
प्राचीन हिंदू पुराणात जर एखादा व्यक्ती स्त्रियांचे अपहरण करतो किंवा त्यांच्या चारित्र्याची विटंबना करतो तर त्या अपराधासाठी राजाने त्याला ठार मारले पाहिजे ! असं प्राचीन पुराणात सांगितलेलं आहे.
जे लोक स्त्रियांवर बलात्कार करतात किंवा देहविक्रीसाठी त्यांची फसवणूक करुन चुकीच्या मार्गाला जाण्यास भाग पाडतात , त्यांना सर्वात कठोर शिक्षा दिली पाहिजे, ज्यामुळे इतरांना अशा गुन्ह्याचा विचार देखील करायला भीती वाटेल. असा घोर अपराध करणाऱ्या पुरुषाला लाल-तप्त लोखंडाच्या खाटेवर जाळून ठार मारावे; त्याखाली लाकडे ठेवून पापी व्यक्तीला मृत्यूपर्यंत जाळले जाईल.
पुराणात सांगितलं की, गुन्हेगाराला मृत्युदंड द्यावा आणि ही शिक्षा शक्य तितक्या लवकर राजाने द्यावी. जर राजा व्यस्त असेल तर समाजातील अधिकृत व्यक्तीने ही शिक्षा अंमलात आणायला पाहिजे. पुन्हा असं दुष्कृत्य करण्याचं धैर्य प्रजेतील कोणत्याही पुरुषाने कधीच करु नये असा धाक प्रत्येकाला मिळायला पाहिजे. या सगळ्या शिक्षेबाबत आर्यभूमी या इन्स्टाग्राम पेजवरुन देण्यात आली आहे.
स्त्रियांवर आणि प्राण्यांवर बलात्कार करणाऱ्यांना ‘विषारी सापांमध्ये’ टाकले पाहिजे किंवा प्राण्यांनी चिरडून मारले पाहिजे !
जे पुरुष स्त्रियांशी गर्भधारणेच्या काळात जबरदस्ती करतात, अशा स्त्रिया ज्यांच्याकडे दुसरा कोणताही आधार नाही असे लोक नक्कीच नरकात जातात. या गुन्हेगारांना मल, मूत्र, रक्त, कफ, विषारी कीटक आणि प्राण्यांनी भरलेल्या दूषित विहिरीत टाकले जाईल आणि त्यांचा वेळ संपेपर्यंत तिथे ठेवले जायचे.
अपस्तंब धर्मसूत्रनुसार, जर एखादा पुरुष चुकून तरुण मुलीच्या खोलीत गेला तर त्याला फक्त रागावून इशारा दिला जाईल.
जर तो जाणूनबुजून गेला आणि वाईट वर्तन दाखवले, तर त्याला मारावे/शिक्षा द्यावी/दंड करावा. जर त्याने मुलीवर बलात्कार केला, तर त्याचे गुप्तांग कापून टाकावे. असं या पुराणात सांगितलं आहे.
जर एखाद्या पुरुषाने विवाहयोग्य मुलीशी संबंध ठेवले, तर त्याची संपत्ती काढून घेऊन त्याला हद्दपार करावे. (हे फक्त जेव्हा लागू होते जेव्हा ते एकमेकांना चांगले ओळखत असतात, पण मुलगी विवाहापूर्वी संबंधाची अपेक्षा करत नाही. यानंतर राजा पीडितांना मदत करेल. आणि त्यांना पुढे इतरांकडून होणाऱ्या अपमानापासून वाचवेल. हिंदू धर्मात देवीचं रुप मानलं जातं त्यामुळे तिच्या मनाविरुद्ध तिच्याशी शारिरीक संबंध ठेवणं म्हणजे देवीची आणि धर्माची विटंबना करणं आहे, हे लक्षात घेत प्राचीन हिंदू भारतात कडक शिक्षा दिली जायची.