फोटो सौजन्य- pinterest
आज गुरुवार, 26 जूनपासून गुप्त नवरात्रीची सुरुवात झालेली आहे. या दिवसाची सुरुवात कळश स्थापनेने होते. त्यासाठी शुभ मुहूर्त पहाटे 5.25 ते 6.58 आणि सकाळी 11.56 ते दुपारी 12.52 पर्यंत असेल. यावेळी काही योग तयार होत आहे. त्यापैकी सर्वार्थ योग तयार होत आहे. या योगाचा कालावधी 26 जूनला 8.46 वाजता सुरुवात होईल आणि 27 जून रोजी सकाळी 5.25 पर्यंत राहील. या काळात देवीची पूजा करणे शुभ मानले जाते.
आषाढ गुप्त नवरात्रीमध्ये देवीची पूजा केल्याने भक्ताच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात, असे म्हटले जाते. तसेच अडकलेली सर्व कामे पूर्ण होतात. यावेळी जर तुम्ही तुमच्या राशीनुसार देवीची पूजा करुन मंत्रांचा जप केल्यास तुम्हाला इच्छित फळ मिळते, अशी मान्यता आहे. जाणून घ्या राशीनुसार कोणत्या मंत्रांचा जप करावा.
मेष राशीच्या लोकांनी आषाढ गुप्त नवरात्रीमध्ये स्कंदमातेची पूजा करणे खूप फायदेशीर मानले जाते. पूजा करताना त्यांनी लाल रंगाची फुले अर्पण करावी आणि “ओम ह्रीम उमा देवयै नम:”, “ओम ऐन सरस्वत्यै नम:” किंवा “ओम महायोगायै नम:” या मंत्राचा जप पूर्ण भक्तीने करावा. तसेच दुर्गा चालिसाचे पठण करणे देखील शुभ मानले जाते.
वृषभ राशीच्या लोकांनी नवरात्रीमध्ये देवी महागौरीची पूजा करावी. देवीला पांढरे फुले अर्पण करावे त्यानंतर “ओम कार्क्याय नम:” किंवा “ओम क्रम कृं कालिका देवयाय नम:” या मंत्राचा जप करा. या काळात ललिता सहस्रनामाचे पठण केल्याने विशेष परिणाम मिळतील आणि जीवनात स्थिरता आणि समृद्धी येईल.
मिथुन राशीच्या लोकांनी ब्रह्मचारिणी मातेची पूजा करवी. या लोकांनी देवीची पूजा करतेवेळी पिवळी फुले अर्पण करा आणि “ओम दुन् दुर्गाय नमः” किंवा “ओम घोराय नमः” या मंत्राचा जप करा. तसेच तारा कवचचे पठण केल्याने मानसिक शांती आणि आत्मविश्वास वाढेल.
कर्क राशीच्या लोकांनी गुप्त नवरात्रीच्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा करावी. या लोकांनी गुलाबी आणि पांढऱ्या रंगांची फुले अर्पण करावी. तसेच पूजा झाल्यानंतर “ओम ललिता देवायै नम:” किंवा “ओम हस्तनीयै नम:” या मंत्रांचा जप करावा. यामुळे आर्थिक अडचण दूर होते.
सिंह राशीच्या लोकांनी गुप्त नवरात्रीच्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा करावी. देवीला लाल फुले अर्पण करावे. “ॐ ऐं महासरस्वती देवायै नमः” किंवा “ॐ त्रिपुरांतकाये नमः” या मंत्रांचा जप करावा. असे केल्याने व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो आणि करिअरमध्ये यश मिळते.
कन्या राशीच्या लोकांनी ब्रह्मचारिणीची देवीची पूजा करणे फायदेशीर मानले जाते. या राशीच्या लोकांनी देवीला पिवळी फुले अर्पण करावी. ओम विश्वरूपायै नम:” किंवा “ओम शूल धारिणी देवायै नम:” या मंत्रांचा जप करावा. यामुळे कामाच्या ठिकाणी यश मिळण्यासा मदत होते.
तूळ राशीच्या लोकांनी आषाढ गुप्त नवरात्रीच्या दिवशी महागौरीची पूजा करावी. त्यावेळी पांढरी फुले अर्पण करावी. महालक्ष्मीय नमः” किंवा “ओम रौद्रवेताय नमः” या मंत्रांचा जप करा. यामुळे जीवनात संतुलन कायम राहते.
तूळ राशीच्या लोकांनी स्कंदमातेची पूजा करावी. या लोकांनी देवीला लाल फुले अर्पण करावी. “ओम शक्तिरूपाय नम:” किंवा “ओम क्लीम कामाख्याय नम:” या मंत्रांचा जप करा. यामुळे तुमच्यातील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते.
धनु राशीच्या लोकांनी देवी चंद्रघंटाची पूजा करावी. या लोकांनी देवीला पिवळी फुले अर्पण करावीत. “ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडये विच्छे” किंवा “ओम गजानयनाय नमः” या मंत्रांचा जप करावा. यामुळे तुमची सर्व कामे पूर्ण होतील.
मकर राशीच्या लोकांनी देवी कालरात्रीची पूजा करावी. या लोकांनी देवीला लाल फुले अर्पण करावीत. “ओम सिंहमुख्यै नम:” किंवा “ओम पाम पार्वती देवायै नम:” या मंत्रांचा जप करावा. यामुळे तुमच्यातील नकारात्मक ऊर्जा दूर होते.
कुंभ राशीच्या लोकांनी कालरात्री देवीची पूजा करणे फायदेशीर मानले जाते. या लोकांनी देवीला लाल किंवा निळे फुले अर्पण करा आणि “ओम पा पार्वती देवायै नम:” या मंत्राचा जप करावा. त्यामुळे तुमच्यातील आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल.
मीन राशीच्या लोकांनी चंद्रघंटा देवीची पूजा करावी. तिची पूजा करताना पिवळी फुले अर्पण करावीत आणि “ओम श्रीं ह्रीं श्रीं दुर्गा देवायै नमः” या मंत्रांचा जप करावा. त्यामुळे व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी येते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)