फोटो सौजन्य- pinterest
तुम्ही घरात किंवा ऑफिसमध्ये अशा अनेक ठिकाणी धावणाऱ्या सात घोड्याचे चित्र लावलेले पाहिले असाल. बऱ्याचदा हे सजावटीचे एक साधन मानले जाते. मात्र, वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या मान्यतेनुसार धावत्या सात घोड्याच्या चित्राला एक वेगळा अर्थ आहे. धावत्या घोड्याचा फोटो लावणे हे खूप प्रभावी मानले जाते. मात्र तुम्हाला माहिती आहे का घोड्याचा फोटो कोणत्या दिशेला लावणे फायदेशीर ठरते. जाणून घ्या कोणत्या दिशेला धावत्या सात घोड्याचा फोटो लावावा.
घोडा हा पाण्याशी संबंधित असलेला घटक आहे. पाणी हे प्रवाहित करते, गती देते आणि जीवनामध्ये लवचिकता राखण्याचे काम करते. जेव्हा घोड्याचे चित्र एखाद्या दिशेला लावले जाते तेव्हा त्या ठिकाणी असलेल्या ऊर्जेला ते गती देते. जर तुमचे एखादे काम थांबले असेल, एखाद्या कामामध्ये अडथळा येणे किंवा एखाद्या गोष्टीचा प्रभाव मंदावणे. घोड्याचे चित्र लावल्याने यांसारख्या गोष्टी तिथली ऊर्जा ढकलते त्यामुळे तिथे नवीन शक्ती प्रवाहित होते.
फक्त सात घोडे धावण्याचे फोटो लावण्याचा काही फायदा होत नाही. घोडो धावत असतानाच्या चित्रामध्ये ते मागे वळून बघताना असू नये, त्यांची संख्या सात आहे हे बघणे गरजेचे आहे. सात धावणाऱ्या घोड्यांचे चित्र हे ऊर्जा, यश आणि वेगाचे प्रतीक मानले जाते. त्या व्यक्तिरिक्त फोटोमध्ये सूर्य किंवा प्रकाशाची झलक दिसणे. घोडयाचा चेहरा समोर असणे हे सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते.
धावणाऱ्या सात घोड्याचे चित्र दक्षिण दिशेला असणे शुभ मानले जाते. जेव्हा ओळख, नाव आणि प्रसिद्धीशी संबंधित काही काम असल्यास दक्षिण दिशेला हे लावणे खूप फायदेशीर ठरते, असे म्हटले जाते. त्यासोबतच तुम्हाला करिअरमध्ये प्रगती करायची असल्यास हे चित्र उत्तर दिशेला लावणे खूप फायदेशीर ठरते.
दरम्यान प्रत्येकाचे घर किंवा ऑफिसची रचना ही वेगळी असते. म्हणून दिशा निवडताना व्यक्तीची कुंडली, ठिकाण, ऊर्जा आणि ध्येय यावर हे अवलंबून असते.
धावणाऱ्या घोड्यांना वेगाचे प्रतीक मानले जाते. तुमच्या घरातील लिविंग रुममध्ये हा फोटो लावणे शुभ मानले जाते. धावत्या घोड्याचे पेटिंग तुम्ही अभ्यासाची खोली किंवा कामाच्या ठिकाणी लावू शकता. मात्र हे चित्र कधीही बेडरुममध्ये लावू नका.
घरात कधीही धावणाऱ्या घोड्याचे फोटो लावण्याचा विचार करत असाल किंवा खरेदी करायला गेल्यावर योग्य त्याची निवड करा. घरामध्ये कधीही आक्रमक घोड्याचे चित्र लावू नका. योग्य निवडून लावलेले चित्र तुमच्या घरात समृद्धी आणू शकते.
पांढरा रंग हा शांतीचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे पांढऱ्या घोड्याचे चित्र घरात लावणे हे सर्वांत योग्य मानले जाते. या रंगांचे चित्र लावल्याने तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात कामात यश आणि प्रोत्साहन मिळते.
चित्राची निवड करताना नेहमी धावणाऱ्या घोड्याची निवड करावी. ज्यामध्ये विषम संख्येचे घोडे असावे. चित्रांमधील घोडे स्पष्ट दिसणारे असावेत.
ज्या ठिकाणी तुम्ही घोड्याचे चित्र लावाल त्या ठिकाणी इमारतीच्या दिशेने आतील बाजूस असले पाहिजे. धावत्या घोड्याचे चित्र हे लगामांनी बांधलेले असते याची खात्री करुन घ्या.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)