Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganga Saptami 2026: यंदा कधी आहे गंगा सप्तमी, जाणून शुभ मुहूर्त आणि महत्त्व

वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी गंगा सप्तमी साजरी केली जाते, कारण याच दिवशी पवित्र गंगा नदीचा उगम झाला होता. या दिवशी गंगेत स्नान केल्याने पापांचे क्षालन होते आणि मोक्ष मिळतो, अशी श्रद्धा आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 23, 2026 | 10:10 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • गंगा सप्तमी कधी आहे
  • गंगा सप्तमी शुभ मुहूर्त
  • गंगा सप्तमी महत्त्व
 

गंगा सप्तमी (वैशाख शुक्ल सप्तमी) हा पवित्र दिवस गंगा नदीचे पृथ्वीवर पुनरागमन किंवा प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो. पौराणिक कथेनुसार, या दिवशी गंगा नदी ऋषी जाह्नू यांच्या जटांमधून बाहेर पडून पुन्हा प्रवाही झाली होती, म्हणून याला ‘जाह्नवी सप्तमी’ असेही म्हणतात. हा सण पापांचे क्षालन, आध्यात्मिक शुद्धता आणि पूर्वजांना मुक्ती मिळवून देणारा मानला जातो.

कधी आहे गंगा सप्तमी

सप्तमी तिथीची सुरुवात २२ एप्रिल रोजी रात्री १०:४९ वाजता झाली आहे. या सप्तमी तिथीची समाप्ती २३ एप्रिल रोजी रात्री ०८:४९ वाजता होणार आहे. उदय तिथीनुसार, गंगा सप्तमीचा उत्सव २३ एप्रिल रोजी साजरा केला जाईल.

Ganga Saptami 2026 Daan: नशिब फळफळणार; गंगा सप्तमीला राशीनुसार असं करा दान, जाणून घ्या काय सांगतं शास्त्र?

गंगा सप्तमी शुभ मुहूर्त

गंगा सप्तमीच्या दिवशी स्नान करण्यासाठी मुहूर्त (पहाटे): सकाळी ०५:४८ ते सकाळी ०७:२६ पर्यंत राहील.
गंगा पूजन (मध्यान्ह मुहूर्त): सकाळी ११:०१ ते दुपारी ०१:३८ पर्यंत.

गंगा सप्तमीचे महत्त्व

गंगा सप्तमीला गंगा नदीत स्नान केल्याने पाप नाहीसे होतात आणि मोक्षाची प्राप्ती होते असे मानले गेले आहे. गंगा स्नानाचे आपले महत्त्व आहेच तरी या दिवशी गंगा स्नान केल्याने सर्व दु:खापासून मुक्ती मिळते. या दिवशी गंगा मंदिरांसह इतर मंदिरात देखील या निमित्ताने पूजा केली जाते. गंगा नदीत स्नान केल्याने मोक्ष प्राप्ती होते. तसेच या दिवशी दान-पुण्याचं विशेष महत्त्व असल्याचे सांगितले गेले आहे.

पापनाशिनी: असे मानले जाते की या दिवशी गंगेत स्नान केल्याने मनुष्याचे सर्व पाप धुतले जातात आणि त्याला मानसिक शांती मिळते.

मोक्ष प्राप्ती: राजा भगीरथाने आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी गंगेला पृथ्वीवर आणले होते. त्यामुळे पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी या दिवशी गंगेचे पूजन करणे अत्यंत फलदायी मानले जाते.

Mrityu Shadashtak Yog: मृत्यूषडाष्टक योग म्हणजे काय? या योगाचा मृत्यूशी आहे का संबंध जाणून घ्या

पुनर्जन्म: पौराणिक कथेनुसार, जेंव्हा गंगा नदी जह्नु ऋषींच्या आश्रमातून वाहत असताना त्यांच्या पूजेत व्यत्यय आला, तेव्हा संतापलेल्या ऋषींनी गंगेला पिऊन टाकले. त्यानंतर देवांच्या विनंतीवरून त्यांनी सप्तमीच्या दिवशी गंगेला आपल्या कानातून पुन्हा मुक्त केले, म्हणून या दिवसाला गंगेचा ‘पुनर्जन्म’ मानले जाते.

गंगा सप्तमीच्या दिवशी काय करावे?

शक्य असल्यास पवित्र गंगा नदीत स्नान करावे. शक्य नसल्यास घरीच अंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल टाकून स्नान करावे.
गंगेची आरती करावी आणि दीपदान करावे.

आंघोळ झाल्यावर आपण गंगा मैयाच्या मूर्तीची पूजा करू शकता.

या दिवशी भगवान शिव यांची पूजा करणे देखील शुभ मानले जाते.

त्याशिवाय गंगेला आपल्या तपामुळे पृथ्वीवर आणणार्‍या भगीरथाची पूजादेखील करावी.

गंगा पूजनासह दान-पुण्य केल्याने देखील फळ प्राप्ती होते.

तसे, अनेक पौराणिक कथा गंगा नदीशी संबंधित आहेत, जी गंगेचं संपूर्ण अर्थ परिभाषित करते. गंगा नदी हिंदूंच्या श्रद्धेचे स्थान आहे आणि अनेक धर्म ग्रंथांमध्ये गंगेचं महत्त्व बघायला मिळतं.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: गंगा सप्तमी म्हणजे काय?

    Ans: गंगा सप्तमी हा पवित्र सण देवी गंगा यांच्या पृथ्वीवरील पुनःप्रकट दिनानिमित्त साजरा केला जातो. याला “गंगा जयंती” असेही म्हणतात.

  • Que: गंगा स्नानाचे महत्त्व काय आहे?

    Ans: या दिवशी गंगा स्नान केल्याने पाप नष्ट होतात आणि आध्यात्मिक शुद्धी मिळते, अशी श्रद्धा आहे.

  • Que: गंगा सप्तमी का महत्त्वाची मानली जाते?

    Ans: हा दिवस अत्यंत पुण्यदायी मानला जातो. या दिवशी केलेले दान, जप आणि पूजा अनेक पटींनी फळ देते.

Web Title: Ganga saptami 2026 when is ganga saptami auspicious time importance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 10:10 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • religions

संबंधित बातम्या

Kneaded Dough Finger Marks: कणीक भिजवल्यावर बोटांचे छाप का सोडले जातात? पितर आणि सुखसमृद्धीशी जोडली मान्यता
1

Kneaded Dough Finger Marks: कणीक भिजवल्यावर बोटांचे छाप का सोडले जातात? पितर आणि सुखसमृद्धीशी जोडली मान्यता

Ganeshotsav 2026: गणपतीच्या चरणी दुर्वा वाहता? मग ‘हे’ 5 नियम नक्की जाणून घ्या!
2

Ganeshotsav 2026: गणपतीच्या चरणी दुर्वा वाहता? मग ‘हे’ 5 नियम नक्की जाणून घ्या!

Rishi Panchami Vrat Katha: ऋषीपंचमीला नक्की वाचा पौराणिक कथा, मासिक पाळीशी संबंध काय
3

Rishi Panchami Vrat Katha: ऋषीपंचमीला नक्की वाचा पौराणिक कथा, मासिक पाळीशी संबंध काय

Vastu Tips for Wallet: पाकीट रिकामं होण्यामागे ‘या’ ५ वस्तू कारणीभूत? वास्तुशास्त्र काय सांगतं जाणून घ्या…
4

Vastu Tips for Wallet: पाकीट रिकामं होण्यामागे ‘या’ ५ वस्तू कारणीभूत? वास्तुशास्त्र काय सांगतं जाणून घ्या…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.