Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hindu Nav Varsh 2026: हिंदू नववर्षाला कडुलिंबाची पाने खाण्याची काय आहे परंपरा, जाणून घ्या फायदे

हिंदू नववर्षाच्या दिवशी सकाळी ब्रह्म मुहूर्तावर स्नान केले जाते. पूजा अर्चना केली जाते. यावेळी कडुनिंबाची पाने खाण्याची परंपरा आहे. जाणून घ्या नववर्षाला कडुलिंबाची पाने का खातात.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Mar 20, 2026 | 10:17 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाची पाने का खातात
  • कडुलिंबाची पाने खाण्याची काय आहे परंपरा
  • कडुलिंबाची पाने खाण्याचे महत्त्व आणि फायदे
 

 

हिंदू धर्मामध्ये नवसंवत्सर म्हणजेच हिंदू नववर्ष खूप विशेष आणि महत्वपूर्ण मानले जाते. पंचांगानुसार दरवर्षी चैत्र महिन्यांच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून हिंदू नववर्षाची सुरुवात होत आहे. यावर्षी गुरुवार 19 मार्च रोजी हिंदू नववर्षाची सुरुवात होत आहे. या दिवशी गुरुवार असल्याने नववर्षांचा राजा गुरु बृहस्पती मानले जाते.

ज्योतिषशास्त्रानुसार ज्या दिवशी नववर्षाची सुरुवात होते तो दिवस त्या ग्रहाचा असतो. तो राजा मानला जातो. या नववर्षाचे मंत्री मंगळ मानले जाते. हिंदू नववर्षाच्या दिवशी गुढीपाडव्याच्या सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ह्या दिवशी नवीन वर्षाची सुरुवात होते. त्यादिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्थान केले जाते, पूजा अर्चना केली जाते. जाणून घ्या नववर्षाला कडुलिंबाची पाने का खातात.

कडुलिंबाची पाने खाण्याची परंपरा

हिंदू नववर्षाच्या दिवशी कडुलिंबाची पाने खाल्ली जातात. खास करून महाराष्ट्रात गुढीपाडवा, आंध्र प्रदेश तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये उगादीच्या वेळी लोक कडुलिंबाच्या पानांचे सेवन करतात. काही ठिकाणी कडुलिंबाची पानं गुळ, चिंच आणि कैरी मिळून खातात. हार्दिक श्रद्धेनुसार, नववर्षाला कडूलिंबाची पाने खाण्याची परंपरा जीवनामध्ये गोड आणि कडू अनुभवांचे प्रतीक मानले जाते.

Gudhipawda 2026 : गुढीपाडव्याचा उत्साह दक्षिण भारतातही! फक्त नाव वेगळं, काय असते ‘उगादी’ प्रथा?

कडुलिंबाची पाने खाण्याचे फायदे

हे खाऊन असं संदेश दिला जातो की, येणारे नवीन वर्ष सुखदुःख, यश आणि अपेक्षांनी भरलेले असते. आपल्याला प्रत्येक परिस्थितीत तयार राहायला हवे. याशिवाय या परंपरेचा संबंध आरोग्याशी संबंधित आहे. हिंदू नववर्ष वसंत ऋतूमध्ये येते. यावेळी वातावरणामध्ये बदल होतो. अशावेळी संक्रमण आणि ॲलर्जीची समस्या वाढते. कडुलिंबाच्या पानांचे सेवन केल्याने शरीर शुद्ध राहते. यामुळे व्यक्ती आजारांपासून दूर राहते.

Hindu New Year 2026: हिंदू नववर्षाच्या पहिल्या दिवशी करा ‘हे’ शुभ काम, वर्षभर राहील सुख-समृद्धी

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी काय करणे शुभ असते

हिंदू नववर्षाच्या दिवशी सकाळी लवकर उठणे, स्नान करणे आणि देवतांची पूजा करणे शुभ मानले जाते. या दिवशी गणपतीची पूजा करणे ही देखील एक लोकप्रिय परंपरा आहे. गरजूंना दान करणे आणि घरात स्वच्छता राखणे देखील सकारात्मक मानले जाते. अनेक ठिकाणी चैत्र नवरात्राची सुरुवात या दिवसापासून होते म्हणून दुर्गा देवीची पूजा आणि घटस्थापना देखील केली जाते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: हिंदू नववर्षाच्या दिवशी कडुलिंबाची पाने का खाल्ली जातात?

    Ans: या दिवशी कडुलिंबाची पाने गुळ किंवा साखरेसोबत खाण्याची परंपरा आहे. जीवनात गोड आणि कडू दोन्ही अनुभव येतात याचे प्रतीक म्हणून ही प्रथा पाळली जाते.

  • Que: कडुलिंबाच्या पानांचे धार्मिक महत्त्व काय आहे?

    Ans: हिंदू धर्मात कडुलिंबाला पवित्र आणि औषधी वृक्ष मानले जाते. नववर्षाच्या दिवशी कडुलिंबाचे सेवन केल्याने शरीर शुद्ध होते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते असे मानले जाते.

  • Que: कडुलिंब आणि गुळ एकत्र का खाल्ले जातात?

    Ans: कडुलिंबाची कडू चव आणि गुळाची गोड चव जीवनातील सुख-दुःखाचे प्रतीक मानली जाते. त्यामुळे नववर्षाची सुरुवात संतुलित भावनेने करण्याचा संदेश यातून मिळतो.

Web Title: Hindu nav varsh 2026 what is the tradition and benefits of neem leaf

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • Gudi Padwa
  • Hindu Festival
  • hindu religion

संबंधित बातम्या

Bhadrapada Purnima: भाद्रपद पौर्णिमेच्या रात्री करा या गोष्टी, नकारात्मकता होईल दूर
1

Bhadrapada Purnima: भाद्रपद पौर्णिमेच्या रात्री करा या गोष्टी, नकारात्मकता होईल दूर

Pitru Paksha 2026: पितृपक्षामध्ये श्राद्धाचे जेवण देताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या नियम
2

Pitru Paksha 2026: पितृपक्षामध्ये श्राद्धाचे जेवण देताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या नियम

Pitru Paksha: पितरांचे श्राद्ध ‘या’ तिथी वेळी करू नये, अकाली मृत्यूपासून पहिल्या वर्षापर्यंत जाणून घ्या नियम
3

Pitru Paksha: पितरांचे श्राद्ध ‘या’ तिथी वेळी करू नये, अकाली मृत्यूपासून पहिल्या वर्षापर्यंत जाणून घ्या नियम

Bhadrapad Purnima 2026: भाद्रपद पौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि पितृपक्षाशी संबंध
4

Bhadrapad Purnima 2026: भाद्रपद पौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि पितृपक्षाशी संबंध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.