कोकणातील हे गूढ आणि रहस्यमय देवस्थान म्हणजे रवळनाथाचं मंदिर. सोहम रागणेकर या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन कोकणातील देवकथा या सिरिजमध्ये रवळनाथ देवस्थानाची माहिती दिली आहे. असं म्हटलं जातं की, कर्नाटकवरुन एका होडीतून तीन मुर्त्या या कोकणात आणल्या गेल्या. त्या मुर्त्या रवळनाथाच्या होत्या. त्यातीलच एका मूर्तीची सावंतवाडीमध्ये प्रतिष्ठापणा करण्यात आली. या मंदिराच्या परिसरात असं एक पाषाण आहे ज्याच्यासमोर उभं राहताच नकारात्मक शक्ती दूर होते इतकं पावित्र्य त्या पाषाणात आहे.
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, देवाच्या समोर हात जोडून उभं रहावं फक्त. रवळनाथ सगळं ऐकून घेतो. या ठिकाणी एका स्वामींचं भुयारात मठ आहे आणि आजही इथे असलेला पाळणा हलतो. असं म्हणतात की नागदेवता इथे वास्तव्य करते. त्यामुळे या ठिकाणी कधीच कासव आणि सापांची कधीत हत्या केली जात नाही. त्याचबरोबर सांगायचं तर, या दोन्ही प्राण्यांची हत्या पाहणं देखील देखील मोठं पाप म्हटलं जातं. ही रवळनाथाची आज्ञा म्हटली जाते. आजही कोकणातील भाविक रवळनाथाच्या मंदिरात मोठ्या श्रद्धेने येतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)






