विसर्जनाचा शुभ मुहूर्त जाणून घेऊया.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 12, 2024 | 04:55 AM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us
Close
Follow Us:

भाद्रपद महिना सुरु होताच गणेशोत्सवाला सुरुवात झाली. गणपतीचे आगमन होताच गौरी येतात. गौरी गणपतींना विशेश महत्त्व असते. तीन दिवसांच्या या उत्सवात तिसऱ्या दिवशी ज्येष्ठा गौरींची विधीपूर्वक विसर्जन केले जाते. यंदा आज गुरुवार, 12 सप्टेंबर रोजी गौरी गणपतीचे विसर्जन केले जाणार आहे. या दिवशी विसर्जनाचा शुभ मुहूर्त कोणता? विसर्जनाच्या वेळी कोणत्या चुका करु नये ते जाणून घेऊया.

गणेश चतुर्थीला लाडक्या बाप्पाचे आगमन अगदी थाटामाटात होते. लाडका बाप्पा सगळ्यांच्या घरी विराजमान होतो. दीड दिवसांपासून ते पाच, सात आणि दहा दिवसांचा बाप्पा आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतो. त्यानंतर तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी गौरीचे आगमन होते हा तीन दिवस चालणारा हा उत्सव आनंदात आणि मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. परंतु जड अंतकरणाने बाप्पाला निरोप द्यायची वेळ देखील येते. गुरुवार, 12 सप्टेंबरला गौरी- गणपतीचे विसर्जन करण्यात येतील. या दिवशी विसर्जनाचा शुभ मुहूर्त कोणता? विसर्जनाच्या वेळी कोणत्या चूका टाळायला हव्या जाणून घेऊया.

हेदेखील वाचा- कलियुगमधील हनुमान का आहेत नीम करोली बाबा, माहित्ये का तुम्हाला?

गौरी गणपती विसर्जन शुभ मुहूर्त

मंगळवार, 10 सप्टेंबर रोजी गौराईचे आगमन झाले. माहेरवाशीण गौराईला पंचपक्वानांचा नैवेद्य दाखवत तिची विधीवत पूजा करण्यात आली. त्यानंतर आज 12 सप्टेंबर रोजी गुरुवारी गौराईचं विसर्जन होणार आहे. गौरी विसर्जन गुरुवारी संपूर्ण दिवसभरात कधीही करता येणार आहे. 12 सप्टेंबरला मूळ नक्षत्रावर गौरीचे विसर्जन करायचे असून रात्री 10 वाजेपर्यंत म्हणजे दिवसभरात कधीही गौरी विसर्जन करु शकतो. यादरम्यान भक्तगण आपल्या सोयीनुसार गौरी विसर्जन करु शकतात.

हेदेखील वाचा- घरच्या घरी हिरवी मिरची कशी पिकवता येईल ते जाणून घेऊया

गौरी गणपती विसर्जन करताना काय करावे

उत्तरपूजा करताना गौरीला हळद, सिंदूर, चंदन, ड्रायफ्रुट्स, नारळ, सुपारी आणि नट, विशेष पदार्थ, धूप आणि इतर विविध वस्तू अर्पण केल्या जातात.

गणपतीची उत्तरपूजा झाल्यानंतर मूर्ती हलवावी. तसेच मूर्ती उचलून तिला जमीनीवर ठेवावे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी बाप्पाचा आशीर्वाद घ्यावा.

बाप्पाचा आशीर्वाद घेतल्यानंतर मूर्ती घरातील चहूबाजूंना फिरवावी. त्यामुळे श्रीगणेशाचा वास आपल्या घरात कायम राहतो. घरात सुख-समृद्धी नांदते. या दिवशी बाप्पाला जाताना दही भाताचा किंवा दूध- भाताचा नैवेद्य अर्पण करावा.

श्रीगणेशाची मूर्तीचे तोंड हे नेहमी समोर असायला हवे. पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत बाप्पाला निरोप द्यावा.

गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन करताना पूजा साहित्य आणि निर्माल्याचे देखील विसर्जन करायला हवे. विसर्जन झाल्यानंतर सगळ्यांना प्रसाद वाटावा.

गणेश मूर्ती नेताना ती खंडीत होणार नाही याची काळजी घ्यावी. तलावाजवळ किंवा विसर्जन स्थळी गेल्यानंतर बाप्पाची आरती म्हणून त्याचा आशीर्वाद घ्यावा, मगच मूर्तीचे विसर्जन करावे.

 

Web Title: Ganesh chaturthi know the auspicious time for immersion of gauri ganapati

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2024 | 04:55 AM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2025
  • Ganpati festival 2024

संबंधित बातम्या

कार खरेदीदारांना बाप्पा पावला! खास गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर ‘या’ ऑटो कंपनीकडून कारच्या किमतीत 2 लाख रुपयांची कपात
1

कार खरेदीदारांना बाप्पा पावला! खास गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर ‘या’ ऑटो कंपनीकडून कारच्या किमतीत 2 लाख रुपयांची कपात

Ganesh Festival: यंदाचा गणेशोत्सव ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा होणार; आशिष शेलारांनी केली ११ कोटी निधीची घोषणा
2

Ganesh Festival: यंदाचा गणेशोत्सव ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा होणार; आशिष शेलारांनी केली ११ कोटी निधीची घोषणा

Thane News : “शाडू मातीची गणेशमूर्ती पर्यावरणपूरक, पण खाडीत विसर्जन धोकादायक” काय सांगतायत पर्यावरणतज्ज्ञ ?
3

Thane News : “शाडू मातीची गणेशमूर्ती पर्यावरणपूरक, पण खाडीत विसर्जन धोकादायक” काय सांगतायत पर्यावरणतज्ज्ञ ?

मूर्ती विसर्जनाबाबत राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय! गणेश मंडळांना मोठा दिलासा
4

मूर्ती विसर्जनाबाबत राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय! गणेश मंडळांना मोठा दिलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.