Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gudhipawda 2026 : गुढीपाडव्याचा उत्साह दक्षिण भारतातही! फक्त नाव वेगळं, काय असते ‘उगादी’ प्रथा?

जसं गुढीपाडवा महाराष्ट्रात साजरा केला जातो तसाच तो दाक्षिणात्य बांधव देखील पण वेगळ्या नावाने, काय आहे ही परंपरा चला तर मग जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 17, 2026 | 01:37 PM
Gudhipawda 2026 : गुढीपाडव्याचा उत्साह दक्षिण भारतातही! फक्त नाव वेगळं, काय असते ‘उगादी’ प्रथा?
Follow Us
Follow Us:
  • गुढीपाडव्याचा उत्साह दक्षिण भारतातही !
  • फक्त नाव वेगळं, काय असते ‘उगादी’ प्रथा?
चैत्र महिन्यात येणारा गुढी पाडवा म्हणजे मराठी नववर्ष. .या सणाच्या दंतकथा अनेक आहेत. हिंदू पुराणानुसार, हा सण म्हणजे साडे तीन मुहुर्तांपैकी एक. पण तुम्हाला माहितेय का ? जसं गुढीपाडवा महाराष्ट्रात साजरा केला जातो तसाच तो दाक्षिणात्य बांधव देखील साजरे करतात. काय आहे ही दाक्षिणात्य परंपरा चला तर मग जाणून घेऊयात.

महाराष्ट्रात ज्या उत्साहात गुढीपाडवा साजरा केला जातो, त्याच दिवशी दक्षिण भारतातलदेखील नववर्षाची सुरुवात होते. जसं मराठी बांधव गुढीपाडवा म्हणतात तेच दाक्षिणात्य भागात याला उगादी असं म्हटलं जातं. उगादी हा सण कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये हा सण मोठ्या आनंदात साजरा केला जातो. हा शब्द संस्कृतमधील ‘युग + आदि’ या पासून तयार झाला. या शब्दाचा अर्थ नवीन युगाची सुरुवात असा आहे.

उगादी कशी साजरी करतात?

उगादीच्या दिवशी दाक्षिणात्य बांधव पहाटे लवकर उठतात, घराची स्वच्छता करतात आणि आंघोळीनंतर नवीन कपडे घालतात. घराच्या दाराला आंब्याच्या पानांचे तोरण लावलं जातं. पारंपरिक पद्धतीने घरं सजवली जातात. तसंच घरासमोर सुंदर रांगोळी काढून या उगादी सणाचं स्वागत केलं जातं.

Tuljapur Devi: काय आहे तुळजापूरच्या तुळजाभवानीचा महिमा, तुळजापूरच्या देवीची अद्भुत कथा जाणून घ्या

उगादी पचडीची खास परंपरा

या दिवशी ‘उगादी पचडी’ नावाचा एक खास पदार्थ बनवला जातो. यात कडू, गोड, आंबट, तिखट, खारट आणि तुरट असे सहा चवी असतात. असं म्हटलं जातं की, या सहा चवी आयुष्यातील सुख-दुःख, राग, आनंद, आशा आणि संघर्ष यांचे प्रतीक मानल्या जातात. जीवनात सर्व अनुभव स्वीकारण्याचा संदेश या परंपरेतून दिला जातो.

पंचांग श्रवण

उगादीच्या दिवशी पुजारी किंवा ज्योतिषी नव्या वर्षाचे पंचांग वाचून दाखवतात. याला ‘पंचांग श्रवण’ म्हणतात. नव्या वर्षात काय घडू शकते याबद्दल लोक श्रद्धेने ऐकतात.

गुढीपाडवा आणि उगादी

महाराष्ट्रात गुढी उभारून नववर्षाचे स्वागत केले जाते, तर दक्षिण भारतात उगादी पचडी आणि पूजा करून नवीन वर्ष साजरं केलं जातं. नाव वेगळं असलं तरी नवीन वर्षाचं स्वागत, आनंद आणि सकारात्मकतेचा संदेश दोन्ही सणांमध्ये सारखाच आहे.म्हणूनच, महाराष्ट्रातला गुढीपाडवा असो किंवा दक्षिणेतील उगादी, भारतीय संस्कृतीतील नव्या सुरुवातीचा आनंद दोन्हीकडे सारख्याच उत्साहात साजरा केला जातो.

Vastu Tips: घरात मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी योग्य जागा कोणती? जाणून घ्या

 

Web Title: Gudhipawda 2026 gudi padwa enthusiasm in south india too what is the ugadi tradition

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 03:10 PM

Topics:  

  • Gudi Padva
  • hindu religion
  • New Year

संबंधित बातम्या

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व
1

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व

Bhadrapada Purnima: भाद्रपद पौर्णिमेच्या रात्री करा या गोष्टी, नकारात्मकता होईल दूर
2

Bhadrapada Purnima: भाद्रपद पौर्णिमेच्या रात्री करा या गोष्टी, नकारात्मकता होईल दूर

Pitru Paksha 2026: पितृपक्षामध्ये श्राद्धाचे जेवण देताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या नियम
3

Pitru Paksha 2026: पितृपक्षामध्ये श्राद्धाचे जेवण देताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या नियम

Pitru Paksha: पितरांचे श्राद्ध ‘या’ तिथी वेळी करू नये, अकाली मृत्यूपासून पहिल्या वर्षापर्यंत जाणून घ्या नियम
4

Pitru Paksha: पितरांचे श्राद्ध ‘या’ तिथी वेळी करू नये, अकाली मृत्यूपासून पहिल्या वर्षापर्यंत जाणून घ्या नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.