Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gupt Navratri: गुप्त नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी करा ब्रह्मचारिणी देवीची पूजा, तुम्हाला होतील अनेक फायदे

आषाढ महिन्यात गुप्त नवरात्र साजरी केली जाते. आज 27 जून रोजी नवरात्रीचा दुसरा दिवस आहे. या दिवशी ब्रम्हचारिणी देवीची पूजा केली जाते. त्यामुळे व्यक्तीच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jun 27, 2025 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आषाढ महिन्यातील गुप्त नवरात्रीची सुरुवात 26 जूनपासून झालेली आहे. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा करण्याची प्रथा आहे. ब्रह्मचारिणी देवीची पूजा केल्याने व्यक्तीच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात, असे मानले जाते.

आषाढ गुप्त नवरात्रीमध्ये देवीच्या 9 रुपांची पूजा केली जाते. आषाढ महिन्यात येणाऱ्या नवरात्रीला गुप्त नवरात्री असे म्हटले जाते. यंदा 26 जूनपासून गुप्त नवरात्रीची सुरुवात झालेली आहे. यावेळी नवरात्रीचा दुसरा दिवस शुक्रवार, 27 जून रोजी आहे. यावेळी ब्रम्हचारिणी देवीची पूजा केली जाणार आहे. देवीच्या या रुपांची पूजा केल्याने व्यक्तीच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात, अशी श्रद्धा आहे.

या दिवशी ब्रम्हचारिणी देवीची कथा वाचणे शुभ मानले जाते. ब्रम्हचारिणीचा अर्थ ‘ब्रह्मा’ म्हणजे तपश्चर्या आणि ‘चारिणी’ म्हणजे तपश्चर्या करणारी. असा देखील होतो. यामुळे ब्रम्हचारिणी देवीला तपश्चर्या करणारी देवी असे म्हटले जाते. यावेळी देवीची उपासना केल्याने व्यक्तीला अनेक फायदे होतात, अशी मान्यता आहे. तसेच तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते असे म्हटले जाते. जो व्यक्ती ब्रम्हचारिणी देवीची पूजा करतो त्या व्यक्तीला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश, आनंद आणि समृद्धी मिळते. या देवीला ज्ञान आणि तपस्याची देवी असे देखील म्हटले जाते.

Vastu Tips: कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळत नाही का? कार्यालयाच्या या दिशेमध्ये करा बदल

पौराणिक कथेनुसार, देवी पार्वतीने भगवान शिव पती म्हणून मिळावे, यासाठी देवी पार्वतीने तपस्या केली होती. ब्रम्हचारिणी देवीने पांढरी साडी परिधान केलेली आहे तसेच तिच्या उजव्या हातामध्ये माळ आणि डाव्या हातात कमंडलू आहे.

ब्रम्हचारिणी देवीची या पद्धतीने करा पूजा

या दिवशी सकाळी लवकर उठून दैनंदिन कामे आवरल्यानंतर गंगाजलाने देव्हारा स्वच्छ करुन घ्या. त्यानंतर दिवा लावून देवीला आवाहन करा. नंतर तिच्या फोटो किंवा मूर्तीला गंगाजलाने अभिषेक करुन घ्या. तसेच फुले, फळे, मिठाई आणि तांदूळ, सिंदूर देवीला अर्पण करा.

Ashadha Gupt Navratri: गुप्त नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवीचे आशीर्वाद मिळविण्यासाठी राशीनुसार करा हे उपाय

ब्रम्हचारिणी देवीच्या या मंत्रांचा जप करा

ब्रम्हचारिणी देवीला प्रसन्न करण्यासाठी देवीच्या मंत्रांचा 108 वेळा जप करावा. ‘या देवी सर्वभूतेषु मां ब्रह्मचारिणी रूपेण संस्था । ‘नमस्तस्यै नमस्तेयै नमस्तेयै नमो नमः’ या मंत्रांचा जप करणे खूप फायदेशीर ठरु शकते. पूजा आणि मंत्रांचा जप करुन झाल्यावर देवीची आरती करावी. तसेच दुर्गा चालिसाचे पठण करावे. यामुळे व्यक्तीच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात, अशी मान्यता आहे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Gupt navratri 2025 second day worship method of goddess brahmacharini

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2025 | 07:05 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Rigveda: ऋग्वेद का आहे भारतीय संस्कृतीचा आधार? जाणून घ्या त्याचे महत्त्व
1

Rigveda: ऋग्वेद का आहे भारतीय संस्कृतीचा आधार? जाणून घ्या त्याचे महत्त्व

Nichbhang Raja Yoga: मंगळाच्या नीचभंग राजयोगाचा या राशींच्या लोकांना होणार आर्थिक फायदा
2

Nichbhang Raja Yoga: मंगळाच्या नीचभंग राजयोगाचा या राशींच्या लोकांना होणार आर्थिक फायदा

Numberlogy: गोपाळकालाच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना व्यवसायात मिळेल अपेक्षित यश
3

Numberlogy: गोपाळकालाच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना व्यवसायात मिळेल अपेक्षित यश

Bhagavad Gita: पापांचा घडा नेमका कधी भरतो? भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितले हे संकेत
4

Bhagavad Gita: पापांचा घडा नेमका कधी भरतो? भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितले हे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.