पत्रिकेत राहू किंवा केतूची दशा बदलली की अनेकांना याचा त्रास जाणवतो. सतत अडचणी निर्माण करणारे राहू आणि केतू नेमको कसे निर्माण झाले त्याची पुराण कथा जाणून घेऊयात. समुद्र मंथनाची कथा सर्वांनाच माहित आहे. ज्यातून चौदा रत्ने आणि अमृत निघालं होतं. दानवांचे गुरू शुक्राचार्य यांना संजिवनी विद्या प्राप्त असल्या कारणाने युद्धा मरणाऱ्या दानवांना ते पुन्हा जिवंत करीत. त्यामुळे देव कुळावरील संकट वाढतच जात होतं. अशावेळी सर्व देवगण अखेरीस ते भगवान विष्णूला शरण गेले, तेव्हा विष्णूने समुद्रमंथन करून अमृत मिळविण्याची योजना देवांना सांगितली.त्यासाठी तह करून दानवांचे साहाय्य घेण्याचा सल्लाही विष्णूने दिला.
या मंथनातून लक्ष्मी, धन्वंतरी,चंद्र, कल्पवृक्ष, कामधेनू, उच्चैःश्रवा (घोडा), ऐरावत (हाथी) आणि विष (हलाहल) यांसारख्या गोष्टी बाहेर पडल्या, असे अनेक कथांमध्ये सांगितले आहे.देवांना महासागर मंथन करण्यास सांगितले. त्यानुसार देव-दानवांनी मंदार पर्वताची रवी व वासुकी सर्पाची दोरी करून समुद्रमंथन केले. पण मंदारचलच्या खाली आधार नसल्याने, समुद्रात बुडायला लागलाते पाहून भगवान विष्णूने महाकाय कुर्म (कासव) कासवाच्या रूपाने मंदार पर्वताला सागराच्या तळाशी आधार दिला. अशा प्रकारे समुद्र मंथन तयार झाले. या मंथनातून आलेल्या अमृतासाठी देव आणि दानव यांच्यात वाद झाले होते. हे अमृत जो कोणी प्राशन करेन त्यांना अमरत्व प्राप्त होईल अशी या अमृताची महती होती. आपण देखील अमर व्हावं आणि देवांवर विजय मिळावावा या हेतूसाठी दानवांनी अमृताचा कलश पळवून नेला.
दानवांच्या या कृत्यामुळे देवकुळात चिंता निर्माण झाली. दानवांकडील अमृताचा कलश मिळवण्यासाठी भगवान विष्णूने मोहिनी रुप धारण केलं. या मोहिनी रुपाची भूरळ फक्त दानवांनाच नाही तर देवांनाही पडली. मोहिनी रुपावर भाळलेल्या दानवांनी मोहिनी जे आणि जसं सांगेल तसं ऐकलं. याच सगळ्याचा आधार घेत भगवान विष्णूने दानवांकडील अमृताचा कलश चतुराईने आणून देवांमध्ये हे अमृत वाटलं होतं. विष्णूने अमृत वाटताना त्यावेळी एका राक्षसाने चंद्रदेवांचं रुप घेतलं. काही वेळाने या राक्षसाचं पितळ उघड झालं. चंद्रदेव आणि इतर देवगणांनी राक्षसाचा खरा चेहरा समोर आणला. त्याला अमृत प्राशन करण्यापासून परावृत्त केलं. मात्र तोवर फार उशीर झाला होता.
या राक्षसाच्या पोटात अमृताचा एक थेंब गेला होता. संतापलेल्या विष्णूने या राक्षसाचं धड आणि मान वेगळी केली. मात्र या सगळ्याचा परिणाम फार मोठा झाला नाही. राक्षसाच्या पोटात अमृताचा अंश गेल्याने त्याला मरण येणार नव्हतं. या राक्षसाचं मान आणि धड वेगळं केल्यानंतर ज्यांची निर्मिती झाली ते म्हणजे राहू आणि केतू. राक्षसाच्या मानेचा भाग म्हणजे राहू आणि त्याचं धड म्हणजे केतू. राहू आणि केतू हे भगवान विष्णूला घाबरतात असं पुराणात सांगितलं आहे. त्यामुळे जर पत्रिकेत राहू किंवा केतू अशुभ फल देत असल्यास भगवान विष्णूंची उपासना करणं फलदायी ठरतं. असं सांगितलं जातं.